पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे भारताच्या राजधानीत असलेले वासहतवादाची चिन्हे मिटवण्याचा कार्यक्रम करत असतांना तिकडे भारताला वसाहत बनवणाऱ्या ब्रिटनला आपल्या महाराणीला म्हणजेच क्वीन एलिझाबेथ द्वितीय हिच्या मृत्यूचा धक्का बसला आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय गेले ७० वर्षे ब्रिटनची महाराणीपद संभाळत होत्या.
राणी एलिझाबेथ द्वितीयने १९५२ मध्ये ब्रिटनची राणी म्हणून पदभार घेतला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर बदलली आर्थिक परिस्थितीत आणि जागतिक राजकारणाने ब्रिटनची झालेली पीछेहाट राणीला बघावी लागली. एकेकाळी जगावर राज्य करणारे आणि लयाला गेलेल्या साम्राज्यातील स्वातंत्र्य मिळालेल्या देशांचे "कॉमनवेल्थ" बनवत, निदान त्या देशात तरी ब्रिटनचा राजकीय मान राहील अशी व्यवस्था बनवण्यात राणी एलिझाबेथ द्वितीय यशस्वी राहिल्या.
मात्र या राणीला ब्रिटनच्या राजकारणासोबतच ब्रिटनमधील बदलल्या सामाजिक मूल्याला पण सामोरे जावे लागलेच, पण या बदलल्या सामाजिक मूल्यांचा असर ब्रिटिश राजघराण्यात झालेला पण बघावा लागला. आपले लग्न वाचवणे, आपल्या मुलाचा झालेला घटस्फोट आणि त्याच्या घटस्फोटिक पत्नीचा झालेला अपघाती मृत्यू वगैरे अनेक क्लेशकारक घटना या राणीने लीलया पचवल्या !
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कार्यकाळात त्यांनी ऐकूण १५ पंतप्रधान बघितले. त्यांच्या कार्यकाळात १८७४ साली जन्मलेले आणि दुसऱ्या महायुद्धात पंतप्रधान म्हणून महत्वाची कामगिरी करनारे विल्सन चर्चिल हे पहिले पंतप्रधान तर चर्चिल यांच्या नंतर १०१ वर्षांनी जन्म झालेल्या म्हणजेच १९७५ साली जन्मलेल्या आणि नुकत्याच ब्रिटनच्या पंतप्रधान झालेल्या लीज ट्रस पर्यंतचे पंतप्रधान त्यांच्या कार्यकाळात झाले. या वरून त्यांची राणी म्हणून कारकीर्द किती विसृत होती हे लक्षात यावे.
बाकी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याच कार्यकाळात ब्रिटनला राजघरणासुन मुक्ति मिळावी म्हणून झालेल्या चळवळीपण बघाव्या लागल्या. तरी त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्या दर आठवड्यात एकदा ब्रिटिश पंतप्रधानांना भेटत होत्या.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ साली लंडनच्या मेयफेअर इथे झाला होता. त्यांचे जन्म नाव एलिज़ाबेथ एलेक्सांड्रा मैरी विंडसर असे होते. मात्र ब्रिटिश राजघराण्यात त्या "लिलिबेट" म्हणून प्रसिद्ध होत्या. मृत्यू समयी त्यांचे वय ९६ वर्षे होते.
आता राणी एलिझाबेथ द्वितीय नंतर ब्रिटनला त्यांचा नवीन राजा मिळेल. त्यांचा मोठा मुलगा आणि वेल्स परगण्याचे माजी प्रिन्स चार्ल्स आता ब्रिटनचे नवे राजे बनतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा