भारतीय माणूस
२६/११/२००८ हा दिवस कधी विसरू शकत नाही. पाकीस्थान पुरस्कृत “इस्लामी आतंकवादाने”
मुंबई शहरात जो “नंगा नाच” घातला त्या मुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात “राग”
निर्माण झाला. पण याच २६/११ च्या आतंकवादी हल्ल्याच्या आडून आपले सुप्रसिद्ध “पुरोगामी”
नथीतून तीर मारायचा प्रयत्न करणार होते आणि त्यांनी केले पण, आपण खर तर “शहीद
तुकाराम ओंबळे, मुंबई पोलीस” याचे मनापासून ऋणी राहायला हवे. कारण त्यांनी “नराधम
कसाब” याला जिवंत पकडून दिले नसते तर या “पुरोगाम्यांनी” आणि तेव्हाच्या “पुरोगामी
सरकारने” “हिंदू आतंकवादावर” शिकामोर्तब करून, समस्त “हिंदूंना” आतंकवादी घोषित केले
असते.
आताच काही
दिवसांपूर्वी दक्षिणी सुपरस्टार कमल हसन यांनी लिहलेल्या लेखाद्वारे पुन्हा एकदा
“हिंदू आतंकवाद” या वर वाद छेडला होता. भलेही काही दिवसांनी त्याने या वादावर
सारवासारव केली आणि वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. पण हा वाद आजचा नाही या आधी
पण “हिंदू आतंकवाद” किंवा “भगवा आतंकवाद” या वरून रणकंदन माजले आहे.
साधारण २००२
साली सर्वप्रथम पी चीतमबरम यांनी “भगवा आतंकवाद” याचा प्रथम उच्चार केला. त्या
नंतर २००५ ते २०१४ या कॉंग्रेस प्रणीत UPA सरकारच्या काळात अनेक वेळा पुन्हा “भगवा
आतंकवाद” किवा “हिंदू आतंकवाद” याचा फक्त उच्चारच नाही, तर त्या वर कारवाई पण केली
गेली....असे तत्कालीन सरकार कडून सांगण्यात आले. पण सरकार कधी त्याच्यावर “चार्ज
शीट” पण दाखल करू शकले नाही.
पण या कथा कथित “हिंदू
आतंकवादाला” समोर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. म्हणूनच
कदाचित हा “मुंबई हल्ला” नियोजित केला होता का? हा प्रश्न पडतो.
हा विषय थोडा वेगळा, पण खरच
भारतात असा कोणता “हिंदू आतंकवाद” आस्तीत्वाद आहे??हे कळण्यासाठी प्रथम आपल्याला
“आतंकवाद” म्हणजे काय? याची माहिती करून घ्यावी लागेल.
तसे भारताला “आतंकवाद” नवीन
नाहीये आणि आतंकवाद सरळ घातपात करतात असेही नाहीये. “राष्ट्रीय” आणि
“आंतरराष्ट्रीय” पटलावर आतंकवादाची अनेक रूपे बघायला मिळतात. त्या मुळेच असेल
कदाचित पण, ”सयुक्त राष्ट्र संघ” आतंकवादाची योग्य व्याख्या अद्याप करू शकले नाही.
या मुळेच भारतात कोणत्याही घटनेला “आतंकवाद” या वेस्टनात गुंडाळण्याचा प्रयत्न “पुरोगामी”
ब्रिगेड कडून होत असतो.
जरी “दहशदवादाची” अधिकृत
परिभाषा अजून बनली नसली तरी सर्वमान्य अशी त्याची “परिणामे” आहे, ते म्हणजे, “ एखाद्या शांतीपूर्ण समुहावर
स्वतःचे विचार प्रस्थापित करण्यासाठी दुसर्या समुहाकडून प्रचलित कायद्याला न
जुमानता “हिंसक प्रकाराद्वारे एखाद्या
धार्मिक, सांकृतिक आणि वैचारीक समुहाचे “भीती” आणि “उत्पिडन” या द्वारे
“आतंक” किवा “दहशद” निर्माण करायचा प्रयत्न होतो याला आपण “दहशदवाद” म्हणू शकतो.” आणि
असा भारतात कोणाकडून सतत प्रयत्न होतो हे
तर “जगजाहीर” आहे.
तर मग २६/११ च्या
हल्ल्याच्या वेळेस असे काय झाले होते कि याचा फायदा “पुरोगामी” घेणार होते? याचा
विचार करू. खर तर हा हल्ला होऊन ९ वर्षे झालीत. या काळात भारतात राजकीय सरकार पासून
जगाचा आतंकवादा कडे बघण्याच्या दृष्टीकोना पर्यंत खूप बदल झालेत तरी या हल्ल्याच्या
मागे अजून काही छुपा अजेंडा होता का याचा उलगडा होऊ शकला नाही.
या हल्ल्याची तयारी कारायला “जेम्स
हेडली” हा अमेरिकन नागरिक भारतात “मुंबईची रेकी” म्हणजे माहिती काढायला आला होता.
तेव्हा त्याला या मुंबईत फिरवणार्या लोकांमध्ये प्रसिद्ध “पुरोगामी” चित्रपट
निर्देशक महेश भट्ट यांचा मुलगा “राहुल भट्ट” हा होता. अमेरिकन FBI याने हेडली
याला पकडल्यावर त्याने कबूल केले कि, “राहुल भट्ट” त्याचा मित्र असून त्यानेच
सपूर्ण मुंबई त्याला फिरवली.
त्याच बरोबर या कटाची आखणी
करतांना पाठवण्यात येणाऱ्या आतंकवाद्यांना “हिंदू” लोकांप्रमाणेच “नमस्कार”
करण्याचे आणि हातात घालायला मंदिरात मिळतात तसे “लाल धागे” घालायला सांगितले होते
आणि आतंकवाद्यांनी तसे “धागे” घातलेही होते.
हा हल्ला २६ तारखेला रात्री
साधारण ८ वाजता सुरु झाल्यावर मुंबईत सगळीकडे अफरातफर आणि अफवांचा बाजार वाढू लागला
होता आणि ते स्वाभाविक होते. मुंबईत एकाच वेळी, छत्रपति
शिवाजी टर्मिनस, हॉटेल
ताज महाल पॅलेस अँड टॉवर,
हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा
हॉस्पिटल, नरीमन
हाउस, मेट्रो
सिनेमा, आणि टाइम्स
ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी
दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त
माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये
स्फोट झाला. एकाचवेळी इतक्या ठिकाणी हल्ला आणि पहिल्याच तासात अशोक कामटे,
हेमंत करकरे, विजय साळसकर, शशांक शिंदे यांच्या सारखे निडर पोलीस अधिकारी मृत्यूमुखी
पडल्याची माहिती बाहेर आल्यामुळे स्थिती अजूनच वाईट झाली होती. पण पहिली चांगली
बातमी एका वाईट बातमीच्या सोबत आली ती म्हणजे “तुकाराम ओंबळे” यांनी आपला जीव
पणाला लावून “नराधम कसाब” याला “जिवंत” पकडले आणि या पुढील “पुरोगाम्याच्या पटकथे”
तील हवा निघून गेली. “कसाब” याला जिवंत पकडल्यामुळे या हल्ल्यातील “लष्कर ए तोयबा”,
हाफिज सईद हा पाकीस्थान स्थित अतिरेकी, पाकिस्थानी गुप्तहेर संस्था ISI यांचा या
हल्ल्यातील हात पुढे आला. या नंतर पण २८/११/२००८ पर्यंत चाललेल्या या हल्ल्यात
मेजर उन्नीकृष्णन, हवालदार चंदर, हवालदार गजेंद्र सिंह बिश्ट या सारखे भारत मातेचे
सुपुत्र शहीद झाले.
या हल्ल्यामुळे भारतातीय
जनतेमध्ये संतापाची लहर आली आणि सरकारला जाब विचारल्या जाऊ लागला. पण या सगळ्या
घडामोडीत “पुरोगामी” नक्की काय करत होते?
तर ते या हल्ल्याला भारतातील
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” या हिंदू सांस्कृतिक संघटनेने हा “मुंबई हल्ला” घडवून
आणला हे पटवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु होता. सगळे पुरावे पाकीस्थान कडे बोट
दाखवत असतांना ह्याचा हा उलटा प्रवास सुरु होता कारण फक्त “हिंदू आतंकवाद” सिध्द
करायला.
या हल्ल्यात मारल्या गेलेले एक
पोलीस अधिकारी “शहीद हेमंत करकरे” यांच्यावर ‘हू किल्ड करकरे’ नावाचे पुस्तक काढून माजी पोलीस अधिकारी शमसुद्दीन
मुश्रीफ, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे–पाटील यांच्या सोबत महेश भट्ट आणि
काँग्रेसी नेते दिग्विजय सिंग हे पण यात सामील होते. या हल्ल्याला “हिंदू
आतंकवाद्यांनी” केलेला हल्ला सिध्द करायचा जीव तोडून प्रयत्न करत होते.
म्हणूनच म्हणतो कि “शहीद तुकाराम
ओंबळे” यांनी आपल्यावर “कसाब” याला जिवंत पकडून आपल्यावर अनंत उपकार केले आणि “हिंदू
आतंकवाद” हा शिक्का तुमच्या कपाळावर लागण्यापासून तुम्ही वाचवले.
आज २६/११ ला आपण इतर “शहीद पोलीस
अधिकारी, भारतीय सेनेचे कमांडो, अनेक भारतीय विदेशी जनसामान्य” यांना तर
श्रद्धांजली अर्पण करत आहोतच. पण “शहीद तुकाराम ओंबळे” यांना खर्च मनापासून श्रद्धांजली
अर्पण करून यांच्या सारखे “सुपुत्र” भारत मातेच्या पोटी जन्माला यावे हि अपेक्षा
करू.
Tukaram Ombale did a great service to Hindus
उत्तर द्याहटवा