वसीम रिझवी खटल्याच्या निमित्याने....!



शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात कुराण मधील २६ आयात (श्लोक) काढून टाकण्याच्या संदर्भात एक याचिका टाकली आहे. या याचिके वरून भारतीय मुस्लिम जनतेत नवीन वाद सुरू झाला आहे. इथे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे की जगभरात इस्लामची दोन भागात विभागणी झाली आहे, शिया आणि सुन्नी ! त्यातही सुन्नी मुस्लिम स्वतःला खरे मुस्लिम, श्रेष्ठ मुस्लिम म्हणून समोर आणत असतात, बहुतांश इस्लामी आतंकवादी संघटना या सुन्नी इस्लामी विचारांच्या आहेत आणि जगाला इस्लाममय करणे जसे त्यांचे ध्येय आहे तसेच शिया हीन करणे पण ध्येय आहे. जगभरात शिया आणि सुन्नी मुस्लिमांमधील वाद आहेत आणि त्याचे पडसाद आपल्या देशातील मुस्लिम मनांवर पण पडत असतात. भारतात गाजलेल्या राम जन्मभूमी मंदिराच्या प्रकरणात देशातील शिया वक्फ बोर्डाने हिंदूंची बाजू उचलून धरली होती, तर सुन्नी प्रखर विरोधात होते आणि आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वसीम रिजवी स्वतः शिया पंथीय मुस्लिम आहे हे महत्वाचे.


वसीम रिजवी यांचे म्हणणे आहे की कुराण मधील आपण सांगत असलेल्या २६ आयाती मध्ये दहशतवादी कृत्याला खतपाणी घालण्यासारखे विचार आहेत. त्याची शिकवण लहानपणा पासून मिळत असेल तर शिकणाऱ्याला इस्लाम व्यतिरिक्त धर्माबाबत द्वेष तयार होतो आणि तो कट्टरपंथीय व्हायची शक्यता जास्त असते. तेव्हा कुराण मधील तत्सम आयातींवर कायदेशीर बंदी आणावी.

पण इस्लामी विद्वानांच्या समजुतीनुसार संपूर्ण कुराण हे जसेच्या तसे अभ्यासावे, त्या मध्ये काहीही बदल करायला बंदी आहे. कारण कुराण प्रत्यक्ष देवाने मुहम्मद पैगंबरांना दिलेल्या आज्ञा आहेत. मात्र वसीम रिजवी यांच्या नुसार मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यू नंतर त्यांनी आपल्या जीवनात जे काही सांगितले ते पहिले खलिफा हजरत अबू बकर, दुसरे खलिफा हजरत उमर आणि तिसरे खलिफा हजरत उस्मान यांनी जमवून त्याचे पुस्तक रुपात लिहले ज्याला आपण कुराण म्हणतो. म्हजेच हे पैगंबरच्या मृत्यू नंतर लिहले आहे तेव्हा त्यात बदल करता येऊ शकतो असा रिजवी यांचा तर्क.

मात्र या नंतर देशातील मुस्लिमांमध्ये नवीन धार्मिक वाद सुरू झाला आहे. त्याची परिणीती म्हणजे देशातील सुन्नी मौलाना, इस्लामी अभ्यासक, विचारक वसीम रिझवी यांच्या विरोधात एकजूट होत आहेत. काही मुल्ला - मौलवींनी एक पत्रकार परिषद घेत वसीम रिझवी यांना धर्मातून बेदखल करण्याचा फतवा जाहीर केला आहे. पण काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील मुरदाबाद येथील एक नेता, जे मुरदाबाद बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते आणि प्रतिष्ठीत वकील अमीरुल हसन जाफरी यांनी तर एका कार्यक्रमात वसीम रिझवी यांचे डोके कापून जो आणेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले. या करता पैसे कमी पडले तर मी आपल्या मुलांना विकून पैसे उभे करेल मात्र डोके आणणाऱ्याला पैसे मात्र पूर्ण दिले जातील अशी पुष्टी पण जोडली.



या सगळ्या वादात मात्र या आयाती कोणत्या ? आणि त्याचा अर्थ नक्की काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तेव्हा आपण ते पण बघू.

१)  Verse 9 Surah 5 فَاِذَاانْسَلَخَالۡاَشۡهُرُالۡحُـرُمُفَاقۡتُلُواالۡمُشۡرِكِيۡنَحَيۡثُوَجَدْتُّمُوۡهُمۡوَخُذُوۡهُمۡوَاحۡصُرُوۡهُمۡوَاقۡعُدُوۡالَهُمۡكُلَّمَرۡصَدٍ​ ۚفَاِنۡتَابُوۡاوَاَقَامُواالصَّلٰوةَوَاٰتَوُاالزَّكٰوةَفَخَلُّوۡاسَبِيۡلَهُمۡ​ ؕاِنَّاللّٰهَغَفُوۡرٌرَّحِيۡمٌ

अर्थ: जेव्हा हराम (पवित्र) महिना संपेल तेव्हा मुश्रीकांना ते जिथे भेटतील तिथे कापून काढा. त्यांना घेरा, त्यांना पकडा आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवा, धाकात ठेवा. समजा ते शरण आले, त्यांनी नमाज अदा केला (इस्लाम स्वीकारला), जकात दिला ( इस्लामी नसल्याचे प्रायश्चित्त) तर त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. अल्लाह अत्यंत क्षमाशील आणि दयाळू आहे याची प्रचिती त्यांना येईल.

२) Verse 9 Surah 28 يٰۤاَيُّهَاالَّذِيۡنَاٰمَنُوۡۤااِنَّمَاالۡمُشۡرِكُوۡنَنَجَسٌفَلَايَقۡرَبُواالۡمَسۡجِدَالۡحَـرَامَبَعۡدَعَامِهِمۡهٰذَا​ ۚوَاِنۡخِفۡتُمۡعَيۡلَةًفَسَوۡفَيُغۡنِيۡكُمُاللّٰهُمِنۡفَضۡلِهٖۤاِنۡشَآءَ​ ؕاِنَّاللّٰهَعَلِيۡمٌحَكِيۡمٌ

अर्थ: हे श्रद्धावानांनो ! मुश्रीक तर फक्त अपवित्रच असतात. या वर्षा नंतर त्यांना पवित्र मशिदी जवळ (काबा) येऊ देऊ नका आणि तुम्हाला समजा आपण निर्धन होऊ अशी भीती वाटत असेल, जर नंतर अल्लाहला वाटले तर तो आपल्या कृपेने तुम्हाला समृद्ध बनवेल. निश्चितच अल्लाह संपूर्ण गोष्टींचा जाणकार आहे, अत्यंत आस्तिक आहे.


३) Verse 4 Surah 101 وَاِذَاضَرَبۡتُمۡفِىالۡاَرۡضِفَلَيۡسَعَلَيۡكُمۡجُنَاحٌاَنۡتَقۡصُرُوۡامِنَالصَّلٰوةِ ​ۖاِنۡخِفۡتُمۡاَنۡيَّفۡتِنَكُمُالَّذِيۡنَكَفَرُوۡا​ ؕاِنَّالۡـكٰفِرِيۡنَكَانُوۡالَـكُمۡعَدُوًّامُّبِيۡنًا‏

अर्थ: आणि जेव्हा तुम्ही पृथ्वीवर प्रवासाला निघाल तेव्हा नमाज छोटी करणे हा काही गुन्हा होत नाही. पण समजा तुम्हाला या गोष्टींचे भय आहे की विधर्मी लोक तुम्हाला त्रास देतील, कष्ट देतील, तर लक्षात घ्या निश्चितपणे विधर्मी आपले शत्रू आहेत.

४) Verse 9 Surah 123 يٰۤـاَيُّهَاالَّذِيۡنَاٰمَنُوۡاقَاتِلُواالَّذِيۡنَيَلُوۡنَكُمۡمِّنَالۡكُفَّارِوَلۡيَجِدُوۡافِيۡكُمۡغِلۡظَةً​ ؕوَاعۡلَمُوۡاۤاَنَّاللّٰهَمَعَالۡمُتَّقِيۡنَ

अर्थ: हे विश्वास ठेवणाऱ्यांनो ! त्या विरोध करणाऱ्या लोकांसोबत लढा जे तुमच्या जवळ आहे आणि त्यांना जाणवू द्या की तुम्ही बळकट आहात आणि जाणून घ्या ज्यांना अल्लाहचे भय आहे अल्लाह त्यांच्या सोबत आहे.

५) Verse 4 Surah 56 اِنَّالَّذِيۡنَكَفَرُوۡابِاٰيٰتِنَاسَوۡفَنُصۡلِيۡهِمۡنَارًاؕكُلَّمَانَضِجَتۡجُلُوۡدُهُمۡبَدَّلۡنٰهُمۡجُلُوۡدًاغَيۡرَهَالِيَذُوۡقُواالۡعَذَابَ​ ؕاِنَّاللّٰهَكَانَعَزِيۡزًاحَكِيۡمًا‏

अर्थ: ज्या लोकांनी आमची आयातांना (श्लोकांना) विरोध केला त्यांना आम्ही लवकरच आगीत फेकू. जेव्हा आगीत त्यांची कातडी जळेल, तेव्हा आम्ही त्यांना नवीन कातडीत टाकू जेणे करून ते सतत, अनंत काळा पर्यंत छळ सोसत राहतील. नी:संदेह अल्लाह प्रबळ आणि स्वतःचे प्रभुत्व प्रस्थापित करणारा आहे.

६) Verse 9 Surah 23 يٰۤاَيُّهَاالَّذِيۡنَاٰمَنُوۡالَاتَتَّخِذُوۡۤااٰبَآءَكُمۡوَاِخۡوَانَـكُمۡاَوۡلِيَآءَاِنِاسۡتَحَبُّواالۡـكُفۡرَعَلَىالۡاِيۡمَانِ​ ؕوَمَنۡيَّتَوَلَّهُمۡمِّنۡكُمۡفَاُولٰۤـئِكَهُمُالظّٰلِمُوۡنَ‏

अर्थ: हे विश्वास ठेवणाऱ्यांनो ! आपल्या वडील आणि भावा सोबत पण चांगले संबंध ठेऊ नका ज्यांचा विश्वासा (इस्लाम) पेक्षा कुफ्र (इस्लाम व्यतिरिक्त किंवा पाप) जास्त प्रिय आहे. तुमच्या पैकी कोणी त्यांना आपला मित्र - संबंधी मानत असतील तर तुम्हीच अत्याचारी असाल हे लक्षात घ्या.

७) Verse 9 Surah 37 اِنَّمَاالنَّسِىۡٓءُزِيَادَةٌفِىالۡكُفۡرِ​ يُضَلُّبِهِالَّذِيۡنَكَفَرُوۡايُحِلُّوۡنَهٗعَامًاوَّيُحَرِّمُوۡنَهٗعَامًالِّيُوَاطِـُٔـوۡاعِدَّةَمَاحَرَّمَاللّٰهُفَيُحِلُّوۡامَاحَرَّمَاللّٰهُ​ ؕزُيِّنَلَهُمۡسُوۡۤءُاَعۡمَالِهِمۡ​ ؕوَاللّٰهُلَايَهۡدِىالۡقَوۡمَالۡـكٰفِرِيۡنَ

अर्थ: (सन्माननिय महिने) काढून टाकणे हे तर फक्त पापाची वृद्धी करण्यासारखे आहे. कोणत्या वर्षाला ते हलाल (कायदेशीर) ठरवतात आणि कोणत्या वर्षाला हराम (पवित्र) जेणे करून अल्लाहने उद्धृत केलेल्या महिन्यांची संख्या पूर्णत्वास जाईल आणि या प्रकारे अल्लाहने हराम केलेल्याला ते कायदेशीर ठरवतील. त्याचे आपले वाईट कर्म त्यांच्या करता चांगले असतील आणि अल्लाह विरोध करणाऱ्यांना सरळ मार्ग कधीही दाखवत नाही.

८)  Verse 5 Surah 57 يٰۤـاَيُّهَاالَّذِيۡنَاٰمَنُوۡالَاتَـتَّخِذُواالَّذِيۡنَاتَّخَذُوۡادِيۡنَكُمۡهُزُوًاوَّلَعِبًامِّنَالَّذِيۡنَاُوۡتُواالۡكِتٰبَمِنۡقَبۡلِكُمۡوَالۡـكُفَّارَاَوۡلِيَآءَ​ ۚوَاتَّقُوااللّٰهَاِنۡكُنۡتُمۡمُّؤۡمِنِيۡ

अर्थ: हे विश्वास ठेवणाऱ्यांनो ! तुमच्या पहिले ज्यांना पुस्तक दिल्या गेले होते, ज्यांनी तुमच्या धर्माला हास्यास्पद बनवले, त्यांना आणि ज्यांनी नाकारले त्यांना कधीही आपला मित्र-संबंधी बनवू नका आणि अल्लाहची भीती ठेवा जर तुम्ही विश्वास ठेवत असाल.

९)  Verse 33 Surah 61 مَّلۡـعُوۡنِيۡنَ ​ۛۚاَيۡنَمَاثُقِفُوۡۤااُخِذُوۡاوَقُتِّلُوۡاتَقۡتِيۡلً

अर्थ: तंदुरुस्त असणे आवश्यक आहे ! जिथे जिथे सापडेल तेथे ते पकडले जातील आणि कठोरपणे मारले जातील.

१०) Verse 21 Surah 98 اِنَّكُمۡوَمَاتَعۡبُدُوۡنَمِنۡدُوۡنِاللّٰهِحَصَبُجَهَـنَّمَؕاَنۡـتُمۡلَهَاوَارِدُوۡنَ

अर्थ: निश्चितच तुम्ही आणि ते जे अल्लाह सोडून इतरांना पूजतात ते नरकाचे इंधन आहे. तुम्ही तिथेच जाणार.

११) Verse 32 Surah 22 وَمَنۡاَظۡلَمُمِمَّنۡذُكِّرَبِاٰيٰتِرَبِّهٖثُمَّاَعۡرَضَعَنۡهَا​ؕاِنَّامِنَالۡمُجۡرِمِيۡنَمُنۡتَقِمُوۡنَ

अर्थ: आणि त्या व्यक्ती पेक्षा जास्त दुराचारी कोण असेल ज्याला त्याच्या रबच्या (ईश्वराच्या) आयातीद्वारे (श्लोकांद्वारे) आठवण देऊन सुद्धा, जो त्याच्या कडे दुर्लक्ष करतो? निश्चितच अश्या अपराध्या सोबत आम्ही बदला घेऊ.

१२) Verse 48 Surah 20 وَعَدَكُمُاللّٰهُمَغَانِمَكَثِيۡرَةًتَاۡخُذُوۡنَهَافَعَجَّلَلَكُمۡهٰذِهٖوَكَفَّاَيۡدِىَالنَّاسِعَنۡكُمۡ​ۚوَلِتَكُوۡنَاٰيَةًلِّلۡمُؤۡمِنِيۡنَوَيَهۡدِيَكُمۡصِرَاطًامُّسۡتَقِيۡمًاۙ

अर्थ: अल्लाह ने तुमच्या साठी अनेक बक्षिसांची लयलूट करण्याचे वचन दिले आहे, जी तुम्हाला प्राप्त होतील. या विजयाचे तर त्याने (ईश्वराने) तुमच्यासाठी तत्काळ निश्चिती केली आहे. आणि त्यांचे हात तुमच्याकडे येण्या पासून थांबवा (जेणे करून ते आक्रमण करण्याचे साहस एकवटू शकणार नाही) आणि जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्या करता एक चिन्ह ठरेल आणि तो (ईश्वर) तुम्हाला सरळ मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करेल.

१३) Verse 8 Surah 69 فَكُلُوۡامِمَّاغَنِمۡتُمۡحَلٰلاًطَيِّبًاۖوَّاتَّقُوااللّٰهَ​ ؕاِنَّاللّٰهَغَفُوۡرٌرَّحِيۡمٌ

अर्थ: अंततः आपल्या प्रतिफळाच्या रूपाने आपल्याला जे काही मिळाले आहे त्याला कायदेशीर आणि पवित्र समजून ग्रहण करा आणि अल्लाहची भीती बाळगा. निश्चितच अल्लाह मोठा क्षमाशील आणि दयाळू आहे.

१४) Verse 66 Surah 9 يٰۤاَيُّهَاالنَّبِىُّجَاهِدِالۡكُفَّارَوَالۡمُنٰفِقِيۡنَوَاغۡلُظۡعَلَيۡهِمۡ​ؕوَمَاۡوٰٮهُمۡجَهَنَّمُ​ؕوَبِئۡسَالۡمَصِيۡرُ ‏

अर्थ: ऐ नबी ! जे विरोध करतात आणि जे कठोरपणे वागतात त्यांच्या सोबत जिहाद (धर्मयुद्ध) करा आणि त्यांच्या सोबत कठोरतेने वागा. त्याची जागा नरकात आहे आणि त्यांना शेवटी त्या अत्यंत वाईट ठिकाणी पोहचायचे आहे.

१६)  Verse 41 Surah 27 فَلَـنُذِيۡقَنَّالَّذِيۡنَكَفَرُوۡاعَذَابًاشَدِيۡدًاۙوَّلَنَجۡزِيَنَّهُمۡاَسۡوَاَالَّذِىۡكَانُوۡايَعۡمَلُوۡنَ‏

अर्थ: शेवटी ज्यांनी आम्हाला नाकारले, त्यांना कठोर यातना देऊ आणि आम्ही त्यांनी केलेल्या सगळ्या वाईट कृत्याचा बदला घेऊ.

१६) Verse 41 Surah 28 ذٰلِكَجَزَآءُاَعۡدَآءِاللّٰهِالنَّارُ​ ۚلَهُمۡفِيۡهَادَارُالۡخُـلۡدِ​ ؕجَزَآءًۢبِمَاكَانُوۡابِاٰيٰتِنَايَجۡحَدُوۡنَ‏

अर्थ: हा अल्लाहच्या शत्रूंच्या सुडाचा अग्नी आहे. हेच त्यांचे घर आहे, याचाच बदल्यात ते आमच्या आयताचा विरोध करतात.

१७) Verse 9 Surah 111 اِنَّاللّٰهَاشۡتَرٰىمِنَالۡمُؤۡمِنِيۡنَاَنۡفُسَهُمۡوَاَمۡوَالَهُمۡبِاَنَّلَهُمُالۡجَـنَّةَ​ ؕيُقَاتِلُوۡنَفِىۡسَبِيۡلِاللّٰهِفَيَقۡتُلُوۡنَوَيُقۡتَلُوۡنَ​وَعۡدًاعَلَيۡهِحَقًّافِىالتَّوۡرٰٮةِوَالۡاِنۡجِيۡلِوَالۡقُرۡاٰنِ​ ؕوَمَنۡاَوۡفٰىبِعَهۡدِهٖمِنَاللّٰهِفَاسۡتَـبۡشِرُوۡابِبَيۡعِكُمُالَّذِىۡبَايَعۡتُمۡبِهٖ​ؕوَذٰلِكَهُوَالۡفَوۡزُالۡعَظِيۡمُ

अर्थ: निःसंशयपणे अल्लाहने विश्वास ठेवणाऱ्यांचे प्राण आणि मिळकत याच्या बदल्यात विकत घेतली आहे, की त्यांना स्वर्गात जागा मिळणार आहे. ते अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी लढतात, तेव्हा ते मारतात पण आणि मरतात. हा त्यांच्यासाठी ज़िम्मे तौरात, इनजील आणि कुराण मध्ये केलेले पक्के वचन आहे आणि आपले वचन पूर्ण करणारा अल्लाह पेक्षा दुसरा कोण असू शकतो? तेव्हा आपल्या त्या करारावर खुश व्हा, जो करार त्याने (अल्लाह) ने तुमच्या सोबत केला आहे आणि हीच सगळ्यात मोठी सफलता आहे.

१८) Verse 9 Surah 58 وَمِنۡهُمۡمَّنۡيَّلۡمِزُكَفِىالصَّدَقٰتِ​ ۚفَاِنۡاُعۡطُوۡامِنۡهَارَضُوۡاوَاِنۡلَّمۡيُعۡطَوۡامِنۡهَاۤاِذَاهُمۡيَسۡخَطُوۡنَ‏

अर्थ: आणि त्यांच्यातील(विश्वास न ठेवणारे) काही लोक तुम्हाला मिळालेल्या (ईश्वरा कडून) उपहारा विषयी तुम्हाला चिडवतील, तुमच्या श्रध्येवर घाला घालतील. परंतु त्यांना त्या उपहारातील काही मिळाले तर ते प्रसन्न होतील आणि समजा त्यांना त्यांच्यातील काहीही दिल्या गेले नाही तर बघावे लागेल की ते क्रोधीत होतील.

१९) Verse 8 Surah 65 يٰۤـاَيُّهَاالنَّبِىُّحَرِّضِالۡمُؤۡمِنِيۡنَعَلَىالۡقِتَالِ​ ؕاِنۡيَّكُنۡمِّنۡكُمۡعِشۡرُوۡنَصَابِرُوۡنَيَغۡلِبُوۡامِائَتَيۡنِ​ ۚوَاِنۡيَّكُنۡمِّنۡكُمۡمِّائَةٌيَّغۡلِبُوۡۤااَلۡفًامِّنَالَّذِيۡنَكَفَرُوۡابِاَنَّهُمۡقَوۡمٌلَّايَفۡقَهُوۡنَ

अर्थ: हे नबी ! माझ्या विश्वासू धर्मनिष्ठा राखणाऱ्यांना (मोमीन) धर्मयुद्ध (धर्मयुद्ध) करायला प्रोत्साहित कर. जर तुम्ही वीस लोक जमवले तर ते त्यांच्या दोनशे लोकांवर प्रभावी पडतील, जर तुम्ही असे शंभर असाल तर नाकारण्याऱ्या एक हजार लोकांवर प्रभावी रहाल, कारण ते (नाकारणारे) मूर्ख लोक आहेत.

२०) Verse 5 Surah 51 يٰۤـاَيُّهَاالَّذِيۡنَاٰمَنُوۡالَاتَتَّخِذُواالۡيَهُوۡدَوَالنَّصٰرٰۤىاَوۡلِيَآءَ ​ۘبَعۡضُهُمۡاَوۡلِيَآءُبَعۡضٍ​ؕوَمَنۡيَّتَوَلَّهُمۡمِّنۡكُمۡفَاِنَّهٗمِنۡهُمۡ​ؕاِنَّاللّٰهَلَايَهۡدِىالۡقَوۡمَالظّٰلِمِيۡنَ

अर्थ: हे विश्वास ठेवणाऱ्यांनो ! तुम्ही यहुदी आणि ईसाइ लोकांना आपले मित्र (राजदार) बनवू नका. ते तुमच्या विरुद्ध एकमेकांचे मित्रच आहे. तुमच्या पैकी जो कोणी त्यांना आपला मित्र बनवेल, तो त्यांच्या पैकीच एक मानल्या जाईल. निःसंशय अल्लाह अत्याचाराला मार्ग दाखवत नाही.

२१) Verse 9 Surah 29 قَاتِلُواالَّذِيۡنَلَايُؤۡمِنُوۡنَبِاللّٰهِوَلَابِالۡيَوۡمِالۡاٰخِرِوَلَايُحَرِّمُوۡنَمَاحَرَّمَاللّٰهُوَرَسُوۡلُهٗوَلَايَدِيۡنُوۡنَدِيۡنَالۡحَـقِّمِنَالَّذِيۡنَاُوۡتُواالۡـكِتٰبَحَتّٰىيُعۡطُواالۡجِزۡيَةَعَنۡيَّدٍوَّهُمۡصٰغِرُوۡنَ

अर्थ: जे आपला विश्वास अल्लाहवर ठेवत नाही, ना अंतिम दिवसावर आणि जे अल्लाह आणि अल्लाहच्या दूताने (रसूल) हराम ठरवलेल्याला हराम मानत नाही आणि ना सत्यधर्माचे आचरण करत, त्यांच्या सोबत लढा द्या, इथपर्यंत लढा की सत्तेपासून वेगळे होत छोट्या छोट्या समूहात विभागले जातील, गौण बनतील आणि जिझिया (धर्म कर) देण्यास बाध्य होतील.

२२) Verse 5 Surah 14 وَمِنَالَّذِيۡنَقَالُوۡۤااِنَّانَصٰرٰٓىاَخَذۡنَامِيۡثَاقَهُمۡفَنَسُوۡاحَظًّامِّمَّاذُكِّرُوۡابِهٖفَاَغۡرَيۡنَابَيۡنَهُمُالۡعَدَاوَةَوَالۡبَغۡضَآءَاِلٰىيَوۡمِالۡقِيٰمَةِ​ ؕوَسَوۡفَيُنَبِّئُهُمُاللّٰهُبِمَاكَانُوۡايَصۡنَعُوۡنَ‏

अर्थ: आणि आम्ही त्या लोकांकडून पण एक दृढ वचन घेतले होते जे स्वतःला नसारा (ख्रिश्चन) म्हणवून घेतात, परंतु जे काही त्यांना आठवायला हवे होते त्यातील मोठा भाग ते विसरून गेले आहे. त्यामुळे आम्ही जगाच्या शेवटापर्यंत (कयामत) त्यांच्या करता शत्रूता आणि द्वेषाची आग भकवली आहे आणि अल्लाह त्यांना लवकरच सांगतील जे काही त्यांनी सांगितले होते.

२३)  Verse 4 Surah 89 وَدُّوۡالَوۡتَكۡفُرُوۡنَكَمَاكَفَرُوۡافَتَكُوۡنُوۡنَسَوَآءً​ فَلَاتَتَّخِذُوۡامِنۡهُمۡاَوۡلِيَآءَحَتّٰىيُهَاجِرُوۡافِىۡسَبِيۡلِاللّٰهِ​ ؕفَاِنۡتَوَلَّوۡافَخُذُوۡهُمۡوَاقۡتُلُوۡهُمۡحَيۡثُوَجَدتُّمُوۡهُمۡ​وَلَاتَتَّخِذُوۡامِنۡهُمۡوَلِيًّاوَّلَانَصِيۡرًا

अर्थ: त्यांना (विश्वास नसणाऱ्यांना) वाटते की ज्या प्रमाणे ते स्वतः दुराचारी अधर्मी आहेत तसेच तुम्ही पण बनावे. तेव्हा तुम्ही त्यांना स्वतःचे मित्र बनवू नका, जो पर्यंत ते अल्लाहने सांगितल्या प्रमाणे देशोधडीला लागत नाही. नंतर पण त्यांनी विश्वास ठेवायला नकार दिला तर जिथे कुठे ते पकडल्या जातील तिथे त्यांना पकडा आणि त्यांचा खून करा. त्यांना ना आपला मित्र बनवा, ना साथीदार.

२४) Verse 9 Surah14 قَاتِلُوۡهُمۡيُعَذِّبۡهُمُاللّٰهُبِاَيۡدِيۡكُمۡوَيُخۡزِهِمۡوَيَنۡصُرۡكُمۡعَلَيۡهِمۡوَيَشۡفِصُدُوۡرَقَوۡمٍمُّؤۡمِنِيۡنَۙ ‏

अर्थ: त्यांच्या सोबत (विश्वास न ठेवणाऱ्या) लढा. अल्लाह तुमच्या हातून त्यांना यातना देईल आणि अपमानित करेल आणि त्यांच्या विरुद्ध तो (ईश्वर) तुम्हाला सहाय्य करेल आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या अंतःकरणातील दुःखाचे हरण करेल.

२५) Verse 3 Surah 151 سَنُلۡقِىۡفِىۡقُلُوۡبِالَّذِيۡنَكَفَرُواالرُّعۡبَبِمَاۤاَشۡرَكُوۡابِاللّٰهِمَالَمۡيُنَزِّلۡبِهٖسُلۡطٰنًا ​​ۚوَمَاۡوٰٮهُمُالنَّارُ​ؕوَبِئۡسَمَثۡوَىالظّٰلِمِيۡنَ

अर्थ: आम्ही लवकरच आम्हाला नाकारणाऱ्या लोकांच्या मनात धाक निर्माण करू, कारण त्यांनी अल्लाहची साक्ष म्हणून अश्या गोष्टी घोषित केल्या ज्याचा काहीही संबंध नाही आणि त्यांचा अंतिम पडाव नरकातील (जहनम) मधील आगच आहे आणि अत्याचारी लोकांकरिता अजून कोणते वाईट ठिकाण असणार आहे.

२६) Verse 2 Surah 191 وَاقۡتُلُوۡهُمۡحَيۡثُثَقِفۡتُمُوۡهُمۡوَاَخۡرِجُوۡهُمۡمِّنۡحَيۡثُاَخۡرَجُوۡكُمۡ​ وَالۡفِتۡنَةُاَشَدُّمِنَالۡقَتۡلِۚوَلَاتُقٰتِلُوۡهُمۡعِنۡدَالۡمَسۡجِدِالۡحَـرَامِحَتّٰىيُقٰتِلُوۡكُمۡفِيۡهِ​ۚفَاِنۡقٰتَلُوۡكُمۡفَاقۡتُلُوۡهُمۡؕكَذٰلِكَجَزَآءُالۡكٰفِرِيۡنَ

अर्थ: आणि जिथे कुठे त्यांच्या वर नियंत्रण स्थापित कराल, खून करा आणि त्यांना तेथून बाहेर काढा जिथून त्यांनी तुम्हाला काढले किंवा येऊ दिले नाही. कारण फितना (उपद्रव) हा खून करण्यापेक्षा भयंकर गुन्हा आहे. परंतु पवित्र मशिदीच्या (काबा) जवळ तुम्ही त्यांच्या सोबत लढू नका, जो पर्यंत ते स्वतः तुमच्या सोबत तेथे येऊन युद्ध करत नाहीत. शेवटी जर ते तुमच्या सोबत युद्ध करतच असतील तर त्यांना मारा, त्यांचा खून करा, नाकारणाऱ्यांचा विरुद्ध घेतलेला बदला हाच आहे.



आता तुम्हीच विचार करा की या आयाती बद्दल वसीम रिझवी यांचे मत बरोबर आहे की चूक ! मात्र जागतिक स्तरावर पण काही बुद्धिवादी वसीम रिझवी यांच्याच मताचे आहेत. अभ्यासकांच्या मते मध्यपूर्वेतून युरोप आणि आता जगभरात आपले अस्तित्व दाखवणाऱ्या इसिस या अतिरेकी संघटनेच्या वैचारिक जडणघडणीत कुराण मधील वरील २६ आयतींचा खूप मोठा वाटा आहे. फ्रांसने तर आपल्या देशात वाढत असलेल्या इस्लामी आतंकवाद आणि कट्टरतेला लगाम घालण्यासाठी बनविलेल्या नवीन कायद्यात कुराण मधील काही आयतींवर बंदी वगैरे घातली नसली तरी कुराणचा शिकवताना कोणत्या अर्थाने शिकवायचा यावर मात्र सरकारी बंधने घातली आहेत. मुस्लिम कट्टरपंथीयांसाठी असा कायदा करणे पण धर्मावर बंधने आणण्यासारखेच आहे.



या सगळ्या न्यायालयीन भांडणाचा देशातील मुस्लिमांमध्ये नक्की काय वाद सुरू आहे ते आपण बघितले, मात्र देशातील बहुसंख्य असलेल्या लोकांचे या बद्दल मत काय? विशेषतः देशाची धार्मिक आधारावर झालेल्या फाळणी विरोधात असणाऱ्या, इस्लामी आतंकवाद आणि मुस्लिमांचा वाढता कट्टरतावादावर सतत आग ओतणाऱ्या हिंदुत्वाच्या बाजूचे राजकीय पक्ष आणि संघटना सध्या तरी या वर तोंडात मिठाची गुळणी करून बसले आहेत. गंमत म्हणजे केरळ मधील शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशासाठी मुस्लिम महिलांनी जेव्हा न्यायालयाची पायरी चढली होती तेव्हा इस्लाम मधील चुकीच्या गोष्टीवर मोठ्या आवाजात गप्पा मारणारे हिंदू नेते आज मात्र योग्य कारणा साठी वसीम रिझवी यांच्या पाठी पण उभे असलेले दिसत नाही. इतकेच नाही तर भाजपाचे बिहार मधील मुस्लिम नेते शहनवाज हुसेन तर उघडपणे वसीम रिझवी यांच्या विरोधात समोर आले आहेत. त्यांनी कुराण मध्ये असे कोणतेही बदल करण्याला विरोध करत रिझवी यांच्यावर टीका केली आहे. हिंदू धर्मातील खऱ्या खोट्या पद्धतीवर टीका करत हिंदू धर्माला सतत एका विशिष्ठ मानसिकतेने दूषणे देणारे पण या विषयात शांत आहेत. इतकेच काय तर स्वतःला नास्तिक असल्याचे प्रमाणपत्र स्वतःच देणारे आणि जगातील सगळ्या धर्माची शिकवण चुकीची आहे असे सांगत देशातील बहुसंख्याकांच्या श्रध्येची खिल्ली उडवणाऱ्या, त्या श्रद्धांना सतत देशाकरता, देशातील सर्वधर्मसमभावाकरता संकट मानणाऱ्या तथाकथित पुरोगामी-लिबरल्स, डावे विचारवंत पण शांतच आहेत, नव्हे तर या वादाशी आपला काही संबंधच नाही या पद्धतीने नामानिराळे आहेत.

पण स्वतःला पुरोगामी मुस्लिम म्हणवून घेणारे, मुस्लिम धर्मसुधारणेचे नाटक करणारे आणि मुस्लिमांमधील वाढत्या कट्टरपंथाला भारतातील बहुसंख्यकांना जवाबदार मानणारे मुस्लिमांमधील तथाकथित सत्यशोधक पण या विषयावर बोलायला तयार नाहीत. खरे तर त्यांनी धर्म सुधारणेसाठी तरी वसीम रिझवी यांना साथ द्यायला हवी होती.

आता इतके सगळे वाचल्यावर विचार करा की आपण देशातील तथाकथित "गंगा-जमुनीं तहजीब" च्या भ्रमात आपल्या प्रभू श्री राम यांना "इमाम ए हिंद" सारख्या दुय्यम पदव्या ग्राह्य धरत शांत राहायचे, की वसीम रिझवी सारख्या धर्म सुधारणेची कास धरत संविधनानुसार न्यायिक लढा देणाऱ्या सोबत उभे राहत सगळे धर्म समान पातळीवर आणणाऱ्या लढ्याला साथ द्यायची.





टिप्पण्या