धार्मिक क्रॉसचे पतन आणि पुरोगाम्यांचा विलाप



बघा हे असे असते आता क्रॉस वाला झेंडा बदलण्याचे दुःख झालेले पुरोगामी शेणाचा गोळा घेऊन सारवासारव करायला बसले आहेत. वाजपेयींच्या काळात बदललेला झेंडा रद्द करून जुना झेंडा वाजपेयी यांनीच वापस आणला हा त्यांचा मुद्दा...बाकी वाजपेयींना त्यांच्या मवाळ स्वभावामुळे काँग्रेसी आणि डाव्या इको सिस्टीमने भरलेल्या नोकरशाहीने कसे नाचवले हा वेगळा विषय होईल. पण निदान तारखा देतांना तर थोडी तत्कालीन परिस्थिती लक्षात घ्यावी, तोंडघशी पडायला होत नाही.


तर पुरोगामी पोस्ट पुढील प्रमाणे, ज्यात खोटे बोलणे आणि रेटून बोलणे इतके बेमालूनपणे आहे...जी मी विश्वंभर चौधरी यांच्या वॉल वर वाचली होती, मात्र या पुरोगाम्यांने मला प्रश्न विचारतो म्हणून बाहेर हकलले आहे, प्रश्नांची उत्तरे न देता, म्युट करणे, ब्लॉक करणे ही पुरोगामी पद्धत...आता एका वेड्याने मला माझ्या "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" च्या पोस्टवर प्रतिक्रियेत दिली. ती पोस्ट आणि त्यावरील उत्तर.....

----------------------------------

लावलेले दिवे नौदलाचा ध्वज आणि भाजप आयटीसेलचा खोटारडेपणा

ऑप इंडिया सारख्या हरामखोर पोर्टलपासून ते भाजपच्या आयटी सेलपर्यंत सगळे नौसेनेच्या जुन्या ध्वज निशाणीमधील सेंट जॉर्ज क्रॉसवरून धर्मांध राजकारण करू पाहत आहेत, म्हणून त्यांचा खोटारडेपणा उघड पाडायला हे लिहावं लागतंय.

१९५०मध्ये नौसेनेच्या ध्वजावर युनियन जॅक ऐवजी तिरंगा आणल्यानंतर १५ ऑगस्ट २००१ पर्यंत त्यावरचा सेंट जॉर्ज क्रॉस तसाच होता.  १९७०च्या दशकात हे निशाण बदलण्याची सूचना तत्कालीन व्हाईस ऍडमिरल व्हिव्हियन बार्बोझा यांनी केली होती. ती २००१मध्ये अंमलात आणण्यात आली. मात्र निळा रंग खोल समुद्रात गेल्यावर वेगळेपणाने ओळखण्यास अडचण येते आणि त्यामुळं अशा नौकेची ओळख पटवण्यास अडचण येऊ शकते असं नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर २५ एप्रिल २००४रोजी म्हणजे वाजपेयी प्रधानमंत्री असलेल्या रालोआच्या सरकारच्या काळातच आणि २२मे २००४ला डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली संपुआचं सरकार स्थापन व्हायच्या आधी जवळपास एक महिना हे निशाण पुन्हा बदलण्यात आलं. म्हणजे सेंट जॉर्ज क्रॉस वाजपेयींनीच पुन्हा नौसेनेच्या ध्वजावर आणला होता. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आयएनएस तारंगिणी विश्वप्रवासाहून परल्याबद्दल कोचीमध्ये झालेल्या एका समारंभात हे निशाण असलेला ध्वज भारतीय नौसेनासाठी अनावृत्त केलेला.

Abhishek Sharad Mali  यांची पोस्ट

------------------------------------

आता दिलेले उत्तर :- Jagannath Kakde Patil मी कुठेही असे म्हंटले नाहीये की काँग्रेसने पुन्हा क्रॉस आणला, मी असे लिहले आहे की, "क्रॉस वापस आला त्याचे कारण काँग्रेस असल्याचे अनेकांना वाटते." सोबत वाजपेयी यांचा झेंडा बदलावतांना दिलेले कारण मला हास्यास्पद वाटते. कारण झेंड्याच्या पार्श्वभागाचा रंग हा गडद निळा असल्याचा आणि त्या मुळे खोल समुद्रात झेंडा ओळखतांना त्रास होण्याचे कारण देण्यात आले. मात्र फक्त झेंड्याच्या पार्श्वभागाचा रंग पांढरा करण्याचे का सुचवण्यात आले नाही?

नौसेना अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्या नंतर दिनांक २५ एप्रिल २००४ रोजी म्हणजे वाजपेयी पंतप्रधान असतांना तो झेंडा बदलल्या गेला असा दावा करण्यात आला आहे. आता २००४ साली लोकसभेच्या निवडणुका २० एप्रिल २००४ पासून १० मे २००४ पर्यंत चार टप्प्यात घेण्यात आल्या. म्हणजे जेव्हा निवडणुका घोषित झाल्या किंवा सुरू झाल्या तेव्हा आपली समस्या सरकारला नौसेनेने कळवली, या परिस्थिती सरकार कोणताही धोरणात्मक निर्णय किंवा ज्यातून सरकारचा फायदा होऊ शकेल निर्णय घेऊ शकत नाही. त्या परिस्थितीत सरकारला एक तर जुन्या झेंड्यावर वापस जाणे आणि नवीन सरकार आल्यावर पुन्हा निर्णय घेणे इतकेच शक्य होते.

दुर्दैवाने वाजपेयी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नाही.

पण या सगळ्या भंपक लेखनात हा मुद्दा कुठे आहे की, "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" चे निशाण बदलवायला १९४७ ते १९७० कोणत्या सरकारने काय प्रयत्न केले? पुन्हा स्वतःच मान्य करत आहेत की १९७० साली व्हाईस एडमिरल व्हीव्हीयन बार्बोझ यांनी सरकारला झेंडा बदलण्याचे सूचना केली होती, मग १९७० ते २००१ ती कोणीत्याही सरकारने मनावर का घेतली नाही?

बरे मनमोहनसिंग सरकारने क्रॉस वाला झेंडा कायम ठेवला नाही तो वाजपेयी सरकारच्या काळात झाला हे जरी मान्य केले तरी, वाजपेयी यांनी झेंडा बदलावला होता, त्या आधी १९७० पासून झेंडा बद्दलवायची मागणी होती आणि पुन्हा क्रॉस वाला जुना झेंडा आणायचे रंगाचे कारण पण मनमोहनसिंग यांना माहीत होते तरीही, मनमोहनसिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात या बाबतीत झोपच काढली ती का? निदान तेव्हा तरी हातपाय हलवले असते तर आता शेणाचा गोळा घेऊन बसायची गरज नव्हती. म्हणजे १९५० ते २००१ आलेली सगळी सरकारे या बाबतीत झोपली होती आणि २००४ ते २०१४ ही वर्षे पण सरकारे झोपलीच होती हे तुम्ही स्वतः मान्य करत आहात. एक तर हे धार्मिक चिन्ह आहे हे सरकारला माहीत नव्हते किंवा नेमके तेच नाहीत असल्यामुळे सरकारने ते चिन्ह बदलायची तसदी घेतली नाही...नक्की काय खरे ते सांगा?

---------------------------------

एकूण काय तर....या पुरोगाम्यांना दुःख फक्त नौसेनेचा झेंडा बदलल्याचे, त्यावरील क्रॉसचे धार्मिक चिन्ह बदलण्याचे नसून, दुःख याचे आहे की माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निर्मळ स्वभाव असलेल्या माणसाला काहीतरी कारण देत पुन्हा बदललेला क्रॉस वाला झेंडा वापस आणता आला होता.

मात्र या मोदींनी क्रॉस वाला झेंडा हद्दपार केलाच, पुन्हा त्यात अष्टकोन टाकून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी जोडून दिले....आता पुन्हा धार्मिक क्रॉस आणायचा प्रयत्न केला तर फटके पडतील जनतेचे....

ही पुरोगाम्यांची गोची तर नाही..?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा