राजकारण राष्ट्रध्वजाचे



स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सव मोठ्या प्रमाणात लोकसहभातून साजरा करण्याचा प्रयत्न म्हणून भाजपा प्रणित केंद्र सरकारने "हर घर तिरंगा" सारखा कार्यक्रम जाहीर केला. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दिवसात आपल्या घरावर राष्ट्रध्वज संहितेचे सगळे नियम पाळत नागरिकांनी तिरंगा फडकवावा अशी या कार्यक्रमाची योजना आहे आणि देशातील जवळपास २० करोडपेक्षा जास्त घरांवर या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वज फडकेल अशी आशा. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांनी आपल्या समाज माध्यमाच्या डी पी वर राष्ट्रध्वजाचा डी पी ठेवावा असे जाहीर आवाहन केले. या आवाहनाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


खरे तर स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवा निमित्य आखलेला हा कार्यक्रम आणि पंतप्रधानांनी केलेले आवाहन यात कोणतेही राजकारण करण्याचा प्रश्न नव्हता. भारतातील प्रबुद्ध नागरिक ज्यांना आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावायचा आहे, ज्यांना नियम सांभाळता येतील, ते राष्ट्रध्वज लावतील आणि ज्यांना लावायचा नाही ते लावणार नाहीत ! तीच गत समाज माध्यमांवरील डी पी बदलण्याच्या केलेल्या आवाहनाची ! यात कुठेही जबरदस्ती नाही. मात्र भाजपा आणि नरेंद्र मोदी द्वेष सोबतच नरेंद्र मोदी यांनी जाहीर आवाहन केल्यावर देशाच्या नागरिकांकडून त्याला भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि त्यायोगे पुन्हा नरेंद्र मोदी यांना मिळणारी प्रसिद्धी, मिळणारी लोकप्रियता याची धास्ती घेतलेल्या विरोधकांनी या "हर घर तिरंगा" कार्यक्रमाच्या विरोधी स्वर लावले, त्यावर राजकारण सुरू केले. 


मग सगळ्यात पहिला हल्ला भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर झाला. कोण्या काळी संघ किंवा दक्षिणपंथी विचारधारेच्या नेत्यांचा राष्ट्रधवज म्हणून मान्यता असणाऱ्या तिरंग्याला विरोध होता, पासून सुरू झालेले आरोप ५८ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज उभारला नाही इथ पर्यंत आरोप सुरू झालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन कार्यक्रमात हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला लावल्या जाते. त्या ध्वजाला गुरू समान मानून त्याचा यथायोग्य सन्मान केला जातो आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा भारताच्या राष्ट्रधजाचा यथायोग्य सन्मान करत नाहीत हा जुना आरोप पुन्हा वर आणण्यात आला. मग अखिल भारतीय पप्पू संघटनेचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचे पाहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन काढलेले छायाचित्र समाज माध्यमांवर पोस्ट करत नथीतून तिर मारला, मग त्या अखिल भारतीय पप्पू संघटनेतील अनेक पप्पीनी त्या पोस्टला पुन्हा आपल्या खात्यावर घेत विशेषतः संघाची आणि भाजपाची खिल्ली उडवायला सुरवात केली. पण आपण हे सगळे राजकारण करत असतांना अनाहूतपणे देशाच्या नागरिकांना राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यापासून परावृत्त करत आहोत याची जाण या लोकांनी ठेवली नाही. 


असाच काहीसा प्रकार विकृत विरोधकांनी २०१६ साली सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवायचा दिलेला आदेश आणि नंतर घडलेल्या घडामोडी संदर्भात केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशभरातील चित्रपटगृहात जेव्हा राष्ट्रगीत वाजवणे सुरू झाले तेव्हा अनेक शहरात चित्रपटगृहात मारझोडीच्या घटना होण्यास सुरुवात झाली. कारण मुस्लिमांमधील एक समूह हे "राष्ट्रगीत" इस्लाम विरोधी असल्यामुळे या "राष्ट्रगीताला सन्मान" देणे हे इस्लाम विरोधी असल्याचा कांगावा करत चित्रपटगृहात बसून राहिले. तर डाव्यां विचारांच्या चांपकांनी नेहमी प्रमाणे चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे आणि त्या करता आमच्या मनाच्या विपरीत राष्ट्रगीताला सन्मान देण्यासाठी उभे राहण्याची सक्ती असणे हे आमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच आहे म्हणत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बसून राहिले. मग या दोन्ही मानसिकतेच्या लोकांना तेथे उपस्थित असलेल्या, राष्ट्रगीताला सन्मान देणाऱ्या लोकांकडून विरोधाचा सामना करावा लागला, कुठे बोलाचालीवर प्रकरण निभावले, तर कुठे हातापाई वर ! मग या सगळ्या "हातापाई प्रकरणांना" दोन्ही मानसिकतेच्या लोकांनी विशेष प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली, या प्रकरणाच्या मागे संघ आणि भाजपा असल्याचा कांगावा, कथितपणे "विषारी राष्ट्रवादाचा" आरोप वगैरे सगळे थेर झालीत. तेव्हा पण संघ आणि दक्षिणपंथी लोकांचा या "जन गण मन" ला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याला विरोध असतांना, आज त्यांना राष्ट्रगीताच्या सन्मानाची इतकी चिंता का ? असले बिनडोक सवाल विचारण्यात आले होते, या प्रश्नावरून बराच गदारोळ उठवण्यात आला होता. खरे तर "राष्ट्रगीताच्या" तत्कालीन वादाचा मुद्दा "चित्रपटगृहात राष्ट्रगीत कशाला?" हा असायला हवा होता, मात्र विरोधकांनी वादाचा मुद्दा "राष्ट्रगीताला सन्मान कशाला?" असा बनवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. परिणामी आज अजूनही चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवल्या जात आहे, मात्र कोणतेही वाद होत नाहीत हे लक्षात घेणे आवश्यक ! 


बाकी मुद्दा असा की, राष्ट्रध्वज असो की राष्ट्रगीत जेव्हा देशाची जडणघडण होत होती, ज्या वेळेस देशाच्या स्वातंत्र्याच्या आनंदा सोबतच, देशाची धार्मिक विद्वेषामुळे फाळणी झाल्याचे दुःख होते, तेव्हा त्याचे पडसाद, त्याच बरोबर प्रत्येकाचे देशाच्या जडणघडणीच्या कल्पनांचे विचार देशाची प्रतीक ठरवतांना त्यात येणार हे निश्चितच होते. ते विचार जाहीरपणे मांडणे यात कोणतीही चूक नव्हती. तत्कालीन काळात अनेक उजव्या विचारवंतांनी "जन गण मन" पेक्षा राष्ट्रगीत म्हणून "वंदे मातरम्" ला पसंती दिली होती यात काहीही वावगे नाही. उजव्यांनी "जन गण मन" ला विरोध करतांना, ते गीत लिहले कशा साठी, कोणासाठी यावर आपले मत दिले होते. हे गीत गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांच्या सन्मानासाठी लिहले असून, त्यातील "भारतभाग्य विधाता" म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना इंग्लंडचा राजा अपेक्षित आहे हा तो आक्षेप होता. त्या ऐवजी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात गाजलेले "वंदे मातरम्" हे मातृभूमीची आरती असल्याच्या त्यांचा दावा असल्यामुळे तेच राष्ट्रगीत व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र "वंदे मातरम्" ला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मुस्लिम समाजातील नेत्यांनी धार्मिक कारणांसाठी विरोध केला होता, त्या गीतात त्यांना धार्मिक कारणाने निषिद्ध असलेली कडवी काढून पण तो विरोध कायम होता. त्यातच धार्मिक कारणाने फाळणी झाल्यावर देशात बहुसंख्य हिंदू असतांना "वंदे मातरम्" च्या धार्मिक विरोधाचे काहीही कारण नाही ही उजव्यांची धारणा ! असो मात्र या सगळ्या विरोधा नंतर आणि वादावादी नंतर देशाचे राष्ट्रगीत म्हणून शेवटी "जन गण मन" लाच मान्यता देण्यात आली. 


जी गत राष्ट्रगीताची, तीच गत राष्ट्रध्वजाची ! खरे तर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या विचारकांनी आपल्या विचारप्रणाली प्रमाणे वेगवेगळे ध्वज राष्ट्रध्वज म्हणून समोर आणले. अगदी आज उजव्या विचारधारेचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांचा विरोध करतांना विरोधक घसा सुकला तरी पाणी पीत नाहीत, त्यांचा अपमान करायला आपल्याकडे असलेली शेलकी शब्दसंपदा जे सतत उघडी करत असतात त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रध्वजाच्या संकल्पनेतील ध्वजात "वंदे मातरम्" आणि हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून कमळ आणि भगव्या रंगा सोबत इस्लामचा हिरवा रंग आणि पांढरा चांद तारा पण अपेक्षित होता हे विशेष! मात्र लवकरच तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसने आणलेला चरखा असलेला तिरंगा ध्वज काँग्रेसच्या लोकप्रियतेसोबत लोकप्रिय झाला, सर्वमान्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर त्यातील चरखा काढत तिथे अशोकचक्र आणत राष्ट्रध्वज म्हणून मान्यता प्राप्त करून बसला. 


आता मुळात प्रश्न असा येतो की तत्कालीन उजव्या विचारकांचा देशाच्या राष्ट्रगीताबद्दल आणि राष्ट्रध्वजाबद्दल आक्षेप होते की सरसकट विरोध होता? मात्र एकूण परिस्थिती बघता तत्कालीन उजव्या विचारकांचा, तेव्हा कोणतीही राजकीय आणि सामाजिक मोठी ताकद नसलेल्या संघाचा राष्ट्रगीताबद्दल आणि राष्ट्रध्वजाबद्दल काही आक्षेप होते, तर काही वेगळ्या संकल्पना होत्या. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या घोर लोकशाहीवादी, विरोधी विचारांचा सन्मान करणाऱ्या पंतप्रधानांसमोर आपले आक्षेप नोंदवणे, विरोध नोंदवणे लोकशाहीचेच लक्षण नव्हते का? मात्र जेव्हा भारतीय सार्वभौम संसदेने भारताचे संविधान देतांना राष्ट्रगीत म्हणून "जन गण मन" आणि राष्ट्रध्वज म्हणून "तिरंगा" आणला त्या नंतर या दोन्ही राष्ट्रीय प्रतीकांचा कधीही अपमान केला नाही. आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्या राष्ट्रगीताला आणि राष्ट्रध्वजाला मानणार नाही असे कोणतेही वक्तव्य किंवा कृती आजतागायत केली नाही. जाणूनबुजून "राष्ट्रगीताचा किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान" संघ, भाजपा किंवा कोणत्याही उजव्या विचारकाने केल्याची घटना ऐकण्यात बघण्यात नाही. उलट संघ विचारकांचे जे संघातली दैनंदिन कार्यक्रमा व्यतिरिक्त जे सामाजिक - सार्वजनिक औपचारिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने आणि कार्यक्रमाचा अंत "वंदे मातरम्" ने होतो हे अनेकदा अनुभवले आहे. जी काँग्रेस आज "वंदे मातरम्" ची घोषणा देत काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दावा करते, ज्या कॉंग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात "वंदे मातरम्" घराघरात पोहचवले त्या काँग्रेसला तरी "वंदे मातरम्" ला सन्मान देता येतो का? हा प्रश्नच आहे. असो, मात्र आज जेव्हा "राष्ट्रगीताला" आणि "राष्ट्रध्वजाला" सन्मान देणे आपल्या धार्मिक विचारांच्या, राजकीय विचारांच्या आड येते म्हणून योग्य सन्मान न देणारेच जेव्हा संघावर किंवा भाजपावर यांचा या प्रतिकांना विरोध होता म्हणून आरोप करतात तेव्हा त्यांच्या सडलेल्या मेंदूची कीव येते बाकी काही नाही. 


राहिला प्रश्न मग संघ कार्यालयात ५८ वर्षे "राष्ट्रध्वज" का फडकवला गेला नाही याचा ! तर याचे कारण १९५० ची राष्ट्रध्वज संहिता होती. या संहितेमुळे २००२ पर्यंत देशाचे नागरिक, खाजगी आस्थापन, संघटना आणि पक्ष आपल्या कार्यालयात, घरात राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हते. अगदी काँग्रेसने पण या काळात आपल्या कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवला होता का हा प्रश्नच आहे ! 


बाकी यात बदल घडवला भाजपचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना ! त्यांनी २००२ साली राष्ट्रध्वजाच्या संहितेत बदल करत पक्ष, संघटना, खाजगी आस्थापना सामान्य नागरिकाला पण सन्मानाने राष्ट्रध्वज उभारण्याची परवानगी दिली. तेव्हा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि देशातील सगळ्या कार्यालयात गणराज्य दिनी आणि स्वतंत्रदिनाच्या दिवशी नेमाने राष्ट्रध्वज नियमानुसार उभारल्या जातो. 


मात्र २००२ पूर्वी  राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बामसेफ, ब्रिगेड, पुरोगामी संघटना आदी पक्ष संघटनांनी आपल्या कार्यालयात ध्वज वंदन कार्यक्रम केला आहे का? याचे उत्तर जाणून घेण्याची इच्छा आहे. माझ्या माहिती प्रमाणे कम्युनिस्ट पक्षाने गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये पहिल्यांदा आपल्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवला, तो पण आपल्या पक्षाच्या ध्वजासोबत. मग इतके वर्ष का राष्ट्रध्वज फडकविला नसेल? भारतातील मदारश्यामध्ये २०१५ पासून काही प्रमाणात राष्ट्रध्वज फडकवण्यास सुरवात झाली, ती पण मोदी सरकारच्या सुचनेमुळे, त्या सुचनेमुळे पण वाद झालेच होते ! मात्र संघ आणि भाजपावर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताच्या विरोधात असल्याचा आरोप करणारे मुस्लिम नेते मात्र मदरश्यात तिरंगा का फडकविला जात नव्हता? या प्रश्नाचे उत्तर देतील काय? 


बाकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा हातात राष्ट्रध्वज घेतलेले छायाचित्र समाज माध्यमांवर नाचवत नक्की काय सिद्ध करायचे, हे कळले नाही. ते देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या हातात देशाचा राष्ट्रध्वजच असणार होता, पाकिस्थानचा राष्ट्रध्वज हातात घेऊन ते छायाचित्र काढून घेणार नव्हते की मोहम्मद अली जिन्हा भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन छायाचित्र काढून घेणार नव्हते. बाकी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा एखादा तसे छायाचित्र दाखवा म्हणून आवाहन करणारे अखिल भारतीय पप्पू सेनेचे पप्पू कार्यकर्ते संघाचे सरसंघचालकांना अनाहूतपणे देशाच्या पंतप्रधानपदाच्या समकक्ष भाव देत आहेत याची जाणीव ठेवत आहे का? तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदाची अहवेलना करत आहात की संघाची आणि सरसंघचालक पदाला संवैधानिक दर्जा देत आहात याचा विचार या पप्पूनी जरूर करावा.



टिप्पण्या