अमेरिकेची हाऊस स्पीकर म्हणजे आपल्या लोकसभा अध्यक्षच्या समकक्ष नॅन्सी पालोसी आज अधिकृत रित्या तैवानच्या दौऱ्यावर पोहचल्या आहेत. अमेरिकेच्या या कृतीमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव का निर्माण झाला? हे समजून घ्यायचे असेल तर, दोन गोष्टी प्रकर्षांने लक्षात घ्याव्या लागतील, १) चीनच्या "वन चायना पॉलिसि" ला जागतिक मान्यता मिळाल्यानंतर गेल्या अठ्ठावन वर्षात पहिल्यांदाच कोण्या राजकीय व्यक्तीचा हा तैवानचा अधिकृत दौरा आहे आणि २) नॅन्सी पालोसी ह्या फक्त हाऊस स्पीकर असतांना त्यांच्या दौऱ्यावर चीन का इतका थयथयाट करत आहे? हे समजून घ्यायचे असेल तर अमेरिकेच्या संवैधानिक पदाची उतरण समजून घेणे आवश्यक आहे. उद्या कोणत्या संकटात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षनांना काही इजा झाली तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनतील, आणि दोघांनापण काही झाले तर हाऊस स्पीकर ! म्हणजे अमेरिकेच्या संविधानानुसार हाऊस स्पीकर पद तिसऱ्या क्रमांकाचे पद आहे.
या पदाचे महत्व लक्षात घेतले तर मग आपल्याला नॅन्सी पालोसी यांना अमेरिकन वायुसेनेच्या विमानाने दिलेले संरक्षण आणि चीनचा त्यांच्या तैवान दौऱ्याविरोधातील थयथयाट लक्षात येईल. नॅन्सी पालोसी पहिले पासून लोकशाहीच्या कट्टर समर्थक आणि चीन विरोधक म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या एका चीन दौऱ्यात त्या चिनी अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून थियमेन चौकात पोहचल्या आणि तिथे १९८९ साली झालेल्या चिनी विद्यार्थी आंदोलनाला समर्थन देणारे बॅनर फडकवले होते. त्यांना थांबवायला बीजिंग पोलिसांना बरीच मेहनत करावी लागली होती आणि चीनचा राग शांत करायला अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाला पण!
तर अश्या नॅन्सी पालोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे रशिया आणि युक्रेनच्या युद्ध संकटानंतर आशिया आणि विशेषतः इंडो - पॅसिफिक रिजन, भारतीय उपमहाद्वीपवर युद्धाचे ढग जमा होत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि अमेरिकेत तैवान प्रश्नावरून गंभीर वक्तव्य लढाई सुरू होती. अमेरिकेने विशेषतः अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी तैवान करता अमेरिका सरळ सैन्य उतरवू शकतो अशी धमकी पण चीनला दिली होती. व्हाइट हाऊस प्रशासनाने जरी नंतर या वक्तव्याबाबत सावरासावर केली असली तरी त्या वक्तव्याचा राजकीय असर झाला होता. याच पार्श्वभूमीवर नॅन्सी पालोसी यांनी आपल्या तैवान दौऱ्याची घोषणा करत या आगीत तेलच ओतले. तेव्हा पासून अमेरिकेने मान्य केलेल्या "वन चायना पॉलिसी" ची आठवण देत असतांनाच चीनने दक्षिण चीन समुद्रात आपली सैन्य उपस्थिती वाढवण्यास सुरवात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून चीन दक्षिण चीन समुद्रात नौसेना - वायुसेना कवायती करत आहे. सोबतच तैवानवर दबाव टाकण्यासाठी सतत तैवानच्या वायूसीमेचे उल्लंघन करायचा प्रयत्न करत आहे.
मात्र आज जेव्हा नॅन्सी पावेल तैवान मध्ये आपल्या नियोजित दौऱ्या नुसार उतरल्या तेव्हा चीनने तैवानची राजधानी ताईपेई येथील विमानतळ उडवण्याची धमकी दिली. या सरळ धमकीमुळे संपूर्ण जग एका क्षणात युद्धाच्या छायेत आले आहे. चीनच्या समर्थनार्थ रशिया आणि इराण समोर आल्याचे बोलले जात आहे.
नॅन्सी पालोसी यांच्या आगमनानंतर एक तासातच जवळपास वीस चिनी विमानांनी तैवानच्या वायूसीमेचे उल्लंघन केले असे तैवानच्या संसद अध्यक्षांनी जाहीर केले, त्याच वेळी जपान मधील अमेरिकन सैन्य तळावरून अमेरिकन विमाने पण तैवानच्या दिशेला झेपावली होती अशी बातमी आहे. सोबतच दक्षिण चीन समुद्रात तैवानच्या भागात अमेरिकेच्या नौसेनेची गस्त वाढली आहे, एक विमानवाहू नौका पण अमेरिकेने तेथे तैनात केली आहे.
सध्या रशिया युक्रेन सोबत लढाईत अडकला आहे, या लढाईचा काळ वाढवत नेत रशियाला आर्थिक तंगीत अडकवायचा अमेरिकेचा विचार आहे. तोच कित्ता चीन करता तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अमेरिका करू शकतो असा एक विचारप्रवाह आहे.
मात्र चीन अशावेळेस फक्त तैवानवर लक्ष केंद्रित न करता, जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम, भारत या देशांना पण युद्धात गुंतवेल अशी भीती अभ्यासक व्यक्त करत आहेत. भारता विरोधात चीनला पाकिस्थानची साथ राहील. त्याच सोबत रशिया आणि इराण पण अमेरिके विरोधात चीन सोबत उभे राहतील अशी भीती पण व्यक्त होत आहे.
तेव्हा आता चीन खरेच तैवानवर हल्ला करते की चीनच्या धमक्या केवळ पोकळ बाता निघतात ते बघणे महत्वाचे राहील. सध्या तरी चीनने फुजियान भागाच्या जो तैवानच्या बाजूला आहे तेथे मोठ्या प्रमाणावर सैन्य जमा केले आहे. फुजियानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिनी सैन्य रणगाडे आणि इतर वाहने दिसत आहेत. या भागातील प्रवासी आणि व्यापारी विमानांचे आवगमन थांबवण्यात आले आहे. तैवानला चिनी नौसेनेने घेरले आहे.
आता रशिया आणि भारताचे संबंध नक्की कसे काम करतील याची मोठी परीक्षा राहील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा