आपल्या समाज माध्यमांवरील डी पी मध्ये राष्ट्रध्वज लावण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केल्या नंतर अनेक वाद उत्पन्न केल्या गेले. बाकी राष्ट्रध्वजाचा डी पी लावायचा की नाही हा ऐच्छिक विषय होता, सक्ती अजिबात नव्हती !
पण गोम अशी की भारतीय जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात, मग आपण प्रतिसाद दिला नाही की जनता आपली पिसे काढते. गेल्या वेळेस विद्युत दिवे घालवत तेलाचे दिवे लावण्याचे आवाहन असो, की घंटानादाचे आवाहन असो भारतीय जनतेने भरभरून दिलेला प्रतिसाद दिलाच वर विरोध करणाऱ्यांचा पार पोपट केला जाहीर रित्या !
हा अनुभव लक्षात घेता या वेळेस विरोधक आधीच आक्रमक झालेत, काँग्रेस जवळ भूतपूर्व पंतप्रधानांची मोठी यादी असल्यामुळे, त्याने मध्यम मार्ग पत्करला आणि नेहरूंचे हातात राष्ट्रध्वज हातात घेतलेले छायाचित्र अपलोड केले. मात्र इतर पक्षांचे आणि संघटनांचे काय? मग करायचे काय ? तर वाद घालायचे....त्यातही त्याचे "सॉफ्ट टार्गेट" म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ! मग त्यांनी डी पी मध्ये राष्ट्रध्वज लावला नाही वगैरे आरोप व्हायला लागले. मग विरोधकांच्या आवाजात आवाज मिसळणारे छूटभैय्ये नेते, समाजसेवक म्हणून वावरणारे फुकटे आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणवणारे छुपे विद्वेषी या सगळ्या आरोपात एकत्र आले.
मात्र या सगळ्यात सगळे एक विसरले की राष्ट्रध्वज लावायचे एक आवाहन होते, लावायचा तर लावायचा नाही तर शांत बसायचे, मात्र निदान राष्ट्रध्वजाचे राजकारण करायची गरज नव्हती. बरे राजकारणाची सुरवात केली तर स्वतः तर राष्ट्रध्वज लावायचा ! पण हलकट पणा असा की आम्हाला आरोप करायचे, राष्ट्रध्वजाचा अपमान करतात म्हणायचे, मात्र स्वतः पण सन्मान करायचा नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा