जेव्हा उदयपूर, राजस्थान येथे कन्हैय्यालाल यांचा इस्लामी कट्टरतावाद्यांनी गळा कापला, तेव्हाच लिहले होते की कन्हैय्यालाल पाहिले नाहीत आणि शेवटचे पण नाही. या अगोदर उत्तर प्रदेशात कमलेश तिवारी यांची हत्या पण "गुस्ताख ए नबी" कारणाखाली "सर तन से जुदा" म्हणत झाली होती.
मात्र त्या नंतर आपल्या कथित पुरोगामी, शाहू - फुले - आंबेडकरांच्या राज्यात अमरावती येथे उमेश कोल्हे यांची झाली. आश्चर्य म्हणजे इतर वेळेस अश्या हत्यांविरोधात पेटून उठणारे तथाकथित पुरोगामी या हत्येनंतर कोमात गेले. इतकेच नाही तर स्वतःला हिंदुत्ववादी विचारांचे म्हणवणारे पण या हत्येनंतर हिंदूंचे संघटित रूप दाखवण्यात उदासीन राहिले. या खुनाची दहशत इतकी होती की, ज्या पण लोकांनी वयक्तिक हिंदुत्ववादी भूमिकेतून नुपूर शर्मा यांना पाठींबा दिला होता, त्या विषयाच्या समाज माध्यमांवर असलेल्या पोस्ट मिटवायला लागले होते. अगदी अमरावती पासून नागपूर पर्यंत ज्या लोकांनी अश्या पोस्ट समाज माध्यमांवरून हटवल्या नाहीत त्यांना एकतर जिवाच्या धमक्या मिळत होत्या किंवा त्यांना आपले शहर सोडून परंगदा व्हावे लागले.
मात्र त्याच काळात हिंदुत्वाच्या विचारांवर एकत्र येत सरकार बनवणारे मात्र या सगळ्या घटनांनाच्या बाबतीत शांतच राहिले ही खरी शोकांतिका ! बरे बोलून चालून ते राजकीय पक्ष होते. मात्र स्वतःला जगातील सगळ्यात मोठे हिंदू संघटना म्हणवून घेणारा संघ पण या प्रकरणात शांतच राहिला.
आता राज्यात पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे प्रतीक पवार नावाच्या तरुणावर प्राणघातक हल्ला फक्त नुपूर शर्मा यांना समर्थन केले म्हणून झाला. या हल्ल्यात प्रतीक पवार सोबत असलेला सनी पवार नावाचा तरुण सुद्धा गंभीर जखमी झाला आहे.
इतके होऊन सुद्धा आपण घरात बसणार असू, तर आपल्या सारखे भेकड आपणच ! स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटना रस्त्यावर उतरत नसतील तर अश्या संघटनांना मोठे करण्यात काय हशील आहे याचे उत्तर आपण शोधावे ! इतके होऊन सुद्धा संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरु शकत नसतील तर यांनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणने बंद करावे.
बाकी राज्य भाजपा आता हिंदुत्ववादी कमी आणि सत्ता पिपासू अधिक झाल्याचे दिसून येत आहे. हिंदुत्वाच्या नावाने एकत्र येत सत्ता स्थापन करणारे मुळात अतिशय राजकीय आणि भेकड आहेत हेच यातून प्रकर्षाने दिसून येते, हे हिंदूंचे दुर्दैव!
यावर एकच उपाय. जिंहादींवर बहिष्कार
उत्तर द्याहटवा