दुर्दैवाने उदयपुरचा कन्हैय्या अंतिम नाही !



उदयपूर येथे कन्हैय्या नावाच्या एका टेलरची मान कापल्या गेली, त्याची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली, फक्त हत्याच केली नाही तर ही हत्या करतांनाची चलचित्रफीत बनवण्यात आली आणि प्रसारित पण केल्या गेली. हत्या करण्याच्या आधी पण अशी हत्या करणार असल्याची एक चलचित्रफीत बनवण्यात आली होती, जी ही हत्या झाल्यानंतर प्रसारित केल्या गेली. हा निर्लज्जपणा इथेच थांबला नाही तर हत्या केल्यानंतर पण आपण एका सध्या माणसाची, जो मेहनत करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत होता, जो शस्त्रसज्ज नव्हता, ज्याला अत्यंत कुटील पद्धतीने मारल्या गेले, अश्या नामर्दपणे केलेल्या हत्येला आपली मर्दुमकी म्हणून सांगणाची चलचित्रफीत पण प्रसारित केल्या गेली. काय होता या उदयपुरच्या कन्हैय्याचा अपराध? 


या कन्हैय्याचा अपराध होता इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या चरित्रात आलेला संदर्भ एका दूरचित्रवाणीच्या चर्चेत सर्वांसमक्ष पुन्हा आणणाऱ्या नुपूर शर्मा यांना पाठींबा द्यायचा ! आता खरे बोलणाऱ्या नुपूर शर्मा यांनी तथाकथितपणे पैगंबरांचा अपमान केल्याची आवळी उठवण्यात आली. मग "गुस्ताख ए नबी की एक ही सजा, सर तन से जुदा" हाच न्याय ! त्यात या नुपूर जैनचे समर्थन करणाऱ्यांना दुसरी शिक्षा काय असणार? 


मात्र कन्हैया हा पहिला अशी शिक्षा मिळणारा हिंदू आहे का? तर नाही, कन्हैय्या हा पहिला नाही आणि शेवटचा पण नाही. मात्र आपण तेंव्हापाण शांत राहिलो, आता पण शांत राहू आणि नंतर पण शांतच राहू. 


गेल्या काही वर्षात राज्यात आणि देशात झालेल्या धार्मिक हिंसेच्या घटनांमध्ये नक्की किती ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात आली? आपल्या राज्यात गेल्या वर्षभरात दंगली झाल्या मुंबई, भिवंडी, मालेगाव, औरंगाबाद, अमरावती असा या दंगलींचा राज्यभर विस्तार होता. किती ठिकाणी यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली? रजा अकादमी सारख्या धर्माध संघटनेवर काय कायदेशीर कारवाई झाली? तर शून्य ! ना स्वतःला खरे हिंदू आणि दुसऱ्याला खोटे हिंदू म्हणणाऱ्या सत्ताधारी पक्षाने काही कारवाई केली, ना हिंदूंचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नावाजलेल्या पक्षाने सरकरवर कायदेशीर कारवाई करावी म्हणून दबाव आणला. ना दंगलखोरांवर काही कारवाई केल्या गेली, ना दंगली करता फितवले त्या संघटनांवर ! 



या उलट ज्या राज्यात अश्या दंगलींवर आणि दंगलकर्त्यांवर जी काही कायदेशीर कारवाई केल्या गेली ती कितपत कायदेशीर आहे या बद्दलच प्रश्नचिन्ह आणि शंका उपस्थित केल्या गेल्या, त्यावर देशभर रान पेटवण्यात आले ही वस्तुस्थिती नाही काय? ही सगळी स्थिती बघता तुम्ही किती जागृत आहात हे दिसत आहे. 


या आधी भारतातील गाजलेल्या अश्या हत्या म्हणजे रंगीला रसूल पुस्तकाचे प्रकाशन करणारे "महाशय यशपाल", कमलेश तिवारी या हत्येच्या मालिकेत आता उद्यपुरचा कन्हैया हे अजून एक नाव जोडल्या गेले. यातील पहिल्या दोघांनी तर सरळ सरळ कथितपणे पैगंबरांवर अपमानजनक टिपणी केली होती, असा आरोप आहे. मात्र उदयपूरच्या कन्हैय्याने तर स्वतः अशी कोणतीही टिपणी केली नव्हती. त्याने फक्त सध्या पैगंबरांच्या कथित अपमानाकरता गाजत असलेल्या नुपूर शर्मा यांनी पाठींबा व्यक्त केला होता. मात्र या तिन्ही गाजलेल्या प्रसंगात एक गोष्ट मात्र अतिशय सारखी आहे ती म्हणजे "महाशय यशपाल" असो, कमलेश तिवारी असो, नुपूर शर्मा किंवा उदयपूरचा कन्हैय्या असो, यांनी स्वतःहून काही पैगंबरांवर कथित अपमानास्पद टिपणी केली नव्हती, तर हिंदू देवी देवतांवर होणाऱ्या अश्लील, अभद्र आणि निंदवाचक टिपणीला उत्तर देतांना त्यांच्या धर्मातील तश्या जागा दाखविल्या होत्या. मात्र आम्ही काहीही करू, काहीही म्हणू तुम्ही मात्र शांत राहायचे आणि ही दादागिरी इस्लामी दादागिरी नाही काय? 


बाकी ज्यांना इस्लाम शांतीचा संदेश देणारा धर्म वाटतो त्यांनी प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, ज्या धर्मात "गुस्ताख ए नबी की एक ही सजा, सर तन से जुदा" सारख्या घोषणा दिल्या जातात तो धर्म उदयपूर सारख्या घटनांना समर्थन देत नाही हे म्हणणे फक्त हास्यास्पद नाही, तर या निर्घृण घटनेवर विनोद करण्यासारखे आहे. 


बाकी कुराण मधील काही आयाती अश्या पद्धतीच्या घटना घडेल अशी वातावरण निर्मिती करते. 


Verse 9 Surah 123 يٰۤـاَيُّهَاالَّذِيۡنَاٰمَنُوۡاقَاتِلُواالَّذِيۡنَيَلُوۡنَكُمۡمِّنَالۡكُفَّارِوَلۡيَجِدُوۡافِيۡكُمۡغِلۡظَةً​ ؕوَاعۡلَمُوۡاۤاَنَّاللّٰهَمَعَالۡمُتَّقِيۡنَ 


अर्थ: हे विश्वास ठेवणाऱ्यांनो ! त्या विरोध करणाऱ्या लोकांसोबत लढा जे तुमच्या जवळ आहे आणि त्यांना जाणवू द्या की तुम्ही बळकट आहात आणि जाणून घ्या ज्यांना अल्लाहचे भय आहे अल्लाह त्यांच्या सोबत आहे. 


Verse 5 Surah 57 يٰۤـاَيُّهَاالَّذِيۡنَاٰمَنُوۡالَاتَـتَّخِذُواالَّذِيۡنَاتَّخَذُوۡادِيۡنَكُمۡهُزُوًاوَّلَعِبًامِّنَالَّذِيۡنَاُوۡتُواالۡكِتٰبَمِنۡقَبۡلِكُمۡوَالۡـكُفَّارَاَوۡلِيَآءَ​ ۚوَاتَّقُوااللّٰهَاِنۡكُنۡتُمۡمُّؤۡمِنِيۡ 


अर्थ: हे विश्वास ठेवणाऱ्यांनो ! तुमच्या पहिले ज्यांना पुस्तक दिल्या गेले होते, ज्यांनी तुमच्या धर्माला हास्यास्पद बनवले, त्यांना आणि ज्यांनी नाकारले त्यांना कधीही आपला मित्र-संबंधी बनवू नका आणि अल्लाहची भीती ठेवा जर तुम्ही विश्वास ठेवत असाल. 


Verse 33 Surah 61 مَّلۡـعُوۡنِيۡنَ ​ۛۚاَيۡنَمَاثُقِفُوۡۤااُخِذُوۡاوَقُتِّلُوۡاتَقۡتِيۡلً 


अर्थ: तंदुरुस्त असणे आवश्यक आहे ! जिथे जिथे सापडेल तेथे ते पकडले जातील आणि कठोरपणे मारले जातील. 


Verse 41 Surah 27 فَلَـنُذِيۡقَنَّالَّذِيۡنَكَفَرُوۡاعَذَابًاشَدِيۡدًاۙوَّلَنَجۡزِيَنَّهُمۡاَسۡوَاَالَّذِىۡكَانُوۡايَعۡمَلُوۡنَ‏ 


अर्थ: शेवटी ज्यांनी आम्हाला नाकारले, त्यांना कठोर यातना देऊ आणि आम्ही त्यांनी केलेल्या सगळ्या वाईट कृत्याचा बदला घेऊ. 


त्या मुळे वर लिहल्या प्रमाणे उदयपूर येथील कन्हैया हा शेवटचा नाही ! याचे पहिले कारण म्हणजे भारताला इस्लाममय करणे हे या लोकांचे प्रथम उद्दिष्ट आहे, हे काही गुपित नाही. साम-दाम-दंड-भेद सारख्या क्लुप्त्या करत इस्लामची व्याप्ती वाढवणे हाच एकमेव उद्देश ! इस्लाम कसा चांगला हे सांगत असतांनाच त्यांचा रोख प्रकर्षाने "तुमचा धर्म कसा वाईट" यावर जास्त असतो. त्याचा सरळ भर मग हिंदू परंपरा, मान्यता आणि संस्कृतीवर हल्ला करण्यावर असतो. हा हल्ला परतवतांना केलेली वक्तव्ये मग "गुस्ताख ए नबी" म्हणून प्रचारात आणली जातात. मौलाना मग अश्या लोकांना "सर तन से जुदा" म्हणूनच शिक्षा असल्याचे सांगतात आणि मुस्लिम धर्मांध त्याचे पालन करतात आणि आपण तिने - त्याने असे बोलायला नको होते अशी भूमिका घेत पुन्हा झोपी जातो. 


बातमी आहे की कन्हैया याचा खून करणाऱ्यांना पकडले आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मात्र ही कारवाई फक्त वरवरची, त्यांनी फक्त खून केला ! मात्र त्याच्या मनात जी धर्मांधता ज्यांनी भरली त्या मुल्ला - मौलविंना वेसण कोण घालणार? इस्लाम खरेच शांततेचा धर्म आहे तर त्याची चुकीची शिकवण देणाऱ्यांना वेसण कोण घालणार? आणि महत्वाचा प्रश्न की समजा खून करणार्यांनी धर्माची शिकवण तशीच असल्यामुळे हे पाऊल उचलले असेल तर त्या धर्माला वेसण कोण घालणार?

टिप्पण्या