उदयपूर, राजस्थान मध्ये झालेली कन्हैय्या यांची हत्या ना पहिली आहे, ना शेवटची असे मी अगोदरच्या लेखात लिहले होते.
दुर्दैवाची गोष्ट अशी की उदयपुरच्या घटनेची पुनरावृत्ती आपल्या राज्यात अमरावती येथे झाल्याची शंका उपस्थित होत आहे. आता याला "शंका" या करता म्हणायचे की खून केलेल्यांनी कोणतेही चलचित्रफीत प्रसारित केली नाही जशी उदयपुरच्या घटनेत केल्या गेली. तसेही राज्यातील कथित पुरोगामी सरकार अशी काही घटना झाल्याचे उघडपणे मान्य करणार का ? हा प्रश्नच आहे.
उमेश कोल्हे हे अमरावती येथील घटनेत बळी पडले आहेत. औषधाच्या दुकानाचा व्यवसाय करणाऱ्या उमेश कोल्हे यांनी समाज माध्यमांवर नुपूर शर्मा यांच्या समसर्थनार्थ काही पोस्ट टाकल्याच्या चर्चा आहेत. अश्याच काही पोस्टमुळे त्यांना धमक्या पण देण्यात आल्या होत्या असा संशय व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे इस्लामी शिक्षा द्यायच्या प्रकारानुसार (जी आपल्याला आयसिस आणि अल कायदा सारख्या अतिरेकी संघटनेच्या अनेक व्हडिओत दिसते) गळा कापून खून करण्यात आला आहे, याच पद्धतीने उदयपूर येथील कन्हैया यांचा पण गळाच कापण्यात आला होता हे विशेष !
दुसरे म्हणजे अमरावती पोलिसांनी या प्रकरणात काहींना अटक केली आहे. तौफिक उर्फ नानू शेख तसलिम वय वर्षे २४, शोएब खान उर्फ भुऱ्या वय वर्षे २२, मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम वय वर्षे २२, शाहरुख पठाण आणि हिदायत खान ही त्याची नावे आहेत. यातील मुद्स्सीर अहमद या मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याच्याशी उमेश कोल्हे यांचे जुने वैमनस्य काहीही नाही आणि लुटमरीच्या उद्देशाने पण ही घटना झालेली नाही. कारण घटनेच्या वेळेस उमेश कोल्हे यांचा पोरगा आणि सून त्यांच्या सोबतच होती. त्यांच्या जवाबानुसार रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत चार - पाच जणांनी घेतले आणि काही कळायच्या आत उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर सुरी फिरवली ! यात गळ्याची मुख्य नस कापल्या गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोणत्याही पद्धतीने लुटले गेले नाही, ना नगदी किंवा इतर मुद्देमाला बद्दल विचारपूस करण्यात आली.
विशेष म्हणजे आरोपी हत्येच्या काही दिवस आधी पासून उमेश कोल्हे यांच्या वर नजर ठेवून होते आणि आपणच त्याची हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांजवळ कबूल केले आहे. मात्र पोलीसांना मात्र अजून या हत्येचे कारण समजून आलेले नाही. एकूण प्रकार बघता कारण समजणार पण नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा