नुपूर शर्मा प्रकरण: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय



नुपूर शर्मा नक्की त्या कथित वादग्रस्त आणि अपमानास्पद टिपणीत नक्की काय म्हणाली हे मला माहित नाही. मात्र ती जे काही म्हणाली ते इस्लामिक देशांना आणि मुस्लिमांना बरेच झोंबले आहे किंवा तसा ते कांगावा करत आहेत हे नक्की. या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक नुपूर शर्माच्या बाजूने आणि भाजपा विरोधात मत प्रदर्शित करत आहेत. 


नुपूर शर्मा यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना फक्त दोनच गोष्टी दिसत आहे. ते म्हणजे समोरून हिंदू धर्म किंवा ज्ञानव्यापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाला, सतत फव्वारा म्हणून संबोधित करणे डोक्यात गेले म्हणून तिने ते शब्द किंवा वक्तव्य केले. मात्र एका पक्षाची प्रवक्ता म्हणून असे वादग्रस्त वक्तव्य नुपूर शर्मा यांना शोभणारे नाही. त्या मुळे भाजपाने त्यांच्यावर केलेली कारवाई योग्यच ! 


मुळातच वृत्तवाहिन्यांवर इस्लामी अभ्यासक म्हणून येणारे शोएब जमाई किंवा मराठी वृत्तवाहिन्यांवर येणारे नौशाद उस्मान वगैरे लोकांचा अजेंडा फक्त एकच असतो. तो म्हणजे आपल्या धर्माची कच्ची बाजू लपवणे, आपल्या धर्माचा प्रचार करणे आणि दुसऱ्या धर्माला अत्यंत वाईट भाषेत हिनवणे ! या व्यतिरिक्त ते दुसरे काही करत नाही, त्यांना येतही नाही. त्यांनी काहीही वक्तव्य केले तरी त्यांना कोणालाही उत्तर द्यायचे नाहीये, ते निवडणूक लढणार नाहीये, त्यांच्यावर कोणतीही संवैधानिक जवाबदारी नाही. 


या उलट नुपूर शर्मा एका राष्ट्रीय पक्षाच्या, त्यातही सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. काही संवैधानिक नियम, जवाबदारी आणि कायदे यांच्या कडून पाळल्या जायची अपेक्षा आहे आणि ती त्यांनी पूर्णत्वाने पाळणे आवश्यक आहे. पक्ष प्रवक्त्याने भावनेपेक्षा बुद्धीने यांना उत्तर देणे आवश्यक आहे. माझ्या आठवणीत या आधी पण राम मंदिर मुद्यावर एका चर्चेत कथित मुस्लिम अभ्यासकाने हिंदू धर्मावर टीका करतांना हिंदू पौराणिक कथेतील चमत्कारावर, श्री रामाच्या काल्पनिकपणा वर भाष्य केले असता, त्याला उत्तर देताना भाजपा प्रवक्ता शुधांषु त्रिवेदी यांनी फक्त,"ऐसें बात मत किजीए, अगर मैने कुराण के उडने वाले घोडे निकलना सुरू कर दिया तो आप धार्मिक रूप से आहत होंगे." म्हणत समोरच्याला गप केले होते. जास्त कोणाचे नाव न घेताही गप्प करता येते. 



एक गोष्ट नक्की की, नुपूर शर्मा प्रकरणाला दिलेले आंतराष्ट्रीय वळण पेल्यातील वादळ ठरले आहे. ज्या कतरमध्ये भारतीय वस्तूंवर बंदी घालायची मागणी केल्या गेली होती, ज्या कतरममध्ये राजकीय प्रवासावर असलेल्या भारताच्या उपराष्ट्रपती करता आयोजित भोजन समारंभ रद्द केल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या, ते सगळे भोजन समारंभ, व्यापरिक करार आणि राजकीय करार यथासांग पद्धतीने पूर्ण झाले. भारतावर चिडलेला दुसरा इराण या देशाने भारताने जी काही कारवाई केली त्या बद्दल आपली पसंती दर्शवली. बाकी इराणचे विदेशमंत्री त्यांच्या नियोजनानुसार भारताच्या दौऱ्यावर आहेत. ते पण येथे भारत - ईराण मध्ये व्यापरिक आणि राजनैतिक संबंध वाढवण्यावर भर देणार आहेत. बाकी सौदी, संयुक्त अरब अमिरात सारखे देश शांत झालेत, मग इजिप्त वगैरे देशांना विचारतो कोण? 


पाकिस्थान आणि देशातील पाकिस्थानी कुत्र्यांनी या प्रकरणाला जे वळण द्यायचा प्रयत्न केला तो सपशेल नाकारला गेला आहे. मी या अगोदरच्या लेखात लिहले होते की जे देश मुस्लिम अत्याचार आणि इस्लामची बदनामी यावर चीन विरोधात काही बोलू शकत नाहीत, ते देश आपला व्यापरिक फायदा बघत भारताविरोधात काहीही जास्त पावले उचलू शकणार नाही. हा क्षणिक राग आहे, तो पण भारतातील लोकशाहीमुळे भारतातच या विषयाला जे धार्मिक वळण देण्यात आले त्या मुळे आलेली प्रतिक्रिया आहे. त्यातून भारतीय इस्लामीस्ट लोकांना क्षणाच्या ऑर्गम्स शिवाय दुसरे काही हातात लागणार नाही. 


ही जी झालेली भारतातील इस्लामीस्ट आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांची गोची आहे, तीच आज नसरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यात दिसत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खानावळ या सगळ्या विवादापासून दूर राहिल्याचे दुःख नसरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यात खदखदत आहे. मात्र हिंदू जागा झाल्यापासून असे नसते राजकीय स्टंट केल्यावर होणारे व्यवसायिक नुकसान परवडणारे नाहीत हे आता या खानावळींना पुरते कळले आहे आणि म्हणून ते पण शांत आहे. याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात काही खदखद नाही. मात्र सध्या आपल्या चित्रपट जाहीर होतांना तरी ते काही वक्तव्य करणार नाही 



बाकी राहिला प्रश्न नुपूर शर्मा यांचा ! सध्या नुपूर शर्मा यांच्यावर महाराष्ट्रा पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक राज्यात गुन्हा नोंदवल्या जात आहे. मात्र हा गुन्हा जास्ती जास्त कलम २९५ (अ) या कलमा खाली नोंदवल्या जाणार. हे कलम इतर इस्लामिक देशात असलेल्या "ईशनिंदा कायद्या" सारखे नाही. या कलमाखाली गुन्हा दाखल झाल्या नंतर फक्त धार्मिक भावना दुखावल्या या दृष्टिकोनाचा विचार न करता, कोणत्याही धार्मिक भावना दुखवणाऱ्याच्या हेतूंचा पण तपास करतो. जर न्यायालयात "जाणीवपूर्वक" किंवा "वाईट हेतू" ने हे कृत्य केल्याचे सिद्ध करता आले नाही तर गुन्हा सिद्ध होत नाही. नुपूर शर्माच्या प्रकरणात हा हेतू "जाणीवपूर्वक होता" हे सिद्ध करणे अवघड तर आहेच, पुन्हा त्यांनी जे काही वक्तव्य केले ते खोटे आहे हे पण सिद्ध करणे आवश्यक राहील असे प्रथम दर्शनी वाटते. 


बाकी, या प्रकरणातून एक गोष्ट पक्की घोटून घेण्यासारखी आहे की हिंदूंना आपली आर्थिक ताकद अजून वाढवावी लागेल, त्याचे प्रदर्शन योग्य जागी वेळोवेळी करावे लागेल. देशाची आर्थिक ताकद वाढली तरच देशाची सामरिक ताकद वाढवता येईल. हीच सामरिक ताकद भारत विरोधी शक्तींना बळ देणाऱ्या देशांना घाबरवेल. तुम्हाला आज नुपूर शर्मा विरोधात झालेल्या कारवाई बद्दल निषेध व्यक्त करावा वाटत आहे, त्यांनी कमलेश तिवारीची हत्या झाल्यावर किती निषेध व्यक्त केला होता? तुम्ही तुमच्या कोणत्या कृतीतून हिंदू समाज एक असल्याचे दाखवले होते? याचे उत्तर जरूर शोधावे ! 


बाकी या सगळ्या प्रकरणात मुस्लिम पक्ष बरोबर आहे असे ज्या भंपक उदारमतवादी आणि पुरोगामी बोलघेवड्यांना वाटत आहे, त्यांना कोण्या हिंदूने रस्त्यात कानफटात मारल्यावर "भय का मौहोल है" ची पोपटपंची करण्याचा अधिकार राहिला नाही हे लक्षात घेणे गरजेचे !

टिप्पण्या