चिनी चक्रव्यूहातातील राहुल गांधी !



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या जर्मनी, फ्रांस आणि इतर युरोपियन देशांच्या विदेश दौऱ्यावर टीका करत काँग्रेसने सकाळी ट्विट केले, "देश मे संकट छाया है, मगर साहेब को विदेश भाया है!" . मात्र सध्या काँग्रेसचे दिवस अतिशय वाईट सुरू आहे. हिंदीत एक म्हण आहे, "सर मुंडवाते ही ओले पडे." म्हणजे टक्कल केल्या केल्या जोरदार गारपीट झाली ! म्हणजे काय ? की टकल्यावर केस असते तर ती गारपीट इतक्या जोरता लागली नसती ! 



तर काँग्रेसचे हे ट्विट येत नाही तोच, राहुल गांधी एका पब मध्ये "चिल आऊट" करत असल्याचे आणि सोबत एका चिनी युवती सोबत बोलत असल्याचे चलचित्र ट्विटर वर फिरायला लागले. बघता बघता या व्हिडिओने भारतातील तमाम "समाज माध्यमांवर" लवकरच गारुड केले. 


तसेही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फिरायला म्हणून गेलेले नाहीये. युक्रेन - रशिया युद्धामुळे युरोप आणि संपूर्ण जग युद्धाच्या छायेत आले आहे. या युद्धामुळे भारतातच नाही तर जगातील प्रत्येक देशात महागाईचा आगडोम उसळला आहे. या युद्धा अगोदर चिनी कोरोना प्रादुर्भावामुळे आधीच जगावर आर्थिक मंदीचे राज्य सुरूच होते, त्यात युद्धाची भर पडली. क्युबा, पाकिस्थान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, व्हीएतनाम सारखे छोटे देश आर्थीक आणीबाणीच्या उंबरठ्यावर आहेत नाही तर गंभीर आर्थिक संकटात तरी, तर तुर्कीस्थान, ब्राझील पासून थेट इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेपर्यंत या युद्धाचा असर अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा युरोप दौरा! त्यातही भारताची या युध्दाबाबत आणि रशियावर पश्चिमी देश टाकत असलेल्या निर्बंधांबाबत भारताची भूमिका त्यांच्या पर्यंत पोहचवणे हे त्यांचे काम आहे. ते काम करायला युरोप दौऱ्यावर आहेत. मात्र या गोष्टींचा विचार न करता, काँग्रेस मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जणू सुट्टीत फिरायला युरोपात गेलेत अश्या पद्धतीने टीका करत आहे. 



या सगळ्या गदारोळात राहुल गांधी यांची "चिल आऊट" करणारी चित्रफीत बाहेर आल्यावर, त्यांच्यावर टीका करायला टपलेल्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले. नाहीतरी राहुल गांधी वर्षाचे काही दिवस गायब होत कधी इटली, तर कधी थायलंड येथे जात नक्की काय करतात हा प्रश्न होताच? अनेकांना त्याचे उत्तर अनपेक्षितपणे मिळाल्याचा आनंद झाला. तर या चित्रफितीत राहुल गांधी एका प्रथमदर्शनी चिनी मूळ असलेल्या महिले सोबत चर्चा करतांना दिसत आहेत, अनेकांना ती महिला चीनची नेपाळ मधील राजदूत होऊ यांकि असल्याचा संशय व्यक्त केला. नेपाळ मधील चीनची राजकीय पकड "हानी ट्रॅप" च्या माध्यमातून बळकट करत, नेपाळला भारताच्या विरोधात उभ्या करत असल्याचा यांच्यावर आरोप आहेत. या सगळ्या प्रकरणामुळे आणि संशयामुळे तो रोष अधिक वाढला. 



तसाही चीन आणि राहुल गांधी यांचे संबंध आधी पासूनच वादात आहेत. २०१७ साली जेव्हा भारत आणि चीन दरम्यान भूतान-भारत आणि चीन सीमेवर डोकलाम येथे विवाद सुरू होता. नेमक्या त्याच काळात राहुल गांधी गुप्तपणे दिल्लीतील चीन दुतावासात चर्चा करायला गेले होते. जेव्हा राहुल गांधी यांची चीन दूतावास भेट बाहेर आली तेव्हा, काँग्रेस तर्फे तडकाफडकी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे घोषित केले गेले. मात्र काही पत्रकारांनी भारतातील चिनी राजदूतासोबत राहुल गांधी यांचे छायाचित्रच प्रसिद्ध झाले आणि काँग्रेसला अशी भेट झाल्याचे मान्य करावे लागले. आजतागायत काँग्रेसने तेव्हा चिनी दुतावसात नक्की कशावर चर्चा झाली हे जाहीर केले नाही. त्याच काळात २००८ साली काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पक्षात काही करार झाल्याच्या बातम्या बाहेर आल्यात. सोनिया गांधी - राहुल गांधी आणि क्षी झिंगपिंग काही करारावर स्वाक्षऱ्या करत असल्याचे छायाचित्रे बरीच गाजली. मात्र या पण मुद्द्यावर काँग्रेसने मौन धारण केले. राहुल गांधी यांची मानसरोवर यात्रा पण अशीच गाजली. या यात्रेच्या निमित्याने चिनी सरकार मधील अनेक लष्करी अधिकारी आणि नेते भेटून चर्चा करून गेले असे आरोप झाले. काँग्रेसने या आरोपांना पण योग्य उत्तर दिले नाही. मात्र या उप्पर अरुणाचल प्रदेश किंवा लडाख मध्ये भारत आणि चीन मध्ये होणाऱ्या वादात चीनची तळी उचलत भारत सरकार आणि भारतीय सेनेची मानहानी होईल असे आरोप राहुल गांधी करू लागले, त्यातही भारतीय सेनेत जेवणात भेदभाव केल्या जातो असा अत्यंत तथ्यहीन आरोप राहुल गांधी यांच्या कडून केल्या गेला. गंभीर बाब म्हणजे राहुल गांधी यांनी केलेले हे सगळे आरोप चिनी सरकारी प्रपोगंडा वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधील बातम्या आणि लेखावर आधारित आणि अतिरंजित होते. यामुळे मग राहुल गांधी यांचे पार्टीचे चलचित्र समोर आल्यावर रोष दिसायला लागला. इतकेच नाही तर काँग्रेस नेत्यांतर्फे चालवल्या जाणाऱ्या राजीव गांधी फौंडेशन या संस्थेला चिनी दूतावासातर्फे दोन वेळेला आर्थिक मदत दिल्या गेली आहे. २००३ मध्ये जवळपास ३ लाख, तर २०१३ मध्ये १० लाख 



या नंतर काँग्रेसचे नेते सुरजेवाला यांना समोर येत ही चित्रफीत नेपाळ येथील असून, राहुल गांधी नेपाळच्या खाजगी भेटीवर आहेत. ते तिथे आपल्या मैत्रिण सुमनीमा उदास यांच्या लग्नाला गेले असून, संबंधित छायाचित्र आणि चलचित्र त्या लग्नातील असल्याचा निर्वाळा दिला. सोबतच राजकीय व्यक्तींनी अश्या "पार्ट्या" किंवा "समारंभ" करूच नये का ? असा खडा सवाल केला. 


सुरजेवाला यांनी राहुल गांधी जेव्हा भारतातील चिनी दुतावसात जाऊन गुप्त वार्ता करून आले, तेव्हा पण त्यांचा बचाव करत होते. हा बचाव करतांना पण सुरजेवाल यांनी भारत सरकारच्या मंत्र्यांनी अधिकृत पणे केलेल्या चीन दौऱ्याची उदाहरणे देत हास्यास्पद बचाव केला होता. आता मात्र त्यांनी सुमनीमा उदास यांच्या लग्नाचे कारण दिले. या स्वतः पत्रकार आहेत. अमेरिकन वृत्तवाहिनी सी एन एन मध्ये काही वर्षे काम करून आहेत वगैरे त्यांची ओळख दिली. मात्र तरीही राहुल गांधी यांच्या या चलचित्रामुळे आणि त्यात दिसणाऱ्या चिनी व्यक्तींमुळे वाद निर्माण होत आहे. अर्थात याला कारणीभूत भूतकाळातील राहुल गांधी यांची चीन प्रेमी प्रतिमाच कारणीभूत आहे. 


बाकी खरे प्रश्न तर केंद्र सरकारला विचारायला हवे. आज भाजपा राहुल गांधी यांची चित्रफीत दाखवत असंख्य प्रश्न उभे करत आहेत. मात्र २००८ साली चीन सोबत झालेला काँग्रेसी करारा पासून राहुल गांधी यांच्या लुपत छपत केलेल्या चिनी दूतावसातील भेट आणि त्या मध्ये नक्की काय चर्चा झाल्या याचा तपास भारत सरकारने का केला नाही? गृहमंत्री म्हणून अमित शहा यांची ती जवाबदारी नाही काय? बाकी आपले अजित डोवाल सारखे गुणी अधिकारी इथेच का शांत बसतात? हे प्रश्न आपण विचारायला हवेत.

टिप्पण्या