डॉलर समोर घसरलेला रुपया आणि त्याच वेळी श्रीलंकेत सत्ताधारी नेत्यांविरोधात झालेला हिंसाचार या मुळे अनेक नक्षली एकदम आनंदाने नाचायला लागले आहे. भारतात क्रांतीचे स्वप्न बघत आहेत.
मात्र चिनी कोरोना नंतर भारताची अर्थव्यवस्था रशिया, तुर्की सारख्या भारताच्या सोबत असलेल्या अर्थव्यवस्थेपेक्षा बरीच चांगली आहे. रशियाने युक्रेन विरोधात युद्ध सुरू करून जगाचे प्रतिबंध स्वतःवर ओढवून घेतले आहेत. मात्र तुर्कस्थानच्या सतत घसरणाऱ्या लिरामुळे तेथील जनता सध्या मेटाकुटीला आली आहे. चिनी कोरोना नंतर जगभरात महागाई वाढली आहे, त्याची कारण काही स्थानिक तर काही जागतिक असली तरी असर सारखाच आहे. ज्यांना श्रीलंकेच्या घटनेने "क्रांतीची" स्वप्न पडत आहेत त्यांना निकटच्या भविष्यात हा आनंद मिळणार नाही हे नक्कीच ध्यानात घ्यावे.
बाकी खाली जागतिक स्थितीत सध्या "क्रांती" करता येईल अशी परिस्थिती असलेले दहा देश आणि तेथील महागाईची टक्केवारी देत आहे. बघा जमते का तिथे जाऊन "क्रांती" करायला.
यात पहिल्या नंबरवर आहे सौदी पाठोपाठ सगळ्यात जास्त तेल उत्पादन करणारा आणि एकेकाळी कम्युनिस्ट देशाच्या पंगतीतील कोहिनुर हिरा!आजही जिथे कम्युनिस्ट राज्य करत आहे असा व्हेनेझुएला येथील महागाई दर ११९८.०% इतका वाढला असून ही टक्केवारी जगात सगळ्यात जास्त आहे. यानंतर येतो सुदान ३४०.०%, नंतर लेबनॉन २०१.०%, या नंतर गृहयुध्दात अडकलेला सीरिया १३९.०%, नंतर सुरींनामे ६३.३%, नंतर झिंबांबे ६०.७%, या नंतर पुन्हा डाव्या विचारांवर पोसलेले सरकार असणारा अर्जेन्टिना ६०.७%, या नंतर समस्त मुस्लिम जगताचा खलिपा तुर्की ३६.१%, नंतर जगात इस्लामी क्रांती करणारा इराण ३५.२% आणि दहाव्या नंबरवर आहे इथिओपिया ३३.०% ! हे आकडे आहेत जानेवारी २०२२ चे !
आता आपण भारताच्या शेजारी राष्ट्रांचा महागाई दर बघू. यात पहिले भारतातील तमाम उदरामतवादयांचा स्वर्ग असलेला पाकिस्थानचा महागाई दर आहे १२.७% (मार्च २०२२), नेपाळचा दर ७.१४% (मार्च २०२२), बांगलादेशचा महागाई दर आहे ६.२२% (मार्च २०२२), तर श्रीलंका येथे आहे २१.५% (मार्च २०२२) म्हणजे श्रीलंकेत क्रांती झाल्यानंतर आता पाकिस्थान आणि नेपाळला क्रांतीची जास्त गरज आहे. या सगळ्या देशांच्या मानाने भारताचा महागाई दर आहे ५.७% (मार्च २०२२) !
असो, चिनी कोरोना नंतर जगातील अनेक अर्थव्यवस्था घायकुतीला आल्या आहेत, त्यात युक्रेन-रशिया युद्धाने अधिक भर टाकली आहे. महागाई वाढत जाणे हा जगातील प्रत्येक देशासमोरील प्रश्न आहे. अगदी अमेरिकेत पण तो ८.५% (मार्च २०२२) पर्यंत पोहचला आहे.
तेव्हा देशातील क्रांतिकरकांनो आपल्या देशात क्रांती सुरू करण्यापूर्वी, मानवतेच्या दृष्टीकोनातून भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्थान, नेपाळ येथे पहिले क्रांतीची हाक द्या....शिवाय जागतिक क्रमवारी दिलीच आहे...या प्रत्येक देशात "क्रांती" ही झालीच पाहिजे...काय वाटते?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा