इतिहास यहुदी धर्माचा आणि इस्रायलचा



इतिहासाची तोडामोड आणि आपल्याला लाभ होईल या पद्धतीने इतिहास सांगणे ही आधुनिक जगाची एक कला झाली आहे. या सगळ्यात डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी त्यात आघाडी घेतलेली दिसत असली, तरी ख्रिश्चन आणि इस्लामी धार्मिक इतिहासकार पण यात कमी नाहीत. म्हणूनच आज फिलिस्तीन इस्रायल विवादात फिलिस्तीनी हा मूळ देश आणि फिलिस्तीनी अरबी मुस्लिम हे मूळ निवासी असल्याचे ओरडून सांगितल्या जात आहे. दावा असा केल्या जात आहे की फिलिस्तीनी लोकांनी हिटलरने अत्याचार केलेल्या यहुदी धर्मियांना आश्रय दिला आणि ब्रिटिशांनी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी फिलिस्तीन देशाचे तुकडे करत इस्रायल देशाची निर्मिती केली. पण खरेच हे खरे आहे? काय आहे इस्रायलचा इतिहास?




इस्रायलचा इतिहासाकडे बघतांना आपल्याला यहुदी धर्माचा इतिहास पण समजून घ्यावा लागेल. अब्राहम किंवा इब्राहिम फादर नोवा यांचे अकरावे वंशज ! आता फादर नोवा आपल्याला माहीत आहेत, ते त्यांनी निर्माण केलेल्या मोठ्या होडी मुळे ! कथा अशी की जगात पाप वाढल्यामुळे देवाचा कोप झाला आणि त्याने सगळी पृथ्वी पाण्यात बुडवायला सुरवात केली. तेव्हा फादर नोवाने मोठी होडी बनवत पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षण केले.



तर अब्राहम त्यांच्या वंशातील ! अब्राहम मेसोपोटामिया भागात राहायचे, हा भाग म्हणजे आजचा ग्रीस ते इराण मधील प्रदेश. त्यांचे वडील त्या काळातील प्रचलित वेगवेगळ्या देवांच्या मुर्त्या बनवायचे आणि विकायचे. मात्र अब्राहम यांना प्रचलित धर्म आणि देवा बद्दल काही शंका होत्या, ज्याची योग्य उत्तरे मिळत नसल्यामुळे त्यांच्या या मूर्त्यांवरील देवांव विश्वास उरला नव्हता. मूर्तीत देव असतो यावर पण त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या वडिलांनी अनेक प्रकारे त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला, मात्र ते सफल झाले नाहीत.

एक दिवस अब्राहमला मात्र "यहोवा" नावाच्या देवाचा दृष्टांत झाला आणि त्यांनी अब्राहम यांना आदेश दिला की, अब्राहम यांनी राहती जागा सोडावी आणि कनान प्रदेशात जावे, ती जमीन देवाने अब्राहम आणि त्याच्या वंशजांना बहाल केली आहे. या बदल्यात अब्राहमने माझा प्रचार करावा, मी यहोवा आहे आणि मीच एकमेव देव असून सर्वश्रेष्ठ आहे.

हा कनान प्रदेश म्हणजेच आजचा इस्रायल आणि इजिप्तचा भाग. देवाचा आदेश मानून अब्राहम यांनी आपले बस्तान कनान प्रदेशात बसवले, तेथे त्यांनी यहोवा देवाचा प्रचार सुरू केला. तर या अब्राहम यांची बायको होती सारा. या दोघांना मूल हवे होते. देवाने दृष्टांत दिला होता की, "मी वचन देतो की तुला मूल होईल." मात्र अब्राहम यांचा धीर सूटत चालला होता. मग अब्राहम यांनी एका दासी सोबत लग्न केले. त्यांना मुलगा झाला "इस्माईल"!

या नंतर देवाचा दृष्टांत उशिरा का होईना फळाला आला. साराला पण मूल झाले "इसाक" ! या अब्राहमची परीक्षा घ्यावी म्हणून देवाने अब्राहमला स्वतःच्या मुलाचा बळी देण्याचे आदेश दिले. अब्राहमने कोणताही विचार न करता इसाकला दगडावर ठेवले आणि त्याला मारणार इतक्यात देव प्रगट झाला, प्रसन्न झाला आणि त्याने अब्राहम आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद दिले. इस्माईल नंतर अरबस्थान येथे जाऊन स्थायिक झाला. त्याचा वंशज म्हणजे मुहम्मद ज्यांनी नंतर तिथे इस्लामची स्थापना आणि प्रचार केला. मात्र अब्राहम, अब्राहमचा मुलगा इसाक आणि अब्राहमचा नातू आणि इसाकचा मुलगा जेकब हे त्या कनान प्रदेशात राहिले आणि यहोवा देवाचा प्रचार करू लागले.

या जेकबला अब्राहम यांनी यहोवा देवाचे दुसरे नाव दिले यीसरैल ! देवाने वचन दिल्या प्रमाणे अब्राहम नंतर कनान प्रदेश इसाकच्या वर्चस्वात आला आणि नंतर जेकब म्हणजे यीसरैलच्या. याच यीसरैल वरून या भागाला नाव पडले इस्राएल आणि या धर्म झाला यहुदी ! अब्राहम, इसाक आणि जेकब हे यहुदी धर्मियांचे कुळपिता !

जेकबला बारा मुले झाली. मग इस्रायलचे बारा भाग करून या मुलांनी आपसात वाटून घेतले आणि धर्म प्रचार करू लागले. सगळे सुरू असतांना इस्रायलमध्ये भयानक दुष्काळ निर्माण झाला. यहुदी धर्मियांना पहिल्यांदा तेव्हा इस्रायलच्या भूमीतून मोठ्या प्रमाणावर पलायन करावे लागले. तेव्हा ते गेले शेजारील इजिप्तमध्ये ! सुरवातीला नाईल नदीच्या किनारी शांतपणे ज्यू आपले जीवन जगू लागले. मात्र काही वर्षातच त्यांनी तिथे आपल्या यहोवाचा आणि यहुदी धर्माचा प्रचार सुरू केला. या लोकांच्या अश्या वागण्याने इजिप्तचा फैरो चिडले, कारण ते स्वतःला देवाचा अंश असल्याचे जनतेला सांगायचे. तेव्हा फैरोने कारवाई करत यहुदी धर्मियांना गुलाम बनवले. अनेक वर्षे गुलामगिरीत गेल्यावर त्यांना त्यांचा मसीहा मिळाला "मोझेस" !



मोझेसला बळ मिळाले यहोवाचे ! मग त्याने यहुदी धर्मियांची इजिप्तच्या गुलामगिरीतून सुटका केली आणि त्यांना वापस आपल्या कुलपत्यांच्या भूमीत म्हणजे इस्रायलला वापस आणले. यहुदी मधील दोन जमाती इथे राज्य करायला लागले. एक होते किंगडम ऑफ जुदाह आणि दुसरे किंगडम ऑफ इस्रायल. इथून सुरू होतो इस्रायलचा खरा इतिहास !



ईसा पूर्व १०१० मध्ये इस्रायल मध्ये जन्माला आले किंग डेव्हिड ! किंग डेव्हीडयांनी दोन भागात विभागल्या गेलेल्या इस्रायलचे एकत्रीकरण केले आणि बनवले विशाल युनायटेड किंगडम ऑफ इस्रायल. राजधानी म्हणून येरुशेलम शहर यांनी वसवले आणि त्यांचा पुत्र सोलोमन याने येरुशेलम येथे पहिले यहुदी देवाचे मंदिर बांधले. हे मंदिर त्याच दगडावर बांधले ज्या पवित्र दगडावर अब्राहम आपला मुलगा इसाकला बळी देणार होता. या सगळ्या मुळे येरुशेलम शहर यहुदी धर्मियांसाठी जगातील सगळ्यात पवित्र शहर बनले. तत्कालीन युनायटेड किंगडम ऑफ इस्रायल वर्तमान काळात इजिप्त, इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, फिलिस्तीन आणि सीरिया या देशात वाटल्या गेले आहे हे लक्षात घेणे गरजेचे.

मात्र हे चांगले दिवस इस्रायल करता जास्त दिवस राहिले नाहीत. साधारण ईसापूर्व ९७० नंतर इस्रायलवर हल्ला केला बॅबिलोनियन नेबुचंदनेझरनने ! हा हल्ला मोठा आणि भयानक होता. यहुदी लोकांची यात हार झाली, मोठ्या प्रमाणात यहुदी धर्मियांचे शिरकाण केल्या गेले, अत्याचार केल्या गेले. नेबुचंदनेझरनने यहुदी धर्मियांचे येरुशेलम मधील मंदिर तोडले. त्यांना येरुशेलम मधून हाकलले. काही यहुदी धर्मीय तेव्हा देश सोडून पळाले.

मात्र ही परिस्थिती काही वर्षेच टिकली. बॅबिलोनियन प्रभाव कमी होत असतानाच पुन्हा यहुदी लोकांनी या भागावर आपला प्रभाव वाढवला. हेरॉल्ड द ग्रेट याच्या कार्यकाळात साधारण ईसापूर्व ५३७ ते ५१६ या मध्ये जेरुशेलम येथे पुन्हा यहोवाचे पवित्र मंदिर बांधण्यात आले. याला म्हणतात सेकंड टेम्पल ऑफ येरुशेलम !



पुन्हा यहुदी धर्मीय आपल्या शहरात आणि मंदिरात पोहचले. पण हे दिवस पण फार काळ राहिले नाही. या नंतर तिथे उगवला सिकंदर म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट ! मात्र सिकंदरने जरी इस्रायल जिंकले आणि रोमन साम्राज्यात मिळवले तरी तेथील प्रशासनिक व्यवस्था ही यहुदी धर्मीयांच्याच हातात ठेवली. मात्र जग जिंकायला निघालेला सिकंदर जेव्हा जर्जर अवस्थेत वापस यायला निघाला आणि मेला. त्या नंतर रोमन साम्राज्याचा राजा बनला किंग एंटीओकस ! मात्र हा राजा सिकंदर सारखा विशाल हृदयी नव्हता. त्याच्या काळात यहुदी मंदिर भ्रष्ट केले. या विरोधात यहुदी धर्मियांनी मोकबिस याच्या नेतृत्वात रोमन विरोधात बंड पुकारले. ते यशस्वी झाले. पुन्हा इस्रायल उभा राहिला. मात्र हे सुख यहुदी धर्मियांना जास्त दिवस मिळाले नाही. जवळपास दोनशे वर्षानी पुन्हा रोमन लोकांची नजर या भागावर पडली. मग टीटस आला, त्याने जेरुशेलम पुन्हा जिंकले आणि इस्रायल पुन्हा आपल्या साम्राज्याला जोडला. जेरुशेलमचे पवित्र सेकंड टेम्पल तोडण्यात आले. या वेळेस संपूर्ण सत्ता रोमन लोकांच्या हातात गेली. यहुदी धर्मीय आपल्याच देशात गुलाम झाले, त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली. काही वर्ष जात नाही तर यहुदी धर्मीय पुन्हा एकत्र आली सायमन बार कोखबाच्या नेतृत्वात. यहुदी धर्मियांनी रोमन साम्राज्या विरोधात पुन्हा एकदा बंड पुकारले. मात्र या वेळी नशिबाने साथ दिली नाही. बंड फसले, सायमन मारल्या गेला. मात्र या प्रकाराने रोमन चिडले. त्यांनी यहुदी आणि इस्रायलचे अस्तित्वच नष्ट करण्याचा विडा उचलला. यहुदी धर्मियांचा पुन्हा छळ सुरू झाला. त्यांना इस्रायलच्या भूमीवरून हकलण्यात आले. या वेळेस मात्र यहुदी धर्मियांना आपल्या भूमिपासून जास्तच दूर जावे लागले. इस्रायलच्या आजूबाजूच्या राज्यात त्यानी शरण घेतली, तर काही थेट युरोप पर्यंत पोहचले, काही अरेबियामध्ये स्थानांतरित झाले, तर काही थेट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहचले. जे यहुदी धर्मीय इस्रायल मध्ये राहिले त्यांचा अतोनात छळ झाला. याच काळात जेरुसेलमचे नाव बदलून एलिया कॅपीटोलोना करण्यात आले आणि इस्रायलचे फिलिस्तीन !

या सगळ्या घडामोडीत इस्रायलच्या भूमीवर अजून एक इतिहास लिहल्या गेला आणि एका नवीन मसीहाचा, धर्माचा जन्म झाला. या काळात बेथलेहम येथे यशु ख्रिस्ताचा जन्म झाला. इसवीसन ४ मध्ये जन्म झालेल्या यशूला इसवीसन ३० मध्ये येरुशेलम येथे सुळावर चढवण्यात आले. अर्थात यशूला जेव्हा सुळावर चढवण्यात आले तेव्हा रोमन साम्राज्य होते आणि येशूवर मुख्य आरोप होता रोमन धर्माला विरोधाचा. येशू पकडल्या गेला तो मात्र एका यहुदी धर्मियांने यशु सोबत केलेल्या प्रतारणेमुळे. मात्र या सगळ्यात येशूला सुळावर चढवल्यानंतर यशूच्या सहकाऱ्यांची तेथून पांगापांग झाली. मात्र त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू ठेवला. जे रोमन साम्राज्य वेगवेगळ्या देवांना मानत आणि इतर कोणत्याही धर्माला विरोध करत त्या रोमन लोकांनीच मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

ग्रीक मध्ये या नंतर बायझेनटाइन राजवट आली. जी धर्माने मोनोथेईस्ट ख्रिश्चन होते. ही राजवट अतिशय शक्तिशाली होती. आता या राजवतीसाठी फिलिस्तीन म्हणजे इस्रायल हे धार्मिक महत्वाचे ठिकाण बनले आणि बेथलेहम आणि येरुशेलम ही पवित्र शहरे. या काळात एकीकडे ही शहरे ख्रिश्चन लोकांची झाली तर दुसरीकडे आधीच राजद्रोहाची शिक्षा भोगत असलेल्या यहुदी धर्मियांना आता धार्मिक अत्याचाराला पण सामोरे जावे लागले. कारण यशुला अडकवणारा यहुदी धर्माचा होता. तत्कालीन रोमनांनी आता ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याने ते मात्र पापमुक्त झाले होते. यहुदी मात्र पापमुक्त होणार नव्हते. या राजवटीने येरुशेलम मध्ये यहुदी लोकांना यायची बंदी केली. जे शहर यहुदी राजा डेव्हिडने वसवले, जिथे त्यांचे पवित्र मंदिर होते. त्यांनाच आता येरुशेलम मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली हे यहुदी जनतेचे दुर्दैव. लक्षात घ्या की यहुदी येरुशेलमच्या बाहेर होते इस्रायलच्या बाहेर नाही. इतर भागात गुलामी आणि धार्मिक छळाला सहन करत ते टिकून होते.

इकडे जेव्हा ख्रिश्चन धर्म वाढत होता. त्याच्या काही वर्षातच अरबस्थानात इस्लामचा जन्म झाला. इसवीसन ५७० मध्ये पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला. साधारण इसविसन ६१० मध्ये त्यांना कुराणचे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांचा मृत्यू इसवीसन ६३२ ला झाला. मात्र या काळात इस्लामने संपूर्ण अरबीस्थान आणि आजूबाजूचा प्रदेश पादाक्रांत केला होता. पैगंबरांच्या मृत्यू नंतर इस्लामने इराक आणि सीरिया जरी ताब्यात घेतले असले तरी येरुशेलम मात्र इसवीसन ६४० पर्यंत स्वप्नच होते. पैगंबर मुहम्मद पाहिले आपली नमाज येरुशेलम कडे तोंड करूनच करत. मात्र नंतर ईश्वरीय आदेशाने त्यांनी मक्केकडे तोंड करत नमाज करायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराने इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्यात येरुशेलम शहर किती महत्वाचे होते हे लक्षात येईल. कथा अशी की देवाने अल इसरा वल मेराजच्या रात्री एक खास सवारी बुर्रक पाठवत त्यांचा मक्का ते येरुशेलम प्रवास सुकर केला. पैगंबरांनी याच काळात येरुशेलम येथे नमाज केली. जिथे नमाज केली तीच जागा म्हणजे यहुदिंचे पवित्र मंदिर असलेले ठिकाण आहे. ज्याला सगळ्यात दूरची मस्जित म्हंटले जाते आणि मक्का मदिना नंतर इस्लाम मधील सगळ्यात पवित्र जागा. असे समजले जाते की येथूनच पैगंबर सदेह स्वर्गात गेले.

तर इसवीसन ६४० मध्ये येरुशेलम इस्लामच्या ताब्यात आले. या नंतर एक बदल झाला तो म्हणजे इस्लामी खलिफा राशीदून यांनी यहुदी जनतेला येरुशेलममध्ये प्रवेशाची मुभा दिली आणि आपले धार्मिक कार्य करण्याचीही. अर्थात या औदर्याची पण काही कारणे होती. येरुशेलम जिंकल्यावर येथील जनता मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्म मानणारी होती. आपले राज्य स्थिर करायला पहिले तिथे इस्लामचा प्रचार करणे आणि अनुयायी बनवणे आवश्यक होते. यहुदी धर्मापेक्षा इस्लामला मोठा लष्करी धोका खिश्चनांकडूनच होता. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला मुस्लिम राज्यकर्त्यांनी यहुदी लोकांना काहीसे झुकते माप दिले. मात्र लवकरच तलवारीच्या जोरावर आणि बक्षीसाच्या आमिषाने येरुशेलम आणि इस्रायल परिसरात इस्लाम फोफावला. परिणामी या नंतर येरुशेलम मधील जिथे यहुदी धर्मियांचे पहिले पवित्र मंदिर बांधले गेले होते त्या दगडावर मुस्लिमांनी एक घुमट बनवला तो ओळखल्या जातो "डोम ऑफ रॉक" म्हणून हे त्यांनी केले इसवीसन ६९१ मध्ये. या नंतर इसवीसन ७०९ मध्ये अल अक्सा मशीद बांधल्या गेली बरोबर त्याच ठिकाणी जिथे यहुदी लोकांचे दुसरे पवित्र मंदिर बांधल्या गेले होते. इथूनच यहुदी आणि मुस्लिम यांच्या मध्ये कटुता यायला सुरुवात झाली. या नंतर आज पर्यंत यहुदी या अल अक्सा मशीदीच्या पश्चिमी भिंतीची पूजा करतात जी साधारण ईसविसनापूर्वी ३५२ मध्ये बांधलेल्या दुसऱ्या पवित्र मंदिराची भिंत आहे असे मानले जाते.

मात्र १०९५ मध्ये ख्रिश्चन धर्मगुरू पोप अर्बन दुसरे यांनी धर्मयुद्धाची म्हणजेच क्रुसेडची हाक दिली. या काळात १०९६ ते १०९९ या काळात ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्यात हे युद्ध झाले. मात्र या युद्धात यहुदींनी इस्लामी लोकांना साथ दिली. कारण सरळ होते जरी यहुदी दुय्यम नागरिक होते तरी ते येरुशेलम या पवित्र शहरी राहू शकत होते. ख्रिश्चन आले तर यहुदींना येरुसेलमच काय तर इस्रायली भूमी वरून ख्रिश्चन पळतील अशी त्यांना भीती होती. अर्थात येरुशेलम पडले, ख्रिश्चन जिंकले आणि यहुदी जनतेची ही भीती किती वाजवी होती याचा लगेच प्रत्येय यायला लागला. पुन्हा त्यांच्या वाटेला कत्तली, पलायन आणि येरुशेलम प्रवेश बंदी आली. या नंतर जवळपास सात क्रुसेडच्या लढाया झाल्या. ११४७ ते ११४९ दुसरी, ११८८ ते ११९२ तिसरी, १२०२ ते १२०४ चवथी, १२२८ ते १२२९ पाचवी, १२४८ ते १२५४ सहावी आणि १२७० ते १२७२ सातवी. या सगळ्या लढाया ख्रिश्चन आणि इस्लाम मधील असल्या तरी ज्याचे पारडे जड असेल त्याच्या अत्याचार मात्र यहुदी जनतेला भोगावेच लागत होते. यहुदी लोकांचे शिरकाण, महिलांवर अत्याचार, गुलाम म्हणून विक्री हे सगळे भोग यहुदी धर्मियांच्या वाट्याला येत होते. शेवटी १२६८ मध्ये तुर्की ऑटोमन साम्राज्याने येरुसेलमवर आपले झेंडे लावले. पण तो प्रयत्न खिश्चनांची पण धार कमी झाली होती, युरोपला आता नवी दृष्टी मिळाली होती. १२९१ मध्ये फिलिस्तीनचा जो काही छोटासा तुकडा ख्रिश्चनांच्या हातात होता, तो ऑटोमन राज्याचा भाग झाला आणि युद्धाची धावपळ काही दिवस थांबली.

ऑटोमन काळात यहुदी लोकांवर जास्त बंधने नव्हती त्यामुळे हा काळ जरी काही प्रमाणात यहुदी जनतेला सुसह्य असला तरी, धार्मिक दबाव त्यांच्यावर कायम होता. येरुशेलम मध्ये पुन्हा यहुदी राहू शकत असले तरी दुय्यम दर्जाची वागणूक त्यांना मिळत होतीच.

१८ व्या शतकात जागतिक समीकरणे बदलली. इंग्लंड, डच, फ्रेंच आणि जर्मन हे देश वेगळ्या पद्धतीने जगातील अनेक देश आपल्या पंखाखाली घ्यायला लागले. इस्रायल मधून परंगदा झालेल्या आपल्या यहुदी बांधवांकडून ते सगळे बदल मूळ भूमीतील यहुद्यापर्यंत पोहचत होते. याच काळात मग होणाऱ्या धार्मिक अत्याचाराला विरोध म्हणून आणि आपल्याच भूमीत आपण गुलाम झालो असल्याचे लक्षात आल्यावर जगभरातील यहुदी लोकांनी एक चळवळ सुरू केली झिओनीजम ! लवकरच हे लोण थेट येरुशेलम पर्यंत पसरले. जवळपास १८८२ नंतर युरोपातील यहुदी पुन्हा आपल्या मूळ भूमीकडे वापस परतायला लागले. हे प्रमाण खूप मोठे होते. त्यातच १९१४ ते १९१८ पहिले महायुद्ध झाले. यात ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाला. फिलिस्तीन किंवा इस्रायलवर आता ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला.

याच काळात एकीकडे खिलपत रद्द झाल्याने मुस्लिम जगतात अस्वस्थता होती आणि ते कट्टरतेकडे झुकत होते, तर दुसरीकडे जागतिक स्तरावर यहुदिंची झिओनीजम चळवळ पण जोर पकडत होती आणि यहुदी लोक अधिक संख्येने इस्रायलमध्ये वापस येत होते. अश्या काळात हिटलरचा उदय झाला. जसा जसा हिटलर युरोप पादाक्रांत करत होता तसा तसा युरोप मधील यहुदी लोकांवर आत्याचार वाढत होते. तेव्हा तेथूल पलायन करणारे यहुदी जास्त प्रमाणात पुन्हा इस्रायल किंवा फिलिस्तीन मध्ये मोठ्या प्रमाणावर परतायला लागले. स्वतंत्र इस्रायल राष्ट्राची मागणी समोर आली ती याच काळात. कारण जगात सगळीकडे अत्याचार सहन करणाऱ्या आणि जी जागा आपल्या देवाने आपल्याला दिली आहे त्या जागेतही आपण गुलाम असल्याचे लक्षात आल्यावर आपला स्वतःचा देश हवा ही मानसिकता यहुदी जनतेत मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली. त्यातच ब्रिटिशांनी युद्धात मदत करण्याच्या बदल्यात यहुदी आणि मुस्लिम दोघांनापण स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले.



मात्र युद्ध संपल्यावर ब्रिटिश आपले वचन पूर्ण करतांना दिसत नाही बघितल्यावर यहुदींनी सशस्त्र लढा सुरू केला. शेवटी १४ मे १९४८ रोजी इस्रायल राष्ट्र जन्माला आले. मात्र अरबी फिलिस्तीनी मुस्लिमांचा आणि इतर मुस्लिम देशांचा याला प्रखर विरोध होता. पुढील इतिहास आपल्याला चांगलाच माहीत आहे.

आता या सगळ्या इतिहासावरून आपल्याला यहुदी धर्मियांच्या चिवट संघर्षाची भूमिका लक्षात येईल. मुख्य म्हणजे त्या भूमीवरील मूळनिवासी नक्की कोण हे पण लक्षात येईल.

टिप्पण्या