इकडे राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण सुरू आहे. दोन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पक्षाला भाड्याने जाणारे पक्ष आपसात त्यावरून वाद - प्रतिवाद करत आहेत. तर राज्यातील कथित पुरोगामी - नवपुरोगामी पक्ष आपली हक्काची मतपेढी या वादाच्या पार्श्वभूमीवर अधिक पक्की करायचा प्रयत्न करत आहे.
तिकडे दक्षिणेत कर्नाटकात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI ने हिजाब वरून सुरू केलेला खेळ, मुस्लिम दुकानदारांना मंदिर परिसरात व्यापार बंदी वगैरे वळणे घेत आता हलाल मास आणि हलाल सर्टिफिकेट पर्यंत येऊन पोहचला आहे.
एकूणच गेले अनेक वर्षे हिंदू अनेक प्रतिके आणि परंपरा या बाबत असे का? विचारत होते, त्याला उत्तर द्यावे लागत आहे आणि हीच पुरोगाम्यांची जळजळ आहे.
या सगळ्या प्रकरणात भारतातील एक मोठा पक्ष चांगलीच माती खात आहे. तो पक्ष म्हणजे "काँग्रेस" ! सध्याच्या घडीला भारतात धार्मिक राजकारण करत जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप काँग्रेस सतत भाजपावर करत असते. मात्र "तें" धार्मिक राजकारण करण्याची मोकळीक काँग्रेसच कशी भाजपाला देते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या राजस्थान येथे सत्तेत असलेले काँग्रेस सरकार आहे.
२ तारखेला राजस्थान मधील कैरोली येथे हिंदू नववर्ष प्रारंभ आणि चैत्र नवरात्र प्रारंभाचे औचित्याने हिंदू धर्मीयाकडून काढलेल्या धार्मिक रॅलीवर मुस्लिम समाजाकडून दगडफेक करण्यात आली. त्या नंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले, अनेक घरे आणि दुकाने जळाल्या गेली. आता या हिंसाचारा मागे दक्षिणेत सक्रिय असणारे मुस्लिम संघटना PIF चा हात असल्याचे आरोप होत आहेत. या आरोपानुसार राजस्थानचें मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राजस्थान पोलीस निदेशक यांना PIF ने अगोदरच पत्र लिहून अश्या धार्मिक रॅल्यांवर बंदी घालण्याची सूचना आणि काढल्यास होणाऱ्या परिणामांना सामोरे जायची धमकी दिली होती.
मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर राजस्थान काँग्रेस सरकार मात्र आपली मतपेढी शाबूत ठेवण्यात मश्गुल आहे. देशात ४ एप्रिल पासून मुस्लिमांच्या महत्वाच्या सणाची म्हणजेच रमजानची सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी ते सरकार कसे घेत आहे बघा. १/४/२०२२ रोजी राजस्थान सरकारने राजस्थान विद्युत वितरण संस्थेला एक आदेश पारित केला आहे. या आदेशात स्पष्टपणे सांगितल्या गेले आहे की, "४ तारखेपासून मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरू होत आहे. वाढणारा उन्हाळा लक्षात घेता आणि हा सण लक्षात घेता राज्यातील "मुस्लिम बहुल" भागात कपणतूनही पद्धतीने विद्युत आपुर्ती खंडित होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.या काळात या वस्त्यामधून कोणत्याही प्रकारे लोड शेडिंग होणार नाही."
खरे तर जसा रमजान महिना सुरू आहे, तसाच हिंदूंचे चैत्र नवरात्र पण सुरू आहेत. ज्या पद्धतीने मुस्लिम या महिन्यात "रोजा" ठेवत उपवास करतात, त्याच पद्धतीने हिंदू पण व्रत ठेवत उपवास करतात. मग या उन्हाळ्याचा त्रास फक्त मुस्लिम उपवासाला होतो आणि हिंदू उपवासाला होत नाही असे काही आहे का? मुस्लिम जनता माणसे आणि हिंदू जनता जनावर आहे का? अश्या प्रकारे आदेश काढत राजस्थान मधील काँग्रेस सरकार धार्मिक राजकारण करत नाही काय? यावर काँग्रेसचे युवराज आणि राजमाता काही बोलतील काय? भारतातील तमाम तथाकथित सर्वधर्मसमतावादी आणि उदारमतवादी जे भाजपच्या धार्मिक राजकारणावर तोंडसुख घेत असतात ते तरी या प्रकारावर काँग्रेसचा निषेध करतील काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा