मराठी माध्यमे हे लांगूचलान कशाला करतात?

सर्वधर्मसमभावाचा आविष्कार आणि मानवतेचे उदाहरण देत हिंदू डॉक्टरने उपवास असतांना मुस्लिमाचे प्राण वाचवले !

आज संकष्टीचा उपास असतांना सकाळी ८ वाजता खाल्लेल्या एक प्लेट साबुदाणा खिचडीच्या भरवश्यावर डॉ. देशपांडे यांनी ८ तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत शहरातील मुस्लिम बांधव अब्दुल यांचे प्राण वाचवले. सकाळी ९ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया संध्याकाळी ५ वाजता संपली, त्यानंतर जवळपास ४ तास त्यांच्या तब्येतीची काळजी घेत डॉ. देशपांडे दवाखान्यात थांबले. अब्दुल यांची तब्येत स्थिर झाल्यावर घरी जाऊन त्यांनी आपला उपवास सोडला. इतक्यात वाढलेल्या धार्मिक विद्वेषाच्या दिवसात उपवासाच्या दिवशी डॉ. देशपांडे यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे शहरात आणि राज्यात आनंदाचे वातावरण आहे, अनेक मानवतावादी त्यांचे अभिनंदन करत आहेत. 



कशी वाटते ही बातमी वाचायला?......हास्यास्पद वाटते ना? .....अशी बातमी कधी बघितली आहे का? भारतातील, राज्यातील कोणतेही वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी असे वृत्त चालवणार आहे का? मुळात कोणत्याही हिंदूला या घटनेत अशी बातमी लपली आहे हे लक्षात तरी येणार आहे का? कारण त्या डॉक्टरने आपले "कर्तव्य" निभावले आहे. इथे देशपांडे नसते, त्या ऐवजी जाधव, पवार, मानकर, नंदपवार, असे कोणतेही आडनाव असते तरी ही घटना बातमी म्हणून अश्या पद्धतीने समोर आली नसती. 

पुण्यात वारजे पुलावर झालेल्या एका अपघातातील चिमुकलीला खांद्यावर घेऊन दवाखाना गाठत तिचे प्राण तिथे "कर्तव्यावर" असलेल्या महाराष्ट्र पोलीसच्या वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याने वाचवले. या पोलिसाचे नाव समीर बाग सिराज ! नक्कीच अतिशय कौतुकास्पत अशी कामगिरी त्यांनी केली, त्या बद्दल नक्कीच त्यांचे जितके कौतुक व्हायला हवे तितके कमी आहे हे मी मान्य करतो आणि त्यांचे अभिनंदन पण करतो. 



मात्र लोकसत्ता, लोकमत सारख्या दैनिकांनी आणि बी बी सी सारख्या वृत्तवाहिन्यांनी ही बातमी देतांना त्यांचा धर्म आणि त्यांच्या धर्मात सध्या सुरू असलेल्या उपवासाला जास्त महत्व दिलेले खटकते. होय, समीर बाग सिराज हे धर्माने मुस्लिम आहेत आणि त्याच्या धर्मातील पवित्र महिना रमजान सुरू आहे. त्यांच्या धार्मिक रीती नुसार या काळात अनेक धार्मिक मुस्लिम रोजे म्हणजे उपवास पाळतात, काही सूर्य उगवल्यावर पाणीही न पिता कडक पद्धतीने किंवा काहीही न खाता हा उपवास पाळल्या जातो. 

तेव्हा मग तत्कालीन काळात "कर्तव्यावर" असलेल्या पोलिसाने आपले कर्तव्य योग्य तर्हेने बजावल्यावर त्यात त्यांचे उपवास असल्याचे जाणीवपूर्वक लिहण्याची काय गरज आहे? समीर बाग सिराज हे शासकीय नोकरीत, तेही पोलीस दला सारख्या अतिशय महत्वाच्या नोकरीत आहेत. पोलीस दलाने राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक आणीबाणीत, धर्म, जात, भाषा , पंथ या सगळ्याची दखल न घेता आपले "कर्तव्य" बजावणे हे गृहीत धरण्यात आले आहे. त्याच पद्धतीने सिराज यांनी ते बजावले इतकेच. उपवासाचा इतका बाउच होता तर मग "कर्तव्यावर" न येता, सरळ महिनाभर सुट्टी टाकून आपल्या खाजगी धार्मिक आस्था पूर्ण करत घरी बसायचे. उपवास असतांना "कर्तव्यावर" येणे हा त्यांनी ठरवले होते आणि ते "कर्तव्यावर" असतांना आणीबाणी येणे हे नियतीने ! तेव्हा त्यांनी रोजे असतांना "कर्तव्य" निभावले असे विशेष कशाला? 

बाकी राज्यात बहुसंख्य हिंदू पण पोलीस दलात काम करतात. त्यातील अनेक धार्मिक वृत्तीचे आहेत. हिंदू धर्मात पण आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र किंवा नवरात्र या काळात कडक उपवास करणारे आहेत. अगदी पोलीस दलातपण असतील. ते पण कर्तव्य बजावीत असतात. मात्र कधी आषाढी एकादशीचा उपवास असतांना पंढरपुरात पोलिसांनी योग्य पद्धतीने गर्दी सांभाळली आणि कर्तव्य निभावले अशी बातमी दिसते काय? तेव्हा कोणी धर्म विशेष आहे म्हणून विशेष वागणूक देणे सोडा. 



तसा विचार केला तर रोजा सुरू करतांना सुर्योदया पूर्वी "सहरी" केली जाते. म्हणजे सूर्य उगवायच्या आधी खाल्ले जाते आणि सुर्यास्ता नंतर "इफ्तार" म्हणजे व्यवस्थित जेवण केल्या जाते. मधल्या काळात पाणी प्यायचे की नाही हा ज्याचा त्याचा वयक्तिक मामला असतो. म्हणजे पोटभर जेवून उपवास असतो तो. फक्त हिंदूच स्वतःच्या धर्मातील उपवासाला "एकादशी दुप्पट खाशी" वगैरे दूषणे देतात. तरी काही धार्मिक हिंदू नवरात्रीत किंवा एखाद्या दिवशी काहीही न खाता आणि पाणीही न पिता उपवास करतात आणि आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडतात. मात्र त्यांची पण खिल्ली उडवायला हेच पुरोगामी वृत्तपत्रे समोर असतात. 

असो, सिराज सहबांनी दाखवलेल्या "कर्तव्य भावनेला" मनापासून सलाम ! फक्त त्याच्या वयक्तिक धार्मिक आस्थेचे प्रदर्शन करू नये आणि त्यांच्या धार्मिक उपवासाचा "कर्तव्य" करतांना त्रास होत असेल तर सरळ सुट्टी मारावी.

टिप्पण्या