मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्यातील कडव्या हिंदुत्ववाची शिवसेनेने उतरवलेली झुल स्वतःच्या अंगावर ओढली आणि राज्याच्या हिंदुत्वाच्या राजकारणात नवीन खेळ सुरू झाला. आता राज ठाकरे स्वतःचा कोणता विचार करत राजकारण करत आहेत की हे सगळे प्रायोजित राजकारण आहे याचा उहापोह या आधीही केला आहे तेव्हा पुन्हा त्यावर येथे वेळ घालवण्यात अर्थ नाही. बाकी राज ठाकरे यांनी "मशिदीच्या भोंग्यांविरोधात" आवाज उठवला. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाविरोधात राष्ट्रवादी उभी झाली.
मग सर्वधर्मसमभाव दाखवायचा ठेका घेतलेल्या राष्ट्रवादीने हिंदू मंदिरात मुस्लिमांना इफ्तारच्या पार्टीचे आमंत्रण दिले. त्यावरून पुन्हा एक नवीन खेळ सुरू झाला.
खरे तर हिंदू मंदिरात किंवा हिंदू उत्सवाच्या ठिकाणी नमाज पढणे किंवा इफ्तार करणे म्हणजे सर्वधर्मसमभाव दाखवणे यात नवीन काहीच नाहीये, हे सगळे थेर आधीपण झाली आहेतच की!
गणपती उत्सवात गणपती बसवला आहे तिथे नमाज केल्याचे अनेक व्हीडियो उपलब्ध आहेत. यात नावीन्य काय? यात नावीन्य आणि खरा सर्वधर्मसमभाव तेव्हाच दिसेल जेव्हा मशिदीत शरद पवार सत्यनारायण घालू शकतील. पुरोगामीपणाला बट्टा नको म्हणून "सत्यनारायण" नाही घातला तरी किमान "बुद्ध वंदनेचे" आवाज तरी मशिदीच्या भोंग्यातून येऊ द्या. कमीत कमी "जय भीम, जय मीम" च्या घोषणेचा खरेपणा तरी दाखवून द्या.
असो, राज ठाकरे यांनी घेतलेल्या कथित हिंदुत्ववादी भूमिकेने आणि मशिदीच्या भोंग्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मनसेतील मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडत असल्याच्या बातम्या येत आहे. मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी मंदिरात इफ्तार करण्याची हिम्मत दाखवते आणि त्या पक्षातील एकही हिंदु त्याचा साधा निषेध करत नाही. यातच हिंदूंचे "X X त्व" दिसून पडते.
बाकी हिंदूतवादी भाजपा निदान तेथे जाऊन काळे झेंडे तरी दाखवण्याची हिम्मत करणार का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची "हिंदु जागरण", "विश्व हिंदू परिषद" झोपली काय?
अर्थातच संघ या सगळ्याकडे दुर्लक्ष करणार ! रमजान मध्ये इफ्तार पार्ट्या झोडण्यात मश्गुल असलेला मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या स्वयंसेवकाला, "राम नवमीच्या" दिवशी देशभरात झालेल्या हिंसेवर अजून काहीही बोलता आले नाही यातच सगळे आले.
मात्र तरीही समाज माध्यमांवर, "विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी या पुणे येथे होणाऱ्या हनुमान मंदिरातील इफ्तार पार्टीला मोठा विरोध केला आणि त्या विरोधपुढे झुकत आता या इफ्तारची जागा बदलल्या गेली आहे." असा संदेश फिरत आहे. एकतर हा संदेश खोटा आहे. समजा हा संदेश प्रचारीत करण्याचा कोणी खोडसाळपणा करत आहे आणि समजा हा संदेश खरेच बजरंग दल - विश्व हिंदू परिषद कडून आला असेल तर ते तुम्हाला वेडा बनवत आहे. कारण राष्ट्रवादीचा कार्यक्रम अतिशय निर्धोकपणे संपन्न झाला आहे. तुमच्या नाकावर टिचून, तुम्हाला वाकोल्या दाखवत. कारण या विरोधात ना भाजपाने राजकीय भूमिका घेतली आणि विरोध केला, ना विश्व हिंदू परिषद, ना बजरंग दल, ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि हेच सत्य आहे.
एकूण काय तर, स्वतःची बेडकी फुगवण्यात काय फुशारक्या आहेत....बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेत इतका दम असता तर रामनवमीला देशभरात हिंदूंवर हल्ला करायचे कोणाच्याच मनात आले नसते......
अहो निदान खरे सांगा.....नाही थांबवता आला असा कार्यक्रम...
बाकी राहिला मशिदी वरील भोंग्यांचा वाद, तर त्या वादात कोणत्याही सरकारने अगदी हिंदुत्ववादी भाजपा सरकारनेही काहीही न करण्याचे धोरण ठेवले. २०१३ सालीच न्यायालयाने या मशिदीवरील भोंग्यांसाठी काही मार्गदर्शक तत्वे लागू केली होती. त्यात १) मशीद आणि मंदिरावरील अधिकृत मान्यता नसलेले भोंगे, तसेच अधिकृत मान्यतेपेक्षा जास्त असलेले भोंगे काढायचा सरळ आदेश होता. २) सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विशिष्ठ डेसिमलमध्येच आवाज ठेवण्याची सक्ती होती. ३) शाळा, कॉलेज आणि दवाखाने असलेल्या ठिकाणी अधिकृत शांतता क्षेत्राचा नियम कसोशीने पाळत, त्या क्षेत्रात भोंगे वाजणार नाही याची दक्षता ठेवण्याचा आदेश होता आणि ४) रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही भागात, कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी करण्याचे सांगितल्या गेले होते. मात्र या पैकी कोणत्याही मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याचे किंवा करवून घेण्यात सरकार पूर्णतः अयशस्वी ठरले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जितके जवाबदार आहेत, तितकेच भाजपा पण जवाबदार आहेत. ही जवाबदारी आज जे कथित उदारमतवादी हिंदूंवर धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप करत आहेत ते पण आहेत. कारण इतर वेळेस कायदा, न्यायालय, पर्यावरण, प्रदूषणाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणाने हिंदू सणांना आणि जल्लोषाला गालबोट लावणारे मात्र, ही मार्गदर्शक तत्वे सरकार लागू करत नाही हे माहीत असून जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत होते.
सोबतच या सगळ्या भांडणात अचानक महाराष्ट्र् मुस्लिम कौन्सिल नावाची संघटना समोर येते आणि न्यायालयाने दिलेले मार्गदर्शक तत्वे कसोशीने पाळण्याची विनंती आम्ही मशिदींना करू वगैरे सांगत समोपचारची भूमिका घेतल्याचे नाटक करते, राज्यातील प्रसिद्धी माध्यमे त्याला वारेमाप प्रसिद्धी देतात, या सगळ्या घडामोडी हा सगळा कार्यक्रम प्रायोजित असल्याचेच प्रमाण देत आहेत. या संघटनेला राज्यातील धार्मिक सलोख्याची इतकी काळजी होती, तर जेव्हा जेव्हा रजा अकादमी सारख्या मुस्लिम संस्था खुलेआम दंगल करत होती तेव्हा कुठे झोपली होती?
तेव्हा हिंदूंनो काही मिळवण्यासाठी, काही गमावण्याची तयारी ठेवा. कोणाच्याही राजकारणात न पडता आपल्याला काय हवे, त्या नुसार मागणी करा आणि हात धुवून त्याच्या मागे लागा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा