या षंढांना त्यांची जागा दाखवा......



भागलपूर १९८९ दंगल - एन एन सिंग आयोग 


मुंबई १९९३ दंगल - श्रीकृष्ण आयोग 


गुजरात २००२ दंगल - नानवटी आयोग 


मुझफ्फर दंगल २०१३ - विष्णू साहाय आयोग 


या सगळ्या भारतातील सगळ्यात मोठ्या दंगली आहेत, ज्यात असे समजले जाते की मुस्लिम जनतेला सगळ्यात जास्त त्रास झाला. मात्र १९९० साली काश्मीर मध्ये झालेल्या प्रकरणात कोणताही आयोग नाही, ना कोणती सत्य शोधक समिती.... 


या सत्य शोधक समितीचीपण एक गंम्मत आहे बरे का..! साधारण १९८९ साली नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर इस्लामिक दहशतवादी हल्ला करायचा प्रयत्न झाला होता. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेने हा हल्ला परतवण्यात आला. त्या चकमकीत इस्लामी दहशतवादी मारल्या गेले. देशात या प्रकरणाने खळबळ उडाली होती. 


मात्र तत्कालीन काळात महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी, सर्वधर्मसमभाव वगैरे विचारांवर विश्वास असणाऱ्या काही लोकांची ज्याचे नेतृत्व कुमार सप्तर्षी नावाचे "पुरोगामी समाजसेवक" करत होते. जे नागपुरात आले आणि असा कोणताही हल्ला झालाच नाही, पोलिसांनी उगाच लोकांना मारले असे निष्कर्ष समोर आणले. 


असाच प्रकार काश्मीरच्या बाबतीतपण आहे. पहिले तर अनेक वर्षे "एक देश, दो विधान, दो संविधान" तत्त्वावर चालणाऱ्या काश्मीर सरकार, या व्यवस्थेला विरोध करणाऱ्यांना हिंदू बहुल जम्मू ओलांडून काश्मीरमध्ये प्रवेश करू देत नव्हते. अगदी तत्कालीन भारतीय जनसंघचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी "एक देश मे, दो विधान, दो संविधान नही चलेंगे" या घोषणेनुसार आंदोलन करायचा प्रयत्न केला, त्यांना काश्मीर सीमेवर अटक केल्या गेली आणि जेल मध्ये टाकले गेले, या जेल मधून बाहेर आला त्यांचा मृतदेहच ! 


अश्या कदाचित अनेक घटना असतील, मात्र ना त्यावर कोणता आयोग स्थापन झाला, ना कोण्या पुरोगामी स्वयंघोषित नेत्याने सत्यशोधक समिती स्थापन केली. 


अगदी १९८९ साली बिहार मध्ये झालेल्या भागलपूर दंगलीत, ज्यात तथाकठितपणे मुस्लिम लोकांवर अत्याचार झालेत त्या दंगलीच्या चौकशीसाठी "आयोग" तयार केल्या गेला. मग "१९९०" साली काश्मीर मध्ये झालेल्या नरसंहारासाठी एखादा "आयोग" का तयार झाला नाही? कुमार सप्तर्षी तेथे आपली "सत्य शोधक समिती" ची नौटंकी घेऊन का गेले नाहीत? कारण हे सगळे इस्लामी आतांकवाद्यान समोर "षंढ" होते आणि आजही आहेत. 


आजही हे तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी अनेक काश्मिरी हिंदूंचे आणि भारतीय सेना, काश्मीर पोलिसांचे मुडदे पाडणाऱ्या कराटे बीटटा आणि यासिन मलिक यांना आतंकवादी, दहशतवादी न म्हणता फुटीरतावादी म्हणत त्यांचे पाप धुतात. हे लोक खुनी आहेत, देशद्रोही आहेत मग यांना वेगळी वागणूक कशाला? कारण या तथाकथित मानवतावादी, उदारमतवादी, पुरोगाम्यांचे "षंढत्व" हेच खरे कारण. 


मात्र संख्येने अधिक असून, हिंदूंनो तुमचे कर्तृत्व नक्की काय? आज "द कश्मीर फाईल्स" बघून तुम्हाला राग येत आहे, तुम्हाला त्या घटनेचे गंभीरपणा आज कळत आहे, मात्र त्या अगोदर पण हिंदूंनी "पंजाब आतांकवादात" बरेच काही सहन केले आहे, या अगोदर पण १९४७ साली झालेल्या फाळणीत आणि त्या अगोदर पण "खिलापत चळवळी" मध्ये पण भोगावे लागले. तरी आपण तथाकथित मानवतावादी,उदारमतवादी षंढाना आपल्या डोक्यावर बसवले. 




तेव्हा झालेल्या चुका आता सुधारा.... यासिन मलिक यांच्या फाशीची मगणी करा....फक्त यासिन मलिक नाही तर तत्कालीन काळात काश्मीर मधील राजकीय नेत्यावर, तथाकथित फुटीरतावादी बुरख्याखाली लपलेले इस्लामी आतंकवादी यांच्यावरपण भारतीय कायद्याद्वारे कारवाई करण्याकरता आंदोलन करायची वेळ आताच आहे. "हुरीयत कॉन्फरन्स" नावाच्या नौटंकीला मिटवा. कारण याच हुरीयतच्या नावाने पाकिस्थान आपले आंतराष्ट्रीय इस्लामी राजकारण करत आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर येत्या ओ आय सीच्या पाकिस्थानात होणाऱ्या अधिवेशनात याच हुरीयतला विशेष निमंत्रण दिले आहे. भारत सरकार याचा विरोध करत असला तरी पाकिस्थान आपला निर्णय मागे घेणार नाही. 


तेव्हा अजूनही वेळ गेली नाही, जागे व्हा....फक्त चित्रपटगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हणून काय होणार आहे? आजपर्यंत या कथित षंढ उदारमतवाद्यांच्या मागे न जाता उभे रहा आणि आपल्या मागण्या कायदेशीररित्या सरकारपर्यंत पोहचवा. फक्त कोण्या चित्रपटाला समर्थन देण्याने न्याय मिळणार नाही इतकेच लक्षात घ्या....यासिन मलीकला मिळालेल्या फाशीनेच न्याय म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळेल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा