सध्या सगळे जग रशिया विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ उभे आहे. विशेषतः युक्रेनचे विदूषक राष्ट्रपती व्होल्डोमेर झेलेन्स्की यांच्या प्रेमात तर अनेक भारतीय पण पडले आहेत. आता एक विदूषक राष्ट्रपती बनू शकतो आणि जगात नाव कमवू शकतो हे बघितल्यावर एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना उचंबळून येणार त्यात त्यांचा दोष नाही. मात्र आता युक्रेनवरून मोठ्या प्रमाणावर येणारे विद्यार्थी आणि त्यांना युक्रेनच्या पोलीस आणि सैन्याकडून आलेले अनुभव पाहता, युक्रेन जितका वाटतो तितका सरळ नाहीये.
युक्रेन मधून बाहेर निघायचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी विदयार्थ्यांची युक्रेनच्या सीमेअंतर्गत अडवणूक करण्याचा प्रकार आणि त्या साठी वेळप्रसंगी बळाचा वापर युक्रेन करत आहे. पहिले असा समज झाला होता की युक्रेनी नागरिकांना भारताने घेतलेल्या भूमिकेबद्दल राग आला त्यामुळे विद्यार्थ्यांना हे त्रास देत आहे. मात्र जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे. अर्थात कितीही बाका प्रसंग आला तरी पोलीस आणि सेना सरकारी हुकुमाचे ताबेदार असतात. याच दृष्टीने विचार केला तर जागतिक वाहवाही मिळणारे विदूषक राष्ट्रपती एकतर युक्रेनी सेना-पोलीस आणि मिलीशीयावर कोणत्याही पद्धतीने आपला आदेश लागू करू शकत नाहीये किंवा भारतीय आणि अन्य विदेशी नागरिक / विद्यार्थ्यांना त्रास द्यावा, त्यांना युक्रेनच्या सीमेतच अडकवून ठेवावे या धोरणावर काम करत आहे.
नागपुरात वापस आलेल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार युक्रेनियन विश्वविद्यालय युद्धा विषयी योग्य माहिती देत नव्हते. सोबतच वर्गात उपस्थित राहण्याची सक्ती अगदी २६ तारखे पर्यंत करत होते. ही माहिती खरी असेल तर या विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाला खऱ्या अर्थाने युक्रेनचा विदूषक राष्ट्रपती जवाबदार नाही का? सध्या तरी सगळ्या जगाने या विदूषकाला डोक्यावर घेतले असले तरी, विदेशी विद्यार्थ्यांना वेठीला धरून याने आपले राजकारण चमकवायचा पूर्ण प्रयत्न केला हे खरे आहे. मागे राहिलेले भारतीय विद्यार्थ्यांनीपण आपल्या देशाच्या दूतावसाने एकण्यापेक्षा या विदूषकाचे ऐकले हे दुर्दैव.
खाराकीव्ह येथे रशियन सैन्याने भारतीय सरकारची विनंती मान्य करत भारतीय विद्यार्थ्यांसाठी तब्बल सहा तासांचा "सेफ पॅसेज" उपलब्ध करून दिला होता. मात्र या काळात पुरेसे भारतीय विद्यार्थी खाराकीव्ह मधून बाहेर पडू शकते नाहीत. रशियन सेनेने तर युक्रेनच्या सरकरवर सरळ सरळ भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप केला आहे.
त्यात लक्षात घेण्यासारखे असे की निदान भारतीय नागरिकांसाठी भारत सरकार झटत आहे. आपली राजनैतिक ताकद, पैसा लावत आहे तरी ही अवस्था. मग ज्या देशांची या सगळ्याची ताकद नाही त्या देशांचे काय?
नायजेरिया सारख्या गरीब आफ्रिकी देशातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल तर अधिकच द्रवीत करणारे आहेत. हे विद्यार्थी आता किव्ह वरून पाईच पोलंडकडे निघाले आहेत. मात्र युक्रेनचे सुरक्षा रक्षक त्यांना मारहाण करत आहेत. युक्रेनचे नागरिक त्यांच्या सोबत रंगभेदाची वागणूक देत आहेत. सध्या युक्रेनमध्ये प्रचंड थंडी आहे. रात्री तापमान कमालीचे खाली जाते. अश्या वेळेस ऊब ठेवण्यासाठी या विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे पेटवून ऊब घ्यावी लागत आहे. हे उदाहरण प्रातिनिधिक आहे. वंश, भाषा, रंग यावरून मोठ्या प्रमाणावर युक्रेनी नागरिक आणि सुरक्षा रक्षक भेदभाव करत आहेत. तरी अजून युक्रेनी नागरिकांच्या हातात पुरेशी शस्त्रे आली नाहीये. नाहीतर यांनी आपल्या देशात अडकलेल्या लोकांचे जीव घेत त्याचा आरोप रशियावर टाकला असता.
बाकी या सगळ्याचा उद्देश इतकाच की, युक्रेन वाटतो तितका पण सरळ नाहीये. युक्रेनच्या बलशाली आणि धिराच्या राष्ट्रपतींच्या आतील विदूषक अजून जागा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा