इस्लामी पितृसत्ताक संस्कृतीची भालमण कशाला?



साधारण ८-९ गेल्यावर शाळेतील मुलांना शाळेचा गणवेश म्हणजे आपल्या "व्यक्ती स्वातंत्र्यवर" गदा वगैरे वाटत असते. अर्थात त्यांना "व्यक्ती स्वातंत्र्य" या शब्दाचा अर्थ तरी तेव्हा कळत असतो का हा मोठा प्रश्नच आहे. मात्र आपल्या बाजूच्या महाविद्यालयात समजा गणवेश नाही आणि तिथे शिकत असलेले विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगबिरंगी कपड्यात दिसले की आपल्या शाळेत असलेली "गणवेशाच्या सक्ती" त्याला अगदी असह्य होत असते आणि त्यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा हेवा वाटतो. शाळेत हा अनुभव कोणालाही विचारा त्याला किंवा तिला शाळेतील त्यांच्या वाढदिवसाचा दिवस चांगला लक्षात असेल. कारण या एकाच दिवशी त्यांना "गणवेश" घालायचा सक्ती मधून सुटका मिळत असे आणि आपला आवडणारे किंवा नवीन घेतलेले सुंदर कपडे घालून वर्गात बसता येत असे. 


अर्थात या करता मुलांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. स्वातंत्र्यतेची जी उपजत जाण असते त्यातून हा प्रकार घडत असतो. मात्र शाळेची "गणवेश सक्ती" ही त्याला तत्कालीन परिस्थितीत कितीही हिटलरशाही, हुकूमशाही आणि जाचक कायदा वाटत असला तरी त्या मागे कर्तव्य आणि निष्ठा समजून घेण्याची, समाजात राहतांना, समाजास सोबत करतांना काही मर्यादा पाळण्याची शिकवण त्या "गणवेश सक्तीतून" मिळते हे कळायला काही वर्षे जावी लागतात. शाळा - महाविद्यालयातील गणवेशामुळे सगळ्यात पहिले तर समाजाच्या वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातून आलेली मुले एका समतेच्या धाग्याने बांधल्या जातात. धर्म, जात आणि आर्थिकतेच्या भिंती इथे उभ्या राहत नाही (अर्थात "जात" काही प्रमाणात सोबत असते आणि काही ठिकाणी ती शाळेत पण सोबत ठेवावी लागते कारण व्यवस्थेचा भाग) तरी एकसारख्या दिसणाऱ्या गणवेशातून समानता,  एकतानता आणि समूहाची सुव्यवस्था दर्शनात येते. या द्वारे सुनियोजित एकत्व वाढीला लागते. मुलांमध्ये ही भावना रुजवी म्हणून शाळा - महाविद्यालयात एकसारखा गणवेश घालण्याची पद्धत आहे. 



आता कर्नाटकात एकाएकी "हिजाब" घालून शाळा - महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मुस्लिम महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सुरू कसे झाले आणि या आंदोलनाच्या मागे नक्की कोण? 


उडप्पी या कर्नाटक राज्यातील डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात येथील सरकारी महिला महाविद्यालयात "हिजाब" घालून प्रवेश नाकारला गेला आणि या विरोधात आंदोलन केल्या गेले. किती पोरी होत्या या "हिजाब" घातलेल्या तर आठ ! २७ डिसेंबरला या पोरींना थांबवण्यात आले. कुठे ? तर वर्गात बसण्यापासून थांबवण्यात आले. म्हणजे या सगळ्या पोरींना महाविद्यालयाच्या आवारात हिजाब घालून फिरता येत होते. मात्र वर्गात बसतांना त्यांना आपल्या गणवेशवरच बसावे अशी सक्ती करण्यात आली. या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. सहज विचार येतो की २७ डिसेंबरच्या आधी या मुलींनी "हिजाब" घातला नव्हता का? तर वर सांगितल्या प्रमाणे वर्गाच्या बाहेर हिजाब घालायला या आधीही कोणाचाच विरोध नव्हता. मात्र वर्गात कोणीही हिजाब घालून बसत नव्हते. विशेष म्हणजे असे म्हंटले जाते की महाविद्यालयात प्रवेश घेतांना या सगळ्यांना एक नियम पाळण्याच्या स्वीकृती पत्रावर सह्या कराव्या लागल्या, ज्यात वर्गात हिजाब घातल्या जाणार नाही असाही एक नियम होता. मात्र अडविल्या गेलेल्या पहिल्या त्या "आठ" पोरींना २७ डिसेंबर रोजी वाटले की आपण आज पासून वर्गात पण हिजाब घालावा. जानेवारीत या आंदोलनाला कर्नाटकात प्रसिद्धी मिळाली आणि प्रकरण वाढले. 


या बाबतीत जी माहिती समोर येत आहे त्यात महाविद्यालयातील प्रशासनाचे म्हणणे आहे की, महाविद्यालयात आधी पासून मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मुली शिकत आहेत. मात्र कोणीही अश्या प्रकारची मागणी या आधी केली नव्हती. आंदोलनाला सुरवात करणाऱ्या आठ मुली या "कॅपस फ्रंट ऑफ इंडिया" नावाच्या मुस्लिम विद्यार्थी संघटने सोबत जुळल्या आहेत आणि हा सगळा प्रकारामागे या संघटनेचा हात आहे. आता ही कॅपस फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना नक्की काय आहे. तर ही विद्यार्थी संघटना आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दक्षिण भारतात पसरलेल्या कट्टर मुस्लिम संघटनेची विद्यार्थी फ्रंट. आता हा विषय कसा वाढवला आणि वाढवल्या गेला याचा अंदाज येईल. 


आता "हिजाब" नक्की काय? हिजाब म्हणजे एक कपडा जो मुस्लिम महिला डोके झाकण्यासाठी वापरतात. अर्थात "हिजाब" हा मुस्लिम धर्म यायच्या आधी पासून जगात अस्तित्वात आहे. अगदी ख्रिश्चन धर्मात सुद्धा या पद्धतीने रुमाल बांधायची पद्धत होती आणि आजही काही प्रमात आहे. थोडक्यात महिला आणि पुरुषांना डोके झाकणे हे मुस्लिम धर्माच्या अगोदर पण सगळ्या तत्कालीन धर्मात आवश्यक होते आणि आजही काही प्रमाणात आहे. अगदी हिंदू धर्मात पण "घुंगट" जरी तेव्हा नव्हता, तरी महिला डोक्यात ओढणी घ्यायच्या, तर पुरुष मुंडासे, टोपी किंवा पागोटे डोक्याला बांधायचे. 


मुस्लिम धर्मात पण हिजाब किंवा बुरख्यावर वेगवेगळी मते आहेत. असे म्हंटल्या जाते की "हिजाब" मुख्यतः आशियायी देशांमध्ये इस्लाम पसरायला सुरवात झाली तेव्हा वापरण्यात येऊ लागला. विशेषतः मलेशिया, इंडोनेशिया इथे याचे चलन वाढले. मात्र मध्य आशियायी मुस्लिम देशांमध्ये जे देश पहिले सोवियत रशियाचा भाग होते, तिथे पण अश्या प्रकारचा हिजाब मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कदाचित तिकडून हा हिजाब बाकी युरोपियन देश, लेबनॉन, सीरिया पर्यंत पसरला असेल. अर्थात याच्या उलटपण असेल. अर्थात आज हिजाब मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातो. थोडक्यात हिजाब हा इस्लामचा मुख्य भाग नाही, तर नवीन इस्लाम स्वीकारणाऱ्यांसाठी हिजाब पहिली पायरी आहे पुढील अर्थातच "बुरखा" ! 


आता कर्नाटकातील उडप्पी पासून सुरू झालेला हा वाद आता राष्ट्रव्यापी झाला आहे. त्यातच भारतात पाच राज्यात असलेल्या निवडणुकांमुळे या हिजाब प्रकरणाचे लवकरच राजकीयकरण पण झाले. आता यात मोठी विनोद असा आहे की हिंदू महिलांनी "घुंगट" घेणे, कुंकू टिकली लावणे किंवा मंगळसूत्र घालणे वगैरे पारंपरिक सांस्कृतिक गोष्टी या पितृसत्ताक संस्कृतिचे प्रतीक असते, महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला असतो. या हिंदू प्रतिकांची पाठराखण करणाऱ्या हिंदू महिला या महिलांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात असतात. पितृसत्ताक हिंदू संस्कृतीच्या प्रतीक असतात. मात्र त्याच पद्धतीने "हिजाब" किंवा "बुरखा" हा काही इस्लाम मधील पितृसत्ताकतेचे प्रतीक नसते किंवा "हिजाब किंवा बुरखा" घालण्याचे समर्थन करणाऱ्या महिला, मुस्लिम स्त्री स्वातंत्र्यावर घाला घालत नाहीयेत. हे कसे? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सबका साथ, सबका विकास" ची घोषणा दिली तेव्हा, इस्लामी शिक्षण देणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात तिथे शिक्षण घेत आधुनिक काळात मागे राहणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांकरिता मदरसा शिक्षणाचे आधुनिकी करण करण्याचा विचार सांगताना "एक हात मे कुराण तो एक हात मे कम्युटर" सारखी घोषणा दिली होती. मात्र आज "पहिले हिजाब, बाद मे 'किताब" सारख्या घोषणा पंतप्रधानांच्या घोषणे मधील फोलपणा दाखवत नाही काय?

टिप्पण्या