स्व. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली द्यायला सुपरस्टार शाहरुख खान आला आणि त्याने इस्लामी पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. ती वाहत असतांनाच त्याने तोंडावरील मास्क बाजूला करून जी कृती केली, ती बघूनच आता यावर वाद होणार असे लक्षात आले होते. नेमके झालेही तसेच !
काही वेळातच त्या कृतीचे व्हिडीओ आणि छायाचित्रे फिरायला लागली आणि शाहरुखच्या त्या कृती विषयी काही शंका उपस्थित व्हायला सुरुवात झाली. मग शहररुख थुंकला की फुंकला यावर वाद सुरू झाला.
समान्यपणे अनेकांचे म्हणणे असे की, शाहरुख ने इस्लामी पद्धतीने पार्थिवा समोर फतिहा पढत, मृतात्म्याला शांती मिळण्याची दुवा केली आणि ती दुवा त्या पार्थिवाला लागावी म्हणून फुंकर मारली, तर काही लोकांचे म्हणणे आहे की त्याने फुंकर मारली नसून तो "थुंकला" आणि ही कृती लज्जास्पद आणि अपमानजनक आहे.
आता वाद सुरू झाल्यावर त्या वादाला अनेक आयाम प्राप्त झाले आहेत. मुख्य प्रश्न असा की शाहरुख थुंकला असे हिंदूंना का वाटते? तर, गेल्या काही दिवसात आलेल्या अनुभवा वरून ! यात मुख्यतः चिनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झाल्या नंतर सार्वजनिक स्वच्छतेत काहीसे निष्काळजी असणारे भारतीय सजग झाले. सार्वजनिक ठिकाणी थुंकून नये यावर ठाम झाले. मात्र त्या नंतर कदाचित थुंकणाऱ्यांवर नजर राहायला लागली आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत कुठे रोटी बनवणारा अब्दुल, कुठे बिर्याणी बनवणारा जम्मन, तर कुठे फळे विकणारा मोहंमद आपल्याला विकत असलेल्या वस्तुत किंवा वस्तूंवर थुंकतो हे लक्षात यायला लागले. मग तसे व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरायला लागले. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हायला लागली. या विषयावरून मग खाजगी वृत्तवाहिन्यात या सगळ्यावरून धमासान चर्चा व्हायला लागल्या. त्यात मग मुस्लिम अभ्यासक म्हणून येणारे मौलवी ते "थुंकणे" कसे इस्लाम नुसार पवित्र आहे असे अकलेचे तारे तोडायला लागले. हे सगळे बघून हिंदू मन चिडत होते. मग प्रत्येक मुस्लिम विक्रेता खरेच असे करत असेल का? या विषयी शंका धरू लागले.
बरे हे इथेच थांबले का ? तर नाही ! केस कपायचा मोठा व्यवसाय असणारा जावेद हबीब पण अश्या प्रकारे जीचे केस कापत होता तिच्या केसात थुंकतांना व्हिडिओत कैद झाला. गदारोळ झाल्यावर त्याने माफी वगैरे मागत सारवासारव पण केली. मग या "थुंकण्या" वरून अनेक दावे प्रतिदावे केल्या गेले. यात महत्वाची भूमिका बजावली ती "हलाला सर्टिफिकेशन" ने ! मुस्लिम धर्मीय आजकाल कोणतीही वस्तू घेतांना त्याला "हलाल सर्टिफिकेट" असल्याशिवाय घेत नाहीत. मग जवळपास सगळ्या कंपन्या विशेषतः ज्यांना आपला माल इस्लामिक राष्ट्रात विकायचा आहे, त्या हे सर्टिफिकेट पैसे भरून घेतात. मात्र यात गोम अशी की प्रत्येक इस्लामी राष्ट्राचे "हलाला" नियम वेगळे आहेत. असो, मात्र हे "हलाला" खाद्य प्रकारात बनवतांना त्याला पवित्र करायला त्यात "थुंकावे" लागते अशी धारणा झाली. मग त्या विरोधात काही मुस्लिम न्यायालयात पण पोहचले.
तर हा सगळा इतिहास या "थुंकण्याचा" आहे. याच सगळ्या घटनाक्रमामध्ये शाहरुखची "श्रद्धांजली" आली आणि विवादित झाली. त्याला पार्थिवा समोर इस्लामिक पद्धतीने अभिवादन केल्यावर आपल्या चेहऱ्यावर असलेला मास्क बाजूला करत, तोंडातून काही बाहेर काढल्यासारखे करतांना दिसत असल्याचे सगळ्यांनी बघितले. अर्थात ज्यांना आपल्या धर्मातील कर्म कांडाविषयी माहिती नाही त्यांना इतर धर्मातील कर्मकांडा विषयी कितपत माहिती राहणार? मग शाहरुख विरोधात समाज माध्यमांवर राळ उडाली.
आता ही "थुंकण्याची" रीत किंवा "मुस्लिम थुंकतात" हे प्रचलित कुठून झाले? या विषयी अजून माहिती काढतांना लक्षात आले की या मागे मुस्लिम मौलवींचाच हात आहे. कसा? तर या थुंकण्याच्या कथेत "हिंदू - मुस्लिम" असा संबंध नसून, "मुस्लिम - मुस्लिम" संबंध आहे. हा संबंध आहे, समस्त इस्लामी जगतात असलेल्या "शिया-सुन्नी" वादाचा!
कहाणी अशी की सुन्नी समुदायातील मौलवी हे नियमित आपल्या अनुयानायांना शिया समुदाया पासून दूर ठेवण्यासाठी "शिया" तुम्हाला देण्यात येणाऱ्या अन्नात "थुंकतात" असे सांगतात. आता इस्लाम मध्ये मौलाना सांगतो ती काळ्या दगडावरची रेष ! मात्र या करता काही ऐतिहासिक काहण्यापण आहेत बर, खऱ्या - खोट्या देवच जाणे !
यातील पहिली कहाणी अशी की मोहम्मद साहेबांना शियांनी जेवायला बोलावले आणि साहेब गेले तेव्हा शियांनी त्यांच्या करता जे जेवण बनवले होते त्यात थुंकले ! मात्र या कथेतील मजा अशी की, शिया आणि सुन्नी हा भेदच मुळी मोहमद साहेबांच्या मरणानंतर सुरू झाला.
तर दुसऱ्या एका कथेत एका राजाने शियांना आपल्याकडे स्वयंपाक सांभाळायला ठेवले. मात्र ते स्वयंपाक करतांना गडबड करायचे कधी तिखट जास्त, तर कधी मीठ ! मग त्यातील जास्त असलेले तिखट - मीठ प्रमाणात ठेवायला म्हणून ते त्यात थुंकायचे. एक दिवस राजाला ते कळले आणि राजाने निर्णय घेतला की स्वयंपाक करणे शियांचे काम नाही, त्यांना दुसरे काम म्हणून "जमीनदारी" दिली. बघा किती प्रेमळ सुन्नी राजा होता तो ! भारतात सुन्नी पंथीय बहुसंख्यांक आहे आणि शिया अल्पसंख्यांक ! या शिया मुस्लिमांवर वचक ठेवण्यासाठी भारतात अश्या कहाण्या गढल्या गेल्या. सुन्नी आणि शिया पंथीय भेदभाव सुरू राहीला.
मात्र हे इतक्यावरच नाहीये, बरे का ! इस्लाम मधील हदीस मध्ये या "थुंकण्याचे" संदर्भ आहेत. ज्या पद्धतीने वासीम रिजवी या शिया मुस्लिमने कुराण मधील वादग्रस्त आणि हिंसाचाराला उत्तेजन देणारे वाक्य सांगितले होते. त्याच प्रमाणे हदीस मधील हे संदर्भ ! बाकी कुराण आणि हदीस याचा नक्की काय संबंध असतो तो समजून घ्यावा, शरिया कायद्यात "हदीस" चे किती महत्व आहे ते समजून घ्या.
संदर्भ १ ला: सहिह बुखारी (वॉल्यूम 1, बुक 12, हदीस 801) महमूद बिन अर-रबी म्हणाले, "मला अल्लाहचे मेसेंजर आणि त्यांनी माझ्यावर ओतलेल्या घरात आणलेल्या तोंडाला पाणी आठवते."
संदर्भ २ रा: उर्वा आपल्या लोकांकडे परत आला आणि म्हणाला, “मी अनेक राजे, सीझर, खुसरो आणि अन-नजाशी यांच्याकडे गेलो आहे, परंतु त्याच्या साथीदारांमध्ये मोहम्मद सारखा आदरणीय कोणीही नाही. जर त्यांनी थुंकलं तर थुंकी त्यांच्यापैकी कोणाच्याही हातात पसरेल जो त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर घासेल." (सहीह अल-बुखारी, खंड 3, पुस्तक 50, हदीस 891)
संदर्भ ३ रा: जाबीर-बिन-अब्दुल्ला यांचे विधान, “माझ्या पत्नीने प्रेषितांकडे एक चेंडू आणला आणि अल्लाहचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पैगंबराने त्यात थुंकले. यानंतर पैगंबरांनी आमच्या मांस शिजवण्याच्या भांड्यातही थुंकले आणि त्यात अल्लाहचे आशीर्वाद पसरवले. (सहीह अल-बुखारी, खंड 5, पुस्तक 59, हदीस 428)
संदर्भ ४ था: इस्लामिक हदीसमध्ये असाही एक संदर्भ आहे की लोक ज्या पाण्याने मोहम्मद स्वतःला स्वच्छ करायचे ते पाणी वापरायचे. (सहीह अल-बुखारी, खंड 1, पुस्तक 8, हदीस 373)
संदर्भ ५ वा: अबू जुहैफा म्हणतात, “मी बिलालला पैगंबरांनी वापरलेले पाणी वापरताना पाहिले. इतरही तेच पाणी वापरून अंगावर घासत होते. काही जण एकमेकांच्या हातावरचे पाणी वापरण्यास उत्सुक होते.” (सहीह अल-बुखारी, खंड 1, पुस्तक 8, हदीस 373)
आता या सगळ्या माहिती नंतर तुम्हाला नक्की काय वाटते या सगळ्या "थुंकण्याच्या प्रकरणावर" ते सांगा. बाकी ज्यांना चिडलेल्या "हिंदूंमुळे" "हिंदू तालिबान" जन्माला आला असे वाटते त्यांनी इतकेच लक्षात घ्यावे की अफगाण मध्ये जन्माला आलेला तालिबान आणि भारतात त्यांच्या मते जन्म घेत असलेला "हिंदू तालिबान" यात मूलतः बरेच अंतर आहे. अफगाण मध्ये मुळातच धार्मिक कट्टरता होती. ती फक्त तत्कालीन रशिया विरोधात नव्हती तर, रशियाच्या नादी लागत पाश्चात्य संस्कृती अफगाणमध्ये आणणाऱ्या अफगाणी मुस्लिम शासकांविरोधात पण होती. अमेरिकेला विरोध पण त्याच कट्टरतेतून झाला. आपल्या देशात पाश्चात्य संस्कृती मधील चांगल्या गोष्टी उचलण्यात हेच "हिंदू तालिबान" समोर होते. मात्र या सुधारणा नाकारणारे इस्लामी मात्र नंतरच्या भारतीय राज्यकर्यांनी डोक्यावर बसविले. त्यातून त्यांच्या वाढत जाणाऱ्या कट्टरतेला काही हिंदू तितक्याच कट्टरतेने उत्तर देत आहेत. होय, हे बरोबर नाही, मात्र त्या करता "टाळी एका हाताने वाजत नाही" इतके लक्षात घेणे जास्त श्रेयशकर !
बाकी सुन्नी इस्लाम्यांनी शिया इस्लाम्यांसाठी एक खड्डा खोदला आणि आता तेच या खड्ड्यात पडले हे लक्षात येत आहे का?
बाकी हा लेख वाचून पुन्हा "इस्लाम फोबिया" म्हणत आले, तर त्याने आधी स्वतःच्या "हिंदू फोबियावर" इलाज करणे आवश्यक आहे हे समजून घ्यावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा