एकूण काय? तर भंबेरी उडालेली आहे, केंद्रीय तपास यंत्रणांनी झोप उडविलेली आहे ! आपली वाट लागली तर पक्षातील कोणीही आपल्याला साथ द्यायला येणार नाही. ही जाणीव मोठी आहे. तसेही "कितने अजीब रीश्ते है यहापर" चा अनुभव "वाझे - देशमुख प्रकरणात" येत आहेच. "वाझे काय लादेन आहे का?" विचारणारे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे सुप्रीमो असो, की देशमुखांचे आणि सरकारचे नेते शरद पवार असो जसे जसे देशमुखांचे पाय खोलात जात आहेत, तसे तसे त्यांच्या बाबतीत उदासीन होत आहेत. उद्या आपल्यावर पण हीच वेळ येणार म्हणून कपाळावर धर्मबिंदू जमा होत आहेत. सत्ता सध्या जाणार नाही याची पूर्ण जाणीव असून सुद्धा उगाच "सरकारला पडायचे कारस्थान" असा कांगावा सुरू आहे.
बाकी सरकार पडायचे असते तर केव्हाच पाडल्या गेले असते. विशेषतः केंद्र सरकारला सरकार पाडणे कठीण काम नाही. ज्या सरकार मधील गृहमंत्रीच अपराध्या सारखा कारागृहात गेल्यावर, दोन मंत्र्यांना न्यायालयाने शिक्षा दिल्यावर, इतर अनेक कारणांसाठी केंद्र सरकार या राज्य सरकारला बाजूला करून निदान राष्ट्रपती राजवट लागू करूच शकते. मात्र या पेक्षा भयानक परिस्थिती पश्चिम बंगाल येथे तयार झाली असतांना तिथे केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली नाही, तिथे ठाकरे सरकार म्हणजे लिंबू टिंबु ! एकूण केंद्र सरकारची मानसिकता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नसून, जनतेला तुमच्या राज्यात खितपत ठेवत, तुमच्या विरोधात असंतोष वाढवायची आहे. अर्थात यात भाजपाला धोका होऊच शकतो त्यात वाद नाही.
हे खरे आहे की राज्यातील खूप मोठ्या भाजपा समर्थकांना "सरकार पडले" ही बातमी बघायची घाई झाली आहे. अधून मधून राज्य भाजपाचे नेते पण त्यांच्या या मानसिकतेला खतपाणी घालायचे काम इमाने इतबारे करतात. काय करणार? त्यांना पण समर्थकांना सोबत ठेवावे लागते. मात्र खुद्द राज्याच्या भाजपा नेत्यांना मात्र सरकार पडल्यास आपल्याला मित्र याच सरकार मधून घ्यावा लागणार ही व्यवहारी जाणीव आहे. नैसर्गिक पणे तो मित्र आता राष्ट्रवादी असेल. समजा तुम्ही त्या सरकारात गेलात तर ती तुमची काकांच्या मागे झालेली फरफट असेल. तरी भाजपाचे राज्यातील शिर्ष नेतृत्व तुम्हाला झेलत आहे. कारण "दात नसलेला वाघ" कोणाला नको असतो? असा त्यांचा समज !
असो, तुमच्या करता इतकेच की आपण केलेल्या घाणीवर पाणी आपल्यालाच टाकावे लागते. समजा ती घाण दुसऱ्याला दिसली, तर तो बोल लावणारच, तेव्हा तुम्ही शिव्या देऊन उपयोग नसतो. अर्थात तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला हे सांगण्यात अर्थ नाही ! ज्या पक्षाची हयात गुंडागर्दी आणि शिव्या देण्यात गेली आहे.
दुःख फक्त राज्य भाजपाच्या डॅशिंग नेत्यांच्या मानसिकतेचे वाटते. हे सगळे माहीत असून सुद्धा राज्य सरकार विरोधात हे इतके शांत कसे राहतात? आपले कार्यकर्ते मार खात आहेत, आता तर आमदार मार खात आहेत तरी हे शांतच ! बंद दाराआड केलेल्या मांडवली कामात येत नाहीत हे समोर येऊन सुद्धा मानसिकता का जात नाही ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा