त्रिपुराचा विजय, जनतेचा विजय

 



हा फोटो आठवतो आहे का? २०१८ साली त्रिपुरामध्ये डाव्यांच्या सत्तेचा माज तेथील जनतेने उतरवल्यावर, डाव्यांनी उभारलेला, त्याचे आराध्य दैवत लेनिनचा पुतळा त्रिपुराच्या जनतेने उखडला होता. 


हा तेथील जनतेचा स्वयंउस्फुर्त आविष्कार होता. मात्र तेव्हा डाव्यांनी मोठा थयथयाट करत भाजपाने मुद्दाम हे कृत्य केल्याचा आरोप ठेवला होता. देशभरात लेनिनच्या कथित महानतेची आणि त्याला असलेल्या कथित भारतप्रेमाची महती गायली होती. 


मात्र त्रिपुराच्या जनतेने उखडलेला हा पुतळा फक्त दृश्य परिणाम होता. तो पुतळा पडल्याचा भूकंप अजून डाव्यांना आणि वेळोवेळी त्यांना साथ देणाऱ्या इतर पक्षांना जाणवत आहे. 


नुकत्याच त्रिपुरात झालेल्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत त्रिपुरा राज्यातील ३३४ प्रभागांमधील ३२९ प्रभागांमध्ये विजय प्राप्त केला आहे. त्रिपुरात गेले अनेक दशके डाव्यांची सत्ता राहिली असल्यामुळे सहाजिकच या निवडणुका हिंसाचार आणि जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर लढल्या गेले होते. त्यातच पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचार आणि दहशतीच्या माध्यमातून निवडणूक जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पण त्रिपुरात भाजपाला "खेला हो बे" करायचा प्रयत्न केला होता आणि डाव्यांनी सुरू केलेल्या हिंसाचारात आपली पण भर टाकली होती. त्रिपुरातील हा निवडणूक हिंसाचार अगदी सर्वोच्च न्यायालयात पण गाजला. 


मात्र या सगळ्या हिंसाचारावर आणि देशभरात त्रिपुरातील घटनांना चुकीच्या पद्धतीने धार्मिक हिंसाचार म्हणत कुप्रसिद्धी देण्याच्या, त्या वरून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात धार्मिक दंगली घडवण्याच्या डाव्यांच्या ईको सिस्टिमने तयार केलेल्या कुटील डावाला आणि त्याला साथ देणाऱ्या इतर पक्षांना त्रिपुरातील जागृत मतदारांनी परस्पर उत्तर दिले आहे. 


बाकी "खेला" करायला त्रिपुरात अवतीर्ण झालेल्या तृणमूल पक्षाला फक्त एक जागा मिळाली आणि आपलाच खेळ झाला असे लक्षात आल्यावर मात्र तृणमूल काँग्रेसने मनोरंजक प्रतिक्रिया दिली, तृणमूल काँग्रेस नुसार, भाजपने या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केला असून, राज्यात पुन्हा फेरणीवडणूक घ्यावी, अशीही मागणी केली आहे. तृणमूलची ही प्रतिक्रिया म्हणजे , "सौ चुहे खाके, बिल्ली हज को चली" चा उत्तम नमुना आहे. 


बाकी २०१८ च्या आधी अनेक वर्षे सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. आपला प्रभाव एकदम इतका कमी कसा याचा हिशोब अजून त्यांना लागत नाहीये. खरे तर २०१८ साली जनतेने पाडलेल्या पुतळ्यानंतर असले प्रश्न माकपला पडायला नको होते. तरी तृणमूल काँग्रेसच्या सुरात सूर मिळवत माकपने पण सत्तेच्या गैरवापराचे तुणतुणे वाजवले आहे आणि संपूर्ण राज्यात जरी नाही तरी किमान पाच प्रभागात तरी फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा