https://lm.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fsampadkiya%2Fanyatha%2Fahmedabad-and-mumbai-free-airline-studious-officer-high-ranking-central-officials-akp-94-2685747%2F&h=AT22-tUaLv53aEm0ZPJROlzq-hUrBg-dehG1qEmBn02T30azwzv3l74vei48G8xts63YVsrV8grFEKJbc21ZODD2YiUARPLSGAio_Zs6BHCfPr8xV55fjwWocT_ipsRN8jSm
आज महाप्रचंड प्रकाड पंडित, विदेशी अभ्यासावर वैचारिक पुष्टता कमावलेले, लोकसत्ता या प्रचंड वैचारिक वृत्तपत्रांचे संपादक, श्री गिरीश कुबेर यांनी आपल्या "अन्यथा" या सदरात, जुन्याच देशाच्या "बुलेट ट्रेन" प्रकल्पाच्या शिळ्या कढीला उत आणला. आता हा लेख नवीन आहे की जुन्या लेखाला फोडणी दिली आहे हे कळायला मार्ग नाही.
सध्या गुजरात राज्यात धडाक्याने काम सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प कसा आर्थिक बोजा आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे. आपल्या आर्थिकतेचा दाखला देण्यासाठी त्यांनी चक्क मुंबई-अहमदाबाद मार्गावर दर पंधरा ते वीस मिनिटांनी विमान सेवा सुरू केली ती पण फुकट तरी आपले कितीतरी पैसे वाचतील.
आता हे सगळे सांगताना आपला बिनडोकपणा लपवायला म्हणा किंवा अजून काही कारणाने म्हणा हा हिशोब आपला नाही तर सरकार विरोधात आपले मत निस्पृहपणे मांडणाऱ्या आपल्या सरकारी अधिकारी मित्राचे आहे असे त्यांनी ठोकले. अर्थात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेला सरकारी अधिकारी हा आपल्याकडे "हिरो" म्हणून घेतल्या जातो. "पानी मे रह के मगरमच्छ से बैर" करणारा "हिरोच" असतो ना! मग असे लिहले की आपण सांगितलेल्या मुर्खपणाला पण वजन येते असा काही त्यांचा हिशोब असेल.
असो, तर मित्रांनो आज आपण त्यांच्या या गणिताचा अभ्यास करू. आता मुंबई विमानतळ हे भारतातही सगळ्यात जास्त वर्दळीचे विमानतळ आहे. या विमानतळा वरून रोज जितकी विमाने उतरतात आणि उडतात तितकी भारतातील कोणत्याही विमानतळावरून होत नाहीत. एका दिवसात म्हणजे २४ तासात १००३ (५ जून २०१८) आणि १००७ (८ डिसेंबर २०१८) (अर्थात ही आकडेवारी कोविड पूर्व काळातील आहे.) विमाने उतरली आणि उडाली होती. तर आज कोविड काळात जेव्हा विमाने कमी उडत आहे किंवा प्रवासी संख्या रोज वाढत असली तरी अजून कोविड पूर्व काळापर्यंत आली नाहीये तेव्हा सुद्धा मुंबई - अहमदाबाद मार्गावर विमाने दिवसातून जवळपास १७ ते १८ उड्डाणे घेत आहेत, तर अहमदाबाद - मुंबई मार्गावर किमान २० ते २१ विमाने उड्डाण घेत आहेत. म्हणजे या मार्गावर दोन्ही बाजूने किमान ३७ विमाने उडत आहेत.
आता दर पंधरा मिनिटांनी एक विमान अहमदाबादच्या दिशेने उडवले तर तासाला ४ उड्डाणे आणि २४ तासाला कमीतकमी ९६ उड्डाणे! मुंबई - अहमदाबाद - मुंबई करण्यासाठी म्हणून एकूण १९२ उड्डाणे ! म्हणजे मुंबई विमानतळावर दर १५ मिनिटांनी एक विमान उतरणार आणि एक विमान उडणार. बरे विमानाच्या दिवसाला १९२ फेऱ्या करण्यासाठी जवळपास अंदाजे ५० विमाने घ्यावी लागणार.
नुकतेच राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या विमान कंपनीसाठी विमानांची ऑर्डर बोइंग कंपनीला दिली, किती विमाने घेत आहेत ? एकूण ७५ ! कितीला पडली? ९ बिलियन डॉलर्सला, १ बिलियन म्हणजे १०० कोटी, म्हणजे ९०० कोटी रुपयांना ७५ विमाने पडली. अगदी स्वस्तात स्वस्त विमानसेवा देण्यासाठी आम्ही ही विमाने घेतली असे त्यांचे वक्तव्य आहे.
म्हणजे कमी अधिक प्रमाणात ८०० ते ८५० कोटी रुपये फक्त विमानावावर खर्च होतील. बरे नियमित विमान उड्डाण सांभाळत ह्या फेऱ्या विमानतळावर संचालित करण्यासाठी विमानतळाची क्षमता वाढवावी लागेल किंवा नवीन टर्मिनल तयार करावे लागेल, आता विमानतळ आहे ST स्टॅण्ड तर नाहीये, मग किमान टर्मिनस बंधाययचे किंवा वाढवायचे तर संपूर्ण खर्च जवळपास ८ ते ९ हजार करोड ! हा एका बाजूचा आणि दुसऱ्या बाजूला पण कमी अधिक प्रमाणात इतकाच ! म्हणजे जवळपास १६ हजार करोड ! बरे या विमानसेवेचा लाभ घेता येणार फक्त दोन शहरातील लोकांना ज्यांना मुंबई अहमदाबाद मुंबई असा प्रवास करायचा आहे त्यांना. मुंबई आणि अहमदाबाद येथील विमानतळाची सदस्थिती बघता इतके इन्फ्रा तिथे तयार होऊ शकत नाही, सध्याच मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम सुरू आहे. त्या वरून पण पर्यावरणीय ऱ्हासाचे रडगाणे सुरू आहेच. तेव्हा अजून एक विमातळ तो काहीसा छोटा का असेना जमिन अधिग्रहणा पासून सगळ्याचा खर्च गृहीत धरून पण १ लाख कोटीच्या आसपास होणार, तो पण प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर....नाही तर वाढणार. बरे हा फक्त इन्फ्राचा खर्च तो पण अर्धवट (मी काही इतका अभ्यासू नाही म्हणून, नाही तर संपादक नसतो झालो) पुन्हा रोजच्या उड्डाणासाठी मनुष्यबळ, विमानतळावरील मनुष्यबळ, विमानांचा रोजचा रखरखाव आणि विशेष म्हणजे इंधन खर्च कोणत्या दृष्टीने हे विमानउड्डाण ते पण फुकट परवडणार आहे? हे कुबेर सांगतील काय?
बुलेट ट्रेनचा मार्ग जरी मुंबई ते अहमदाबाद बांधल्या जात असला तरी ती काही शहरातून प्रवास करणार आहे. म्हणजे त्या त्या शहरात स्थानके पण असतील आणि त्या भागातील प्रवासी त्याचा उपयोग पण करू शकतील. सुरत, भरोच आणि बडोदा सारखी मोठी शहरे त्यात आहेत. समजा मुंबई अहमदाबाद थेट विमान प्रवास केला तरच तो १ तासात पूर्ण होतो, सोबत सुरत आणि बडोदा शहरात ते विमान उतरणार आणि उड्डाण घेणार असे केले तर तोच विमान प्रवास साडे तीन ते चार तासांचा होईल आणि इंधन खर्च पण वाढेल. या शहरात पण त्या नुसार इन्फ्रा वाढवावा लागेल तो खर्च वेगळा ! या मार्गाचे किंवा भारतीय बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अजून काही आयाम आहेत ते या लेखाचा विषय नाही.
आता कुबेर काकांनी अमेरिकेत रद्द झालेला बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती देतात, मात्र मी अजून एक माहिती देतो. जपानने १९६४ साली बुलेट ट्रेन चालवल्यानंतर जगाचा रेल्वेकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. महायुद्धा नंतरच्या काळात रस्ते बांधकामात झालेल्या सुधारणा, वाढलेली मिळकत आणि स्वस्त मिळणाऱ्या मोटारी आणि इंधन त्यामुळे रस्ते वाहतूक जगात वाढली होती, त्यातच नवीन जेट विमानांचा वापर वाढल्याने पण अंतर कमी झाली होती. खास करून रेल्वे जिथे जन्माला आली आणि वाढली त्याच युरोपमध्ये रेल्वे बाबत उदासीनता होती, त्यात नवीन भर, नवीन टेक्नॉलॉजी येत नव्हती. तिथे हळूहळू रेल्वे बाद होण्याची चिन्हे दिसत होती. त्यातच जगात जेट विमानाच्या पुढील पायरी म्हणजे सुपर सॉनिक प्रवासी विमान बनवण्याची स्पर्धा सुरू होती. अमेरिका, रशिया आणि युरोप मध्ये इंग्लंड-फ्रांस मिळून यावर काम करत होते.
यात इंग्लंड आणि फ्रान्सच्या प्रयत्नांना यश आले आणि काँकर्ड नावाचे प्रवासी सुपर सॉनिक विमान जन्माला आले १९६९ मध्ये याने पहिले उड्डाण घेतले. साधारण १९७६ पासून त्याने नियमित सेवा देण्यास सुरुवात केली, लंडन ते पॅरिस आणि लंडन ते न्यूयॉर्क या गजबजलेल्या हवाई मार्गावर मोठ्या प्रमाणात सेवा सुरू झाली.
हे होत असतांना पण फ्रांस मध्ये जपान कडून प्रेरणा घेत वेगवान रेल्वेवर काम सुरू झाले. TGV या फ्रान्सच्या कंपनीने १९८० मध्ये आपली बुलेट ट्रेन जगासमोर आणली आणि सेवा सुरू केली. १९७५ मध्ये अजून एक घडामोड म्हणजे खूप आधी विचारत घेतलेली फ्रांस आणि इंग्लंड मधील इंग्लिश खाडी खाली बोगदा खणून वाहतूक करण्याच्या योजनेचे दोन्ही देशांकडून पुनर्विचार करण्यात आला, १९८६ साली तसे करार करत काम सुरू झाले. तेव्हा कोणीही असे म्हंटले नाही की आता जेट विमान आले, सुपर सॉनिक विमान आले तर वेगवान रेल्वे आणि या बोगद्यात पैसे टाकायची गरज का? म्हणून... आज वेगवान रेल्वेने युरोपचा प्रवास बदलावला आहे. कुबेर स्वतः पण तिकडे जात असतील तर युरो ट्रेन मध्ये वेगवान आणि आरामच्या प्रवासाचा आनंद त्यांच्या आवडत्या वरुणीचे घोट घेत करत असतीलच.
बाकी वर सांगितल्या प्रमाणे मी काही विद्वान नाही, तरी तुम्हाला काही चुकीचे वाटल्यास बरोबर करावे.
कुबेरकाकांनी हर्बल तंबाखू लावून लिहिले असेल...
उत्तर द्याहटवा