सध्या कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्याने देशात आणि राज्यात धुराळा उडाला आहे. देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले? हा प्रश्न खरच गहन आहे. अगदी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि साहित्यिक पू. ल. देशपांडे यांनी पण त्यांनी शब्दबद्ध केलेल्या "अंतुबर्वा" या व्यक्तिरेखेच्या तोंडी पण ,"इंग्रज गेले ते कंटाळून, भारतात लुटण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही. धंदा तोट्यात जायला लागला, म्हणून गाशा गुंडाळून निघून गेले." असे वाक्य टाकले आहे. एकूण काय ? भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले ? या बाबत वेगवेगळे विचार आजच नाही तर या अगोदर पण मांडल्या गेले आहेत.
तरी भारताला स्वातंत्र्य "भीक" म्हणून मिळाले आहे का? तर याचे उत्तर देतांना दुसरा प्रश्न विचारावा लागेल की, "चरखा चालवून आणि सूत काढून देश स्वतंत्र झाला का?" मात्र या प्रश्नाचे कोणी खरे उत्तर देणार नाही, कारण त्यामुळे आजपर्यंत उभ्या केलेल्या महात्म्याचे महात्म्य काहीसे कमी होईल. लक्षात घ्या पूर्ण नाही ! आणि कदाचित त्याचमुळे मूळ मुद्याला बगल देत सगळे कंगनाच्या "भीक" या शब्दावर अडकून आहेत.
असो, एक मात्र लक्षात घ्यायला हवे, ज्या इंग्रजांनी १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्य संग्रामात सुरवातीला सपाटून मार खाल्ला, अत्यंत अमानुष पद्धतीने आपल्या लोकांचे मरण बघितले, तरी डगमगून न जाता नेटाने साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत बंड कर्त्यांचा बिमोड केला आणि देशावर आपली पकड अधिक पक्की केली. कंपनी सरकार जाऊन खुद्द महाराणीच्या छत्रछायेत भारताला आणले. या सगळ्या बदलाचे कारण फक्त आणि फक्त भारतावर आपले राज्य अबाधित ठेवणे इतकेच होते. भारतासारख्या खंडप्राय देशावर, ज्यात अनेक भाषा, वेशभूषा आणि मानसिकता असल्या तरी एका सांस्कृतीक धाग्याने बांधल्या गेलेल्या लोकांवर राज्य करणे त्यांच्या करता पण तसे सोपे नव्हते. तरी नेटाने वेगवेगळ्या क्लुप्त्या करत, राजकारण करत इंग्रजांनी आपले राज्य चालवले. वेळप्रसंगी नरसंहार केला, तर कधी दोन पावले मागे घेतली, तर कधी भारतीय लोकांना आपसात झुंजवले, पण सत्ता कायम ठेवली. मग हेच इंग्रज १९४५-४६ साली ठरवतात आणि १५ ऑगस्ट १९४७ साली इथून उठून निघून जातात असे कसे?
बाकी चीन सम्राटा कडून १०० वर्षाच्या करारावर मिळालेल्या हॉंगकॉंग बेटाला इंग्रजांनी कम्युनिस्ट चीनने कितीही आदळआपट केली तरी करार पूर्ण होईस्तोवर चीनला सोपविले नव्हते. उलट ते बेट चीन कडे न सोपवता, त्याला वेगळा देश म्हणून स्वातंत्र्य देता येईल काय याची चाचपणी इंग्रजांनी केली होती. पण जेव्हा कम्युनिस्ट चीन समोर ती डाळ शिजली नाही, तेव्हा मन मारून, आणि एक देश दोन व्यवस्था वगैरे पाचर मारत हॉंगकॉंग चीनच्या सुपूर्द केले. बाकी त्या नंतरचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. हॉंगकॉंगची जनता आणि मुख्य भूमी चीन मधील सरकार यांच्यातील संघर्ष अजून थांबला नाहीये. इंग्रजांचे जगाच्या पाठीवरील हे एकमेव उदाहरण नाही आणि भारतपण त्याला अपवाद नाही.
अंतुबर्वा म्हणतात त्यात काहीसे सत्य आहे. भारतीय जनता हँगकाँगच्या जनतेसारखी इंग्रज धार्जिणी नव्हती. त्यामुळे भारतात सत्ता राबवायला इंग्रजांना जास्त मेहनत आणि पैसा टाकावा लागत होता. त्यातच दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडची आर्थिक परिस्थिती खालावली. सोबतच भारतात आपणच निर्माण केलेल्या काँग्रेसला राजकारणात झुकते माप देत देशातील जनतेचा असंतोष नियंत्रित करण्याचे दिवस आता संपत आहेत हे १९४५ साली मुंबई, लाहोर आणि चेन्नई मध्ये पसरलेल्या नौसैनिकांच्या उठवामुळे लक्षात आले.
मात्र नौसैनिकांचा उठाव हा फक्त एक भाग झाला, दुसरा भाग असा की महायुद्धात भाग घेतलेल्या भारतीय जवान जे युद्धकैदी झाले होते, त्यांच्या मनात सुभाषचंद्र बोस सारख्या नेत्यांनी स्वातंत्र्याची ज्योत लावण्याचा प्रयत्न केला होता. ज्यांची ज्योत पटकन पेटली ते आझाद हिंद सेनेत दाखल झाले होते आणि ज्यांची नाही पेटली ते अजून तुरुंगात होते. त्यातही जर्मन फ्रंट वर असणाऱ्यांना कितीही प्रयत्न केला तरी सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत जाता आले नव्हते. हे सगळे जवान युद्ध संपल्यावर भारतात वापस येणार आणि आज ना उद्या मिलीशीया उभा करणार ही काळ्या दगडावरची रेष होती. १८५७ चा अनुभव असलेल्या, सोबतच बदललेल्या आंतराष्ट्रीय राजकारणाचा आणि आपल्या स्थानाचा वकुब माहीत असलेल्या इंग्रजांना परिस्थितीची जाणीव नव्हती असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.
अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा अनुभव घेतलेल्या आणि बदलत्या जागतिक परिस्थिती सोबत जुवळून घेतांना आर्थिक गणित बिघडलेल्या इंग्लंडला सन्माजनक पद्धतीने भारताबाहेर पाय काढणे आवश्यक होते. तेच इंग्रजांनी केले. आता याला "भीक" म्हणायची की "मजबुरी" हे तुमचे तुम्ही ठरवायचे.
बाकी त्यातही इंग्रजांनी मेख मारत भारताचे तुकडे केले हे काही मला मान्य नाही. कारण तत्कालीन परिस्थिती आणि मुस्लिम लीगचे राजकारण, सोबतच अगदी आजतागायत मुस्लिम समाजाची मुघल सल्तनत बाबत असलेले प्रेम बघता, हिंदू नेत्यांसमोर दोनच रस्ते होते पहिले फाळणी मान्य करायची आणि दुसरी फाळणी नाकारत लढायचे ! बाकी "चरखा चला के स्वराज लेंगे" वाली मानसिकता असणारे तथाकथित हिंदू नेत्यांना दुसऱ्या मार्गाने जाणे जमणार नव्हतेच, ना त्यांचा तो वकुब होता, ना मानसिकता !
इंग्रजांची खेळी ही की जागतिक राजकारणात आपली "झाकली मूठ सव्वा लाखाची" राहावी आणि निदान आपल्या अंकित असलेल्या देशांमधून तरी आपल्याला सन्मान मिळावा म्हणून कॉमनवेल्थची शक्कल बाहेर काढली आणि ती या देशांच्या गळी उतरवली. तुम्हाला आठवते ? काही दिवसांपूर्वी स्वतंत्र भारताच्या पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या घरावर त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावर पण बरेच दिवस गुप्तचरांकडून पाळत ठेवली होती असे पुरावे समोर आले होते. या प्रकरणामागे खरे कारण असे की भारताच्या पंतप्रधानांना तसा निर्णय घ्यावा लागला, कारण आपण कॉमनवेल्थ देश आहोत आणि जो ब्रिटनचा शत्रू तो आपला पण ! सुभाषबाबू हे तर ब्रिटनचे युद्धक अपराधी होते, त्यांना पकडून ब्रिटिशांच्या स्वाधीन करणे ही तत्कालीन भारतीय पंतप्रधानांची प्राथमिकता होती. बाकी इंग्रजांची लष्करी परंपरा याच मुळे पाकिस्थानला नाही तर भारताला भेटली हा त्यातील लाभ ! (हा विषय वेगळा, म्हणून थोडक्यात)
या कॉमनवेल्थचाच परिणाम असा की स्वतंत्र देश दुसऱ्या स्वतंत्र देशासोबत संबंध वाढवायला राजदूत पाठवतो मात्र आपण इंग्लंड आणि कॉमनवेल्थ देशांमध्ये राजदूत न पाठवता उच्चायुक्त नियुक्त करतो, असे का? याचे उत्तर देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य झालाच्या वालग्ना करणाऱ्यांनी नक्की द्यावे.
असो, आपल्या इथे एक म्हण प्रचलित होती, ती म्हण विशेषतः काँग्रेसी राज्यकर्त्यांची जास्त वापरात आली, ती म्हणजे, "गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज सत्तेत आले." त्याचे कारणच असे होते की संविधान लागू झाल्यावर पण भारतात इंग्रज कायदे कायम ठेवत काँग्रेसने राज्य केले. बाकी भारतीयांच्या असंतोषाचा दबाव कमी करण्यासाठी इंग्रजनाकडूनच स्थापन केलेल्या भारतीय काँग्रेस कडून अजून वेगळी अपेक्षा काय ठेवणार होतो?
याच सगळ्याचा उहापोह करत २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यावर इंग्लंड वरून प्रकाशित होणाऱ्या गार्डीयन या दैनिकांने त्याच्या संपादकीय मध्ये भारताला आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असा उल्लेख केला हे विसरता येणार नाही.
आता तुम्ही विचार करा की कंगना राणावत चुकीची की बरोबर, बाकी आज जे कंगना राणावत विरोधात बोलत आहे त्यांना स्वतःला आज पर्यंत "ये आझादी झुटी है" चे स्वप्न पडत होते आणि अगदी काल पर्यंत हीच लोक "हमे चाहीये आझादी" च्या घोषणा बेंबीच्या देठा पासून देत होते. बाकी आज जे कंगनाचे समर्थन करत आहेत ते या घोषणा देणाऱ्या लोकांच्या विरोधात आवाज बुलंद करत त्यांना "देश से नही, तो देश मे आझादी चाहीये" सारखे भंपक वाक्य बोलयला लावत होते.
राहिला प्रश्न आपल्या विक्रम गोखल्यांचा तर त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांना उगाच असले प्रश्न विचारत गोत्यात आणायचा फाजीलपणा करणारे पत्रकारांना अजून नवाब मलिक यांना "हर्बल तंबाखू" म्हणजे नक्की काय ? आणि त्याची लागवड कशी करायची ? हा प्रश्न विचारणे किंवा शरद पवार यांना "विशिष्ठ वनस्पती" म्हणजे नक्की काय असते भाऊ? हे विचारणे काही जमले नाही.
या वरून एकच सिद्ध होते की, स्वातंत्र्य वगैरे गावगप्पा आहेत, अंधश्रद्धा आहेत ! "जग हे बंदिशाला" हेच सत्य आहे.
हा जो काही गदारोळ चालू आहे कंगना रानौत आणि खरं बोलणारे(म्हणजे नेहमीच खरे बोलणारे आणि असे खरे बोलणे लोकांना नेहमी फटकळ वाटते) आदरणीय विक्रम गोखले यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत . या विषयी बोलायचे झाले तर पहिला मुद्दा म्हणजे आता यांच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा सगळे जण अत्यंत सोयीस्कर रित्या विसरले आहेत ,असे का ?
उत्तर द्याहटवाकी ते फक्त समाजाच्या काही विशिष्ट घटकांपुरतेच मर्यादीत आहे ?
दुसरे असे की, या दोघांच्या मताशी सहमत असणारे किती लोक आहेत, हे सपशेल दुर्लक्षीले गेले आहे. असे का ?
तिसरा मुद्दा म्हणजे , पंडित नेहरू यांच्या हिंदू असण्याविषयी किंबहुना नसण्याविषयी जे अनेक लेख सोशल मीडिया वर येतात (त्यात म्हटल्यानुसार ते मुलत:मुस्लिम होते) या पाहिजे तर आरोप म्हणू या , याचे खंडन आजच्या गांधी (फिरोज खानचे वंशज गांधी? ) कुटुंबियांनी केलेले नाही.(पुन्हा या तथाकथित गांधींचे वंशज जनेऊधारी ब्राह्मण कसे?)
आपले तर डोकेच चालत नाही. (खुपच भरकटत गेलो.)