प्रसन्न जोशी सर, लक्ष कुठे असते तुमचे?



बाकी सर कालच्या सगळ्या लाईव्ह मध्ये तुम्ही मूळ मुद्याला चांगलीच बगल दिली आणि जाहिरात तयार करणाऱ्या टीमला क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली चांगलीच मोकळीक. मुळातच जसे नवनिर्मिती म्हणजे फक्त जुने पडून नवीन बांधकाम करणे नाही. शहरातील काही जुन्या इमारतीपण शहराच्या सौन्दर्यात भर टाकत असतात, तोच प्रकार संस्कृतीमध्ये पण असतो. बाकी काही जण मुद्दाम, जाणीवपूर्वक या संस्कृतीचा आणि धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करत असतात. 


आता मान्यवरच्या "कन्यादान - कन्यामान" या जाहिरातीचे उदाहरण घेऊ या. तुम्हाला या जाहिरतीत क्रिएटिव्हिटी नक्की काय दिसली? आणि ही जाहिरात कोणतेही नौरेटिव्ह सेट करत नाही हे तुम्ही कोणत्या अभ्यासावरून बोललात? तुम्ही पत्रकार आहात, साम मध्ये आल्यापासून सातत्याने तुम्ही "लक्ष असते माझे" घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे माझे लक्ष असते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहात. 


मात्र या प्रकरणात एकतर तुमचे लक्ष फार वरवरचे आहे किंवा असून तुम्हाला मूळ मुद्यावर लक्ष द्यायचे नाहीये हे सरळ दिसत आहे. कारण आता पर्यंत हिंदूंनी विरोध केलेल्या जाहिरातींची एक पार्श्वभूमी समाज माध्यमे, वृत्त पत्रातील छोटे लेख या व्दारे तयार केल्या जाते. मान्यवरवाली जाहिरात ही याच प्रकारात मोडणारी आहे, ती काही जाहिरात टीमच्या डोक्यात आलेली क्रिएटिव्हिटी नाही. 


साधारण दोन वर्षा पासून "कन्यादान" या प्रथेचा चुकीचा अर्थ, त्यातील "दान" या शब्दव्दारे सांगितल्या जात होता. समाज मध्यमाव्दारे तथाकथित पुरोगामी, नव पुरोगामी मोठ्या प्रमाणावर तो लेख पसरवत होते. त्यातील आशय असा की तुम्ही तुमची मुलगी "दान" कसे देऊ शकता? वगैरे वगैरे... 



पाहिले काही हिंदू नाव असलेल्या खात्यांवरून हे लेख, मिम्स आणि विखारी भाषेतील प्रतिक्रिया शेअर व्हायला लागल्या. मग काही हिंदू समोर आले ज्यांचा संस्कृत मधील अभ्यास बरा किंवा चांगला आहे ते या सगळ्याला विरोध किंवा यातील सत्य सांगायचा प्रयत्न करू लागले. मात्र तो पर्यंत जमत ए इस्लामचे तुमचे अभ्यासक मित्र, ज्यांना या आधी अनेकदा तुम्ही तुमच्या कार्यक्रमात इस्लामी अभ्यासक म्हणून बोलविले आहे, ते चालवत असलेल्या धर्म मराठी या फेसबुक पेजवर या "कन्यादान" संदर्भात खोडसाळ वक्तव्य यायला लागले. त्यावर मग इस्लाम धर्मियांच्या तसल्याच प्रतिक्रियापण ! या सगळ्या गदारोळात आलेली "मान्यवर" ची जाहिरात कोणत्या क्रिएटिव्हटीचा नमुना होती?.....कुठे लक्ष असते तुमचे? 


या अगोदर मी सांगितलेली "सर्फ एक्सेल" ची जाहिरात ! त्या आधी उत्तर प्रदेशात होळीच्या पार्श्वभूमीवर असाच वाद रंगवल्या गेला होता. कोण्या स्थानीय कलाकारांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून केलेल्या होळी गीताच्या व्हिडीओ मध्ये एक मुस्लिम मुलगा, हिंदू मुलीला गुलाल लावत आहे असे चित्रित केले होते. प्रत्यक्षात अंगावर रंग पडला म्हणून दंगल करणारे मुस्लिम हिंदू पोरीला रंग लावायला समोर कसा काय येऊ शकतो? म्हणून चर्चा सुरू असतांना मग एका हिंदूने त्याच गाण्याचा दुसरे व्हर्जन आणले ज्यात हिंदू मुलगा मुस्लिम मुलीला रंग लावतांना दाखवल्या गेला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्फ एक्सेलची जाहिरात बघा आणि मग सांगा की ही जाहिरात क्रिएटिव्हिटीचा नमुना होती म्हणून....कुठे लक्ष असते तुमचे? 



जी कथा मान्यवर आणि सर्फ एक्सेलची तीच कथा तनिष्कच्या जाहिरातीची. आपल्या हिंदू सुनेचे हिंदू प्रथेप्रमाणे डोहाळे जेवण घालणारी मुस्लिम सासू मात्र आपल्या हिंदू सुनेला त्या धार्मिक कार्यात सुद्धा कपाळावर कुंकू लावू देत नाही ही कोणती क्रिएटिव्हिटी? बाकी ही जाहिरात समोर आली तेव्हा भारतात लव्ह जिहादचा मुद्दा गरम होत होता. आज जरी लव्ह जिहाडचा मुद्दा हिंदुत्ववाद्यांनी समोर आणला आणि त्यात काही अर्थ नाही असा देखावा काही पुरोगामी करत असले तरी. या कथित किंवा तथाकथित लव्ह जिहाद बद्दल पहिला आवाज उठवला तो केरळ मधील चर्चने हे तुम्हाला तरी लक्षात आहे का? तेव्हा तनिष्कने ती जाहिरात बनवतांना मग "ख्रिस्ती-मुस्लिम" जोडी का दाखवली नाही? अश्या विवादित पार्श्वभूमीवर जाहिरात बनवतांना हिंदू - मुस्लिम दाखवायचीच अगतिकता का आली? यात कोणती क्रिएटिव्हिटी होती? ......नक्की कुठे लक्ष असते तुमचे? 



अशीच एक जाहिरात टाटा टी ची पण होती. ज्यात एक हिंदू दांपत्य घरी वापस येते मात्र किल्ली विसरते. तेव्हा त्याच्या शेजारी राहणारी मुस्लिम काही वेळ त्यांना आपल्या घरी बसायची विनंती करतो. मात्र आपल्या तथाकठितपणे पूर्वग्रहदूषित मानसिकतेने हिंदू माणूस आढेवेढे घेतो, मात्र आग्रह मोडता न आल्यामुळे शेवटी त्या मुस्लिम शेजाऱ्याच्या घरी जातो आणि तेथे टाटा चहा पियुन त्याचे पूर्वग्रह मोडीत निघतात. 



आता मूळ मुद्दा असा की वरील मान्यवर सोडले तर सगळ्या जाहिरातीत "हिंदू मुस्लिम संबंध" हा दुवा समान आहे. बाकी मान्यवरच्या जाहिरातीत तोच संबंध पडद्या मागची भूमिका पार पाडत होता. आता या सगळ्या जाहिरातीमागे फक्त "क्रिएटिव्ह भूमिका" काम करत होती असे तुमचे म्हणणे असेल तर खरेच तुम्हाला विचारावे लागेल.....लक्ष कुठे असते तुमचे? 


मुळातच स्वतःला निर्भीड पत्रकारिता करण्याचे प्रशस्तीपत्र देणारे आणि लक्ष असते माझे म्हणणारे तुम्ही पळवाटा शोधण्यात जबरदस्त आहात. माझ्या त्या प्रतिक्रिये मधील शेवटचा आणि सर्वधर्मसमभावकरता आवश्यक असणारा परिच्छेद मात्र तुम्ही जाहीररीत्या वाचू शकले नाहीत. अर्थात इस्लामी कट्टरतावाद्यांना तुम्ही घाबरता हे तुम्ही जाहीर केल्यामुळे यावर जास्त प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही...तुमचे लक्ष नक्की कुठे असते ते कळले ! 


जाहिरात तयार करतांना नक्की प्रोसेस काय? हा नियमित वादाचा मुद्दा झाला आहे. जाहिरात तयार करणारी टीम अनेकदा मुद्दाम विवादित विषय घेत जाहिरात करते हे पण समोर आले आहे. अनेक जाहिरातदार अभिमानाने कधी देशप्रेम, तर कधी सर्वधर्मसमभाववाल्या जाहिराती तयार करतात. "हमरा बजाज" किंवा अमूल सारख्या जाहिरातदारांच्या जाहिराती या अश्याच थीम वर असतात मात्र कधी विवादात पडत नाहीत असे कसे? कारण जाहिरातदार तसा विवाद तयार होणार नाही या बद्दल सजग असतो. मात्र आजकाल हे नवीन जाहिरातदार मात्र विवादात आपल्याला संधी असल्याचे मानतात त्याचे काय? 


दुसरा मुद्दा की जाहिरातींवर आचार संहिता लागू करता येणार नाही हे मान्य ! मात्र जाहिरात सुरू असतांना जाहिरातीच्या क्रिएटिव्ह टीमचे नावे खाली स्क्रोल करायची सक्ती नक्कीच असावी. जाहिरातींची कल्पना कोणाची? त्याचे स्क्रिप्ट कोणी लिहले आहे? आणि जाहिरातीचे संवाद कोणी लिहले आहेत ? हे जनतेला कळायला पाहिजे. म्हणजे अकारण सिएत टायरच्या जाहिराती प्रमाणे फक्त कलाकार असणाऱ्या अमीर खान सारख्या अभिनेत्यावर त्या चुकीच्या जाहिरातींची गाज पडणार नाही. काय आहे की ही सगळी टीम नियमित पडद्यामागे अंधारात असते, अश्या क्रिएटिव्ह टीमला त्यांची योग्य प्रसिद्धी जनतेमध्ये मिळणे आवश्यक नाही काय? 


बाकी एक गोष्ट तर नक्की लक्षात घ्या. देशात "हिंदू - मुस्लिम" हे दोन ध्रुह अनेक शतकांपासून कार्यरत आहेत. देश स्वतंत्र झाला तेव्हा मुस्लिमांनी धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे करून घेतले. मात्र इतके करून देशातील मुस्लिम जनसंख्या अजूनही आपल्या धर्माच्या गोशात राहणे पसंद करते. इस्लाम सुधारणा म्हणजे धर्मद्रोह मानते. दुर्दैवाने इस्लाम कट्टरपंथीयांना घाबरणारे तुमच्या सारखे पत्रकार, पुरोगामी, क्रिएटिव्ह काम करणारे चूप बसून यांना खतपाणी देतात. जे समंजस आहे त्यांना किती डोज पाजणार? त्याची काही सीमा असणारच ना! असे समजा की आता ती सीमा समाप्त होत आहे. तेव्हा हिंदूं नंतर बहुसंख्यांक असलेल्या या समूहाला आता स्वतःत बदल करणे आवश्यक आहे आणि तुमच्या सारख्या पत्रकारांना पण ! असे न करता तुम्ही हिंदूंना अधिक कट्टरतेच्या जवळ ढकलत आहात याकडे मात्र तुमचे लक्ष नाही हे दिसत आहे. 


बाकी जाता जाता जाहिरातीवरून उठलेला राजकीय विवाद पण सांगतो. १९८९ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षांनी एकत्र येत काँग्रेस विरोधात जनता दलाची स्थापना केली आणि भाजपा सकट काही विरोधक या जनता दलासोबत एकत्र आले. जनता दलाला निवडणूक चिन्ह मिळाले चक्र (व्हील) ! लक्षात आले का? या नावाने आजही कपड्याच्या साबणाची वडी मिळते. तत्कालीन काळात आजच्या सारखे वेगवेगळे चॅनल नव्हते. दूरचित्रवाणीवर एकच चॅनल होते सरकारी दूरदर्शन ! मग त्या चॅनलवर एकाएकी व्हील बारच्या जाहिराती वाढल्या. काँग्रेसी जागे झाले त्यांनी दूरदर्शन करता निवडणूक आचार संहिता लागू केली. निवडणूक चिन्ह दाखवता येणार नाही, निवडणुकीत उभे असलेले उमेदवार याचे कार्यक्रम, चित्रपट दाखवता येणार नाही, असे अनेक ! भाजपा तर्फे शत्रूगघन सिन्हा तेव्हा प्रथमच निवडणुकीत उभे होते आणि त्याच काळात दुरदर्शनने त्यांनी अभिनित केलेला रेखाचा "खून भरी मांग" चित्रपट दाखवण्याचे घोषित केले होते. मात्र नंतर लागू केलेल्या आचार संहितेमुळे मग दुरदर्शनने दोन निर्णय घेतले पहिला व्हील साबणाची जाहिरात न दाखवण्याचा आणि दुसरा अधिक हास्यास्पद होता, चित्रपट तर दाखवला मात्र जिथे जिथे शत्रू साहेबांचे दर्शन होते तिथे तिथे चित्र एडिट केल्या गेले. म्हणजे चेहरा दिसला नाही फक्त आवाज ऐकायला आला. या सगळ्यावर विरोधकांनी बराच गदारोळ केला. मात्र हे प्रकरण इथेच थांबले नाही. 


यथावकाश जनता दल जिंकले व्ही पी सिंग पंतप्रधान झाले. नंतर राममंदिरच्या मुद्यावर भाजपने व्ही पी सिंग सरकार पाडले. पुन्हा निवडणूका जाहीर झाल्या. मग एकाएकी दूरदर्शनवर नवीन कपडे धुण्याच्या साबणाची जाहिरात व्हायला लागली "त्रिशूल" नावाच्या ! व्हील साबणाची जाहिरात झाल्यावर या त्रिशूलची जाहिरात यायची, त्यात संवाद होता, "चक्कर छोड, त्रिशूल अपना" आणि चक्कर छोड म्हणतांना ती अभिनेत्री बोटाने व्हील करून दाखवायची. मग आधी अश्या दूरदर्शनवरील आचार संहितेच्या विरोधात असलेले समाजवादी यांनी त्याच आचार संहितेचा आधार घेतला आणि त्रिशूल साबणाची जाहिरात बंद केली, पुन्हा गदारोळ उठला. आज ना तुम्ही सांगितलेला गंगा साबण दिसत, ना त्रिशूल...तेव्हा जाहिराती बनवतांना फक्त नवनिर्मिती किंवा क्रिएटिव्हव्हीटीचा विचार असतो, त्यातून कोणताही नारेटिव्ह जन्माला घालायचा नसतो असे तुमचे मत असेल तर दुर्दैवाने तुमचा अभ्यास कमी पडतो आहे असेच म्हणावे लागेल. बाकी जोशी सर लक्ष नसते तुमचे ! नुसत्याच बाता !

टिप्पण्या