अफगाणिस्थान मध्ये तालिबान आल्यावर देशात तालिबान समर्थक उघडपणे समोर येत आहेत. प्रसिद्ध शायर मूनव्वर राणा असो की, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे सज्जाद नोमानी असो किंवा जमात ए इस्लामी हिंद चे समाज माध्यमांवरील सक्रिय कार्यकर्ते ही सगळी लोक अफगाण मधील तालिबानी सत्तेचा जल्लोष करत आहेत, समर्थन करत आहेत. तालिबानचा इतिहास माहीत असून या सगळ्या तालिबानी समर्थकांच्या आवाजात भारतातील तमाम तथाकथित उदारमतवादी, डाव्या विचारांचे गुलाम पण आपली भर घालत आहे.
भारतीय मुस्लिमांकरता तर तालिबान सत्तेचे समर्थन करणे हे ईश्वरीय कार्य आहे. देवाच्या वचनावर आधारित इस्लामी शरिया कायद्यावर चालणारे राज्य म्हणजे ईश्वरीय राज्य ! तेव्हा मुस्लिम उम्माच्या प्रेमात पडलेल्या भारतीय मुस्लिमांना आनंदाचे भरते येणे सहाजिकच..मग त्या पाई कुराण मधील वचने देत, भांडवलशाही व्यवस्थेने केलेल्या कथित गलचेपीची उदाहरणे देत, तालिबानने त्यावर कसा विजय मिळवला याचे गोडवे ते गाणारच !
तरी भारतातून तालिबानी सत्तेच्या आणि या सत्तेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्यांच्या विरोधात सूर निघत आहेत. मात्र दुःखाची गोष्ट अशी की यातील बहुतांश सूर हे हिंदू धर्मीयांकडून निघत आहेत, त्यातही हिंदुत्ववादी हिंदूंकडून ! ज्याचा सगळा भार हा धार्मिक विरोधाकडे झुकलेला आहे.
मात्र भारतीय मुस्लिमांचा या तालिबानी सत्तेविरोधातील स्वर मॅट इतका क्षीण आहे की तो या गदारोळात आयकायला पण येत नाहीये.
या सगळ्यात अजून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे ते म्हणजे मुस्लिम राष्ट्रीय मंचाने पण अजून ना तालिबानी सत्तेचा विरोध केला, ना या तालिबानी सत्तेचे जे भारतीय मुस्लिम समर्थन करत आहे त्यांचा विरोध केला. फ्रांस मधील घटना घडल्यावर, फ्रांसच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा विरोध करायला या मंचाने लगेच बंगलोर येथे मोर्चा काढायचा खटाटोप केला होता, याच मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्री रामाला देव न मानता "इमाम ए हिंद" म्हणून मान्यता भारतीय मुस्लिमांनी द्यायला हवी म्हणून आपला धार्मिक न्यानगंड दाखवला होता. नको तिथे समोर समोर करणारा हा मंच आणि त्याचे पदाधिकारी आणि या मांचाला डोक्यावर बसवणारे हिंदुत्ववादी मात्र आता एकदम चिडीचूप आहेत हे कसे?
एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची की तुम्ही सज्जन शक्ती एकत्र करत असाल तर ती शक्ती सज्जन असल्याचे जगाला कळले पाहिजे आणि ते तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही दुर्जन शक्तीचा विरोध कराल... तेव्हा एकदा तर या विरोधात तोंड उघडा, आपल्याच रक्ताचे असलेल्या या भारतीय मुस्लिमांना आव्हान करा की त्यांनी तालिबानचे समर्थन करू नये, त्यांना आपल्या शरिया कायद्यामधील त्रुटी दाखवा, असमानता दाखवा आव्हान करा की या शरिया कायद्याला मानवतावादी बनवत धर्म सुधारणा राबवा म्हणून....
मग कळेल खरे रक्ताचे नाते काय असते ते..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा