खेलरत्न आणि मोदींचे मायाजाल



राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केल्या मुळे अनेकांना एकदम अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमची आठवण येत आहे. 



बिलकुल करा आंदोलन त्या स्टेडियमचे नाव बदलायला, जनरेटा बघत नरेंद्र मोदींनी तसा निर्णय घेतला तरी काही फरक पडणार नाही आणि कोणी रडणार नाही, मात्र नंतर हाच नियम पुढे चालवल्या गेला तर तुम्ही ४० वेळा रडाल....दर काही दिवसांनी तुमच्या कोमल हृदयाला चरे पडतील आणि हे संघी भाजपीये तुमच्या झालेला जखमेला दर महिन्यात बोट घालून घालून मोठी करतील....कसे ते माहीत आहे ? मग खालची यादी बघा एकदा 


1. इंदिरा गांधी खेळ परिसर, दिल्ली 


2. इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम, नवी दिल्ली 


3. जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली 


4. राजीव गांधी स्पोर्ट्स स्टेडियम, बवाना 


5. राजीव गांधी राष्ट्रीय फुटबॉल अकादमी, हरियाणा 


6. राजीव गांधी एसी स्टेडियम, विशाखापत्तनम 


7. राजीव गांधी इंडोअर स्टेडियम, पुडुचेरी 


8. राजीव गांधी स्टेडियम, नाहरगुन, ईटानगर 


9. राजीव गांधी बैडमिंटन इंडोअर स्टेडियम, कोचीन 


10. राजीव गांधी इंअडोर स्टेडियम, कदवंतरा, एर्नाकुलम 


11. राजीव गांधी खेळ परिसर, सिंघू 


12. राजीव गांधी मेमोरियल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी 


13. राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद 


14. राजीव गांधी इंडोअर स्टेडियम, कोचीन 


15. इंदिरा गांधी स्टेडियम, विजयवाड़ा, आंध्र प्रदेश 


16. इंदिरा गांधी स्टेडियम, ऊना, हिमाचल प्रदेश 


17. इंदिरा प्रियदर्शनी स्टेडियम, विशाखापत्तनम 


18. इंदिरा गांधी स्टेडियम, देवगढ़, राजस्थान 


19. गांधी स्टेडियम, बोलंगीर, उड़ीसा 


20. जवाहर लाल नेहरू स्टेडियम, कोयंबटूर 


21. राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून 


22. जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई 


23. नेहरू स्टेडियम (क्रिकेट), पुणे 



आता हे झाले स्टेडियम्स, पण काँग्रेस इतक्यावर थांबले नाहीये बरे का ! भारतातील काही खेळाच्या महत्वाच्या स्पर्धा पण यांच्या नावाने होतात. 



1. राजीव गांधी गोल्ड कप कबड्डी टूर्नामेंट 


2. राजीव गांधी सदभावना रन 


3. राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय आमंत्रण फुटबॉल टूर्नामेंट 


4. राजीव गांधी बोट रेस, केरल 


5. राजीव गांधी मेमोरियल रोलर स्केटिंग चैम्पियनशिप 


6. राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय जूडो चैम्पियनशिप, चंडीगढ़ 


7. राजीव गांधी गोल्ड कप फुटबॉल टूर्नामेंट 


8. राजीव गांधी मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल टूर्नामेंट 


9. दिल्ली राज्य द्वारा आयोजित ऑल इंडिया राजीव गांधी बास्केटबॉल (गर्ल्स) टूर्नामेंट 


10. दिल्ली राज्य द्वारा आयोजित ऑल इंडिया राजीव गांधी रेसलिंग गोल्ड कप 


11. राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय आमंत्रण गोल्ड कप फुटबॉल टूर्नामेंट, जमशेदपुर 


12. राजीव गांधी मिनी ओलंपिक, मुंबई 


13. इंदिरा गांधी गोल्ड कप टूर्नामेंट 


14. इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हॉकी टूर्नामेंट 


15. इंदिरा गांधी बोट रेस, कोच्चि 


16. जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय स्वर्ण कप फुटबॉल टूर्नामेंट 


17. जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट 


आता या सगळ्या स्पर्धा यांच्या नावाने घेण्यासाठी त्या त्या  खेळात या परिवाराचे नक्की योगदान काय ? 



तेव्हा जास्त खाजवू नका, नाहीतर कदाचित याच दिवसासाठी मुद्दाम त्या स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवायला परवानगी दिल्या गेली असेल. 


तुम्हाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली टर्म संपतांना संसदेत केलेले शेवटचे भाषण आठवते का? त्यात त्यांनी आवर्जून माहिती दिली होती की, संसदेत ज्या बाकावर पंतप्रधान बसतात तिथे भारतातील फक्त तीनच माजी पंतप्रधानांचे नाव कोरले आहे. यात त्यांनी नाव न घेता हे सांगितले असले तरी भारतीय जनतेला ती तीन नावे नक्की कोणती असतील ते लगेच ध्यानात आले होते. 


मात्र या सगळ्या विरोधा नंतर नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे हे नाव बदलायला संगितले तरी विजय हा नरेंद्र मोदी यांचाच होणार हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. 


बघा नाहीतर रात्री आठ वाजता मोदी येतील दूरचित्रवाणीवर आणि म्हणतील," मित्रो, इस स्टेडियम को मुझे पुछे बगैर मेरा नाम दिया गया. इस के लिये मुझे बेहत अफसोस है. मेरा क्रिकेट मे कोई योगदान नही, फिर भी मेरे पंतप्रधान होने वजह से ये नाम रखा गया..... लेकीन मुझे खुशी इस बात की है, की इसका पुरजोर विरोध मेरे समर्थक ही कर रहे है। विरोधक जीनका मोदी भक्त कहके मजाक उडाता है, उन्हे अंध भक्त कहता है, वही भक्तोंने साबीत किया है की वह भक्त तो है लेकीन अंध नही ! 


और मै इतके भावना का समर्थन करता हु, हमे आपना नाम अमर करने का लालच नही है जी....जो भारतीय राजनीती मे आजतक देखा गया...हमे तो देश का नाम ऊचा करना है, हमे ऊन भारत के सुपुत्रो का नाम ऊचा करना है, जीन्होने भारत माँ नाम ऊचा किया है। 


इसलीये मै यह निवेदन करता हु, की इस स्टेडियम का नाम बदल कर सचिन तेंडुलकर के काम से किया जाय, यह स्टेडियम दुनिया मे बडा और रेकॉर्ड तोडनेवाला स्टेडियम है, तो इसका नाम भी रेकॉर्ड तोडनेवाले के नाम से होना चाहीये की नही चाहीये?" 


समजा नरेंद्र मोदी यांनी असा काही निर्णय घेतला तर विरोधकांचा तर पार धूर निघेल. अर्थात हे स्वप्न रंजन आहे, असे काही होईल असे नाही. 


मात्र असे झाले काय किंवा नाही झाले काय दोन्ही स्थितीत धूर विरोधकांचाच निघत आहे आणि तो बघायला जास्त मजा येत आहे. .....तेव्हा विरोधकांनो जास्त विरोध करू नका......इतिहासावरून काही शिका.....आठवते ना......चहा वाला म्हंटल्यावर काय झाले होते?

टिप्पण्या