छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या अफगाणमधील अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या धुमश्चक्रीत मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. कट्टर इस्लामी समूह
तालिबानच्या गोळ्या या धुमश्चक्रीत दानिशला लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला असा समज तयार करण्यात आला. त्यातही तथाकथित भारतीय उदारमतवादी आणि डाव्या विचारांचे बिनडोक दानिशच्या मृत्यूला कट्टर इस्लामी तालिबान कारणीभूत नाही अश्या पद्धतीने आपले वक्तव्य करत होते, बंदुकीतून निघालेल्या गोळीला वगैरे दोष देण्याचे गाढवी वक्तव्य देत होते. सोबतच तालिबानच्या प्रवक्त्याचे,"तालिबानचा दानिशच्या मृत्यूत हात नाही."
या मरहूम दानिश सिद्दीकी याचे नक्की कर्तृत्व काय? तर त्याने भारताच्या पहिल्या लॉक डाऊन मध्ये प्रवासी कामगारांची झालेली दैना जगासमोर आणली, त्याने दुसऱ्या लाटेत भारतातील जळणाऱ्या चितांची दाहक छायाचित्र काढून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, त्याने शरणार्थी रोहिग्या मुस्लिमांची होणारी दैना समोर आणली, भारताची आणि भारत सरकारची जागतिक स्तरावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला. होय, प्रयत्नच ! कारण त्या मुळे काही काळ जगात खळबळ माजली तरी नक्की काय फरक पडला?
या सगळ्या प्रकारामुळे कामगारांची दैना, प्राणवायूची कमतरता, आवश्यक औषधांचा पुरवठा वगैरे प्रकरणात केंद्र सरकार विरोधात न्यायालयात गेलेल्या लोकांना हातात नक्की काय मिळाले? कामगार प्रश्नात न्यायालयाने स्वच्छपणे सांगितले की ज्या राज्यात हा कामगार होता, त्याला संभाळण्याची जवाबदारी त्या राज्याची होती, मग नाचक्की नक्की कुणाची झाली? प्राणवायू पुरवठ्याच्या प्रश्नावर जो आयोग नेमला त्याने तर दिल्लीतील आप सरकारची लक्तरे वेशीवर टांगली. महाराष्ट्र सरकार जे केंद्रावर प्राणवायू आणि ओषधांच्या अपुऱ्या पुरवठ्या बद्दल बाहेर गळे काढत होते, त्यांना न्यायालयात मात्र शपथपत्र द्यावे लागले की आम्हाला केंद्राने व्यवस्थीत पुरवठा केला म्हणून....मग सांगा नक्की कोणाला या सगळ्याचा त्रास झाला !
या आधी पण फेसबुकवर दानिश सिद्दीकीवर लिहलेल्या लेखात हा धुमश्चक्रीत झालेला मृत्यू नसून विचारपूर्वक इस्लामी कट्टर तालिबानी मानसिकतेने केलेला खून असल्याचे मी लिहले होते. याचे कारण पण तसेच आहे. जगभरात युद्धक पत्रकारिता करणारे अनेक आहेत. त्यांच्यातील अनेकांना युद्धाचे वार्तांकन करतांना जखमी होणे किंवा मृत्यूला पण सामोरे जावे लागते. तरी युद्धक वार्ता पत्रकारांना आजकाल बऱ्याच प्रमाणात जीवन रक्षण प्रणल्या परिधान करायला दिल्या जातात. त्यातही त्यांच्यातील खूप कमी पत्रकारांना एकदम शत्रूच्या पुढ्यात जाऊ दिले जाते. शक्यतोवर विरोधक पत्रकारांवर किंवा पत्रकार असलेल्या भागावर जोरदार हल्ला करायचे टाळतात. त्यातही सिद्दीकीच्या बाबतीत त्याच्या अंगरक्षकला, त्याच्या वाहनचालकाला काही न होता फक्त सउद्दीकीला अश्या गोळ्या कश्या लागल्या हा महत्वाचा प्रश्न होता आणि ते पण शरस्त्राण आणि बुलेटप्रूफ जॅकेट असतांना !
मात्र आता समोर येणाऱ्या बातम्यांनुसार इस्लामी कट्टर तालिबान्यांनी दानिश सिद्दीकीला नुसत्याच गोळ्या मारल्या नाहीत तर तो मेल्यावरपण त्याच्या डोक्यावरून कार नेत त्याच्या मृतदेहाची विटंबना केली. हा तर खुनच आहे ! कट्टर इस्लामी मानसिकतेची ओळख सांगणारी घटना.
इथे भारतीय मुस्लिमांना भरल्या पोटी "इस्लामी उम्मा" चे जरा जास्तच कौतुक आहे. त्या पाई काहीही संबंध नसतांना पेलेस्टिन, सीरिया आणि फ्रांस मध्ये होणाऱ्या कथित मुस्लिम दमनावर पानभर लेख लिहल्या जातात. इतकेच काय तर बाजूच्या ब्रम्हदेशातील मुस्लिम रोहिणग्यावर होणाऱ्या अत्याचाराचा बदला इथे भारतात दंगल घडवून हिंदूंवर दगडफेक करत, माता भगिनींच्या अब्रूवर हात घालत घेतल्या जातो. काश्मीर मध्ये याच "मुस्लिम उम्माच्या" प्रेमात पडून आतांकवादासाठी इसिस संघटनेचा आधार घेतला जातो, तसे फलक फडविले जातात. त्यातच अमेरिकेने अफगाण सोडल्यावर तिथे मजबूत होणाऱ्या तालिबानला बघत अनेकांना अत्यानंद इथे भारतात होत आहे. त्या सगळ्यांना हा दानीश सिद्दीकीचा खून डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. "मुस्लिम उम्मा" मध्ये तुमची खरी औकात दाखवणारा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचा DNA एकच असल्याची साद घालत हिंदू मुस्लिम ऐक्याची हाक दिली होती. मी या असल्या भावनिक साद घालणाऱ्या वक्तव्याचा विरोधच केला होता. कारण फक्त भारतीय मुस्लिमांना नाही, तर जगातील सगळ्या मुस्लिमांना माहीत आहे की भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचा DNA एकच आहे म्हणून. दानिश सिद्दीकीचा इस्लामी कट्टर तालिबान्यांनी केलेला खून पण हेच दर्शवत आहे. तेव्हा DNA वगैरे लक्षात ठेवले नाही तरी मिळवले, पण कट्टर जिहादी इस्लामी जगतात, ज्यांना तुम्ही कथित मुस्लिम अन्याया विरोधातील योध्ये वगैरे समजता त्यांच्या लेखी तुमची इस्लामीयत, काश्मीरीयत वगैरे थोतांड आहे. तुमची ओळख खरी इस्लामी म्हणून नाहीच, "मुस्लिम ब्रदरहुडचे" तुम्ही पाईक नाही हीच आहे.
सोबतच भारतातील हेच उदारमतवादी सध्या भारत सरकारने तालिबान सोबत चर्चा करावी, चांगले संबंध प्रस्थापित करावे म्हणून दबाव आणत आहेत. त्या करता चीन तालिबान्यांना मांडीवर बसवेल पासून अनेक थीयरीज समोर आणत आहेत. त्यातही भारतीय जनतेला पण सरकारने तालिबान सोबत संबंध प्रस्थापित करावे म्हणून भारताने अफगाणमध्ये केलेल्या आर्थिक गुंतवणुकीबद्दल सांगितल्या जात आहे. सोबतच पाकिस्थानने तालिबनला भारतीय गुंतवणूक असलेले प्रोजेक्ट उडवा असा संदेश दिल्याचे आणि या मुळे भारताला आर्थिक नुकसान होण्याचे तारे तोडल्या जात आहे.
हे खरे की भारत सरकारने गेल्या काही वर्षात सरभौम, लोकशाही अफगाण सरकारच्या मदतीसाठी आणि त्या सरकारच्या स्थिरतेसाठी पैसा ओतला. मात्र त्या आर्थिक गुंतवणुकीतून आर्थिक फायद्याचा दृष्टिकोन नव्हता तर सर्वसामान्य अफगाण नागरिकांनी लोकशाही सरकारच्या मागे उभे राहावे आणि स्थिर सरकार ठेवत आपली प्रगती साधावी हा हेतू होता. या मागे भारत सरकारचा फायदा इतकाच की येथील नागरिक कट्टरतेच्या आहारी न जाता त्यांना भारताविषयी प्रेम उत्पन्न होईल. अमेरिका,चीन आणि भारताची मानसिकता या बाबतीत खूप वेगळी आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारत सरकारने जी तथाकथित गुंतवणूक केली आहे त्यात धरणे, बंधारे, दवाखाने, रस्ते, शाळा, विद्युत ट्रान्समिशन लाईन्स आणि महत्वाचे म्हणजे अफगाण मधील राष्ट्रीय संसद उभारून दिली आहे. या सगळ्या आर्थिक गुंतवणुकीतून सर्ववेळ आर्थिक फायदा देणारी गुंतवणूक कोणतीही नाही. जो काही आर्थिक फायदा झाला असेल तो प्रोजेक्ट उभारणी सोबत झाला असेल. मात्र भारत अफगाणमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारत अफगाणमधील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात जे प्रेम उत्पन्न केले आहे ती गुंतवणूक कधीच कमी होणार नाही. बाकी जिहादी तालिबान्यांना अफगाणमध्ये शाळा, कॉलेजेस, दवाखाने नकोच आहेत. या आधीपण तालिबान्यांनी या सगळ्यावर हल्ले केलेच होते. तेव्हा भारत सरकार तालिबण्यासोबत जी काही चर्चा करत आहे, ती तशीच चालू ठेवत भारताचे हित आणि अफगाण मधील सामान्य नागरिकांचे हित साधावे, उगाच तालिबानी भूत अंगावर ओढवून घेऊ नये.
तेव्हा भारतीय मुस्लिमांनो आता तरी जागे व्हा, कट्टरता सोडा किंवा सरळ घरवापसी करा आणि जिहाद्याना त्याची जागा दाखवा. दानिश सिद्दीकीच्या खुनाचे नाव घ्यायला घाबरणाऱ्या तमाम भारतीय उदारमतवाद्यांनी आणि डाव्यांनी एकतर निर्भयपणे तालिबनचे नाव घ्यावे किंवा निदान "इस्लाम मधील नथ्थुराम गोडसे मानसिकतेने" दानिशला मारले असे म्हणावे. या पैकी काहीही म्हणण्याची भीती वाटत असेल तर सरळ सलवार घालून हिजाब परिधान करून गुमान बसावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा