भारतीय सिनेमा सृष्टीतील मोठे नाव दिलीप कुमार यांचा ७ जुलै २०२१ मृत्यू झाला आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेणाऱ्या अजून एका ताऱ्याचा अस्त झाला.
धर्माने मुस्लिम असलेले तत्कालीन काळात भारतात पण फाळणी नंतर पाकिस्थानातील पेशावर शहरात ११ डिसेंबर १९२२ साली जन्मले, मोहम्मद युसूफ खान हे त्यांचे नाव. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या ज्वार भाटा या चित्रपटाने त्यांची कारकीर्द सुरू झाली. तत्कालीन सामाजिक मानसिकता म्हणा किंवा भारतीय जनतेला बसलेला फाळणीचा धक्का म्हणा मोहम्मद युसूफ खान याने चित्रपट सृष्टीत आपले नाव घेतले दिलीप कुमार ! पुढे १९४९ साली आलेल्या "अंदाज" चित्रपटाच्या यशा नंतर मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांना मागे वळून बघावे लागले नाही. या नंतर आलेल्या दीदार आणि देवदास या चित्रपटा नंतर त्यांना भारतीय जनतेने ट्रेजिडी किंग पदवी दिली आणि डोक्यावर बसवले. तत्कालीन काळात भारतीय चित्रपट सृष्टीला राज कपूर - दिलीप कुमार - देवानंद या कलाकारांची भुरळ पडली होती, जी आजही कायम आहे. कोणत्याही नवीन कलाकारात भारतीय जनता याच तिघांची छबी शोधायचा प्रयत्न करतो हीच त्यांच्या अभिनयाची, कामाची पावती !
मात्र कलाकार म्हणून हे जितके यशस्वी तितकेच विवादित ! राज कपूर वर ते सतत डाव्या विचारांचा प्रचार करतात असा आरोप झाला, त्यांचे चित्रपट भरतासोबतच तत्कालीन सोवियत रशियातपण चांगलेच गाजले, सोवियत रशियात त्यांना मान सन्मान पण लाभला. तसेच दिलीप कुमार यांचेही, जवाहरलाल नेहरू सारख्या व्यक्तित्वा सोबत मैत्री असलेल्या दिलीप कुमार यांचे पाकिस्थान प्रेमाचे अनेक दाखले दिले जातात. दिलीप कुमार यांना पाकिस्थान मधील प्रतिष्ठित "निशाण ए इम्तियाज" १९९८ साली हा पुरस्कार जाहीर झाला. या सोबतच दिलीप कुमार यांचया एकूण पाकिस्थान प्रेमा विषयी असलेल्या आख्यायिका पुन्हा डोके वर काढू लागल्या. त्याचे राजकीय वादंग उभे राहिले. भारतातील एक मोठा समूह त्यांच्या अभिनयावर प्रेम करत असला तरी त्यांचा धर्म आणि त्याचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान हे प्रकर्षाने अधोरेखित करायला लागला.
याचाच सगळा संदर्भ दिलीप कुमार यांच्या मृत्यू नंतर त्याच्या वर वेगवेगळ्या माध्यमांवर आलेल्या लेखात दिसून आला. या सगळ्या गदारोळात अनेकांनी दिलीप कुमार यांच्या मूळ नावाचा म्हणजेच मोहम्मद युसूफ खान या नावाचा उल्लेख अनेक ठिकाणी केला. या वरून भारतातील तथाकथित उदारमतवादी लोकांच्या पोटात पोटशूळ उठला नसता तर नवल !
नवीनच उदारमतवादी म्हणून समोर आलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पण दिलीप कुमार यांचे मूळ नावाची आठवण केली म्हणून खूप वेदना झाल्या आणि त्यांनी लगेच यसुफ खान या नावाची आठवण काढायची गरज का? असा प्रतिप्रश्न विचारला. हा प्रश्न विचारतांना या उर्मिला मातोंडकर यांना पण शेक्सपियर सारखा "नावात काय आहे ?" प्रश्न पडला. मात्र नाव बदलल्याने वृत्ती बदलत नाही हे भारतीय तत्वज्ञानातील सत्य मात्र त्या विसरल्या. उद्या कोणी उठून वाघाला आज पासून आपण मांजर म्हणू असे म्हणाला तर वाघ काय दूध प्यायला सुरवात करणार का? बाकी आजकाल राजकारणात उंदीर पण स्वतःला वाघ म्हणवून घेतात ती वेगळी गोष्ट ! मात्र खरा वाघ हा शिकारच करणार, दुधाच्या भांड्यात मांजरीसारखे चोरून तोंड घालणार नाही, इतके लक्षात ठेवले तरी खूप आहे.
एकूणच मोहम्मद युसूफ खान अशी आठवण काढणाऱ्या लोकांवर तोंडसुख घेणाऱ्या उर्मिला मातोंडकर हिने एकाच प्रशांचे उत्तर द्यावे की, या दिलीप कुमारची अंतयेष्टी नेमकी कशी झाली? सारणावर ठेऊन जाळले की सुपूर्त ए खाक केले?
या प्रश्नाच्या उत्तरातच दिलीप कुमार यांना मोहम्मद युसूफ खान म्हणून का लक्षात ठेवावे लागते याचे उत्तर आहे.
बाकी पाकिस्थानचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतातील तिघांच्या नशिबी आला मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार, मोरारजी देसाई, सय्यद अली शहा गिलानी ! आता यातील मोरारजी देसाई आणि युसूफ शहा गिलानी यांना "निशाण ए पाकिस्थान", तर मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांना निशाण ए इम्तियाज !
यातील युसूफ शहा गिलानी तर सरळसरळ काश्मीर मधील फुटीरतावादी आणि पाकिस्थानच्या मदतीवर पोसल्या गेलेल्या दहशतवादाचे समर्थक आहेत. तेव्हा त्यांना पाकिस्थानने सर्वोच्च पुरस्कार जाहीर का केला हे सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.
मग मोरारजी देसाई यांना का? तर मोरारजी देसाई यांनी पाकिस्थानला त्याच्या आण्विक तिळाची गुपिते भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे असे कळवत देशाच्या सुरक्षेची आणि गुप्तचर विभागाची अपरिमित हानी केली होती. अशी वदंता किंवा असे वृत्त अनेक ठिकाणी वाचायला मिळते. तेव्हा मोरारजी देसाई यांनी "निशाण ए पाकिस्थान" का मिळाला याचे उत्तर पण मिळाते.
त्याच हिशोबाने मुहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांना पाकिस्थानला नक्की काय मदत केली की, पाकिस्थानला त्याचा गौरव "निशाण ए इम्तियाज" देत करावा लागला याचे उत्तर नक्कीच शोधावे लागेल. आज पर्यंत दिलीप कुमार यांच्या विषयी पाकिस्थानची काही मदत केल्याच्या अफवा असल्याचे दिलीप कुमार प्रेमींचे म्हणणे आहे, देव करो आणि तसेच असो ! मात्र पाकिस्थानने आता पर्यंत भारतीयांना दिलेल्या सर्वोच्च सन्मानामागे भारताची किती मोठी राजकीय, सामाजिक आणि लष्करी हानी झाली आहे, याचा विचार करता "निशाण ए इम्तियाज" बद्दल किंतु तयार होणे साहजिक आहे. तेव्हा याचा विचार करत तरी तथाकथित उदारमतवादी आणि नवउदारमतवादी यांनी लक्षात घ्यावे इतकेच !




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा