चिनी कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाने झालेले मृत्यू लपविल्याचे आता अनेक राज्यात बाहेर येत आहे. रोज केंद्र सरकार कडून प्रदर्शित होणाऱ्या चिनी कोरोनाच्या संसर्गाच्या आकड्यांमधील तफावत समोर येते, कशी तर एकीकडे देशातील संसर्ग कमी होत असलेले या आकडेवारीत दिसते. रोज बाधित होणाऱ्या रुग्णांची कमी संख्या, त्याच बरोबर संसर्गातून मुक्त होणाऱ्यांची मोठी संख्या या सोबतच गेल्या ३-४ दिवसात एकाएकी मृत्यू संख्येतपण वाढ झाल्याचे दिसून येते आणि याचमुळे देशातील चिनी कोरोना संसर्गामुळे झालेले मृत्यू देशातील राज्य सरकारे लपवत होती आणि आता हळूच समोर आणल्या जात असल्याची भावना प्रबळ झाली आहे.
चिनी कोरोनाची दुसरी लाटेने देशात भयानक उपद्रव केला. राज्यातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधेवर आलेला अत्यंत जास्त असा अतिरिक्त भार, सोबतच औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांचा अभाव हा रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला हे नाकारायचे अजिबात कारण नाही. मात्र तत्कालीन काळात देशातील विविध राज्य सरकारांनी दिलेले मृत्यूचे आकडे आणि झालेले मृत्यू याचा मेळ बसत नसल्याचे प्रत्येक राज्यातील विरोधकांचे म्हणणे होते. एकीकडे गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशांवर भाजपा विरोधकांनी सरकार मृत्यू लपवत असल्याचे आरोप केले, तर राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र सारख्या राज्यात भाजपनी तेच आरोप तेथील राज्य सरकरांवर केले.
देशातील तमाम वृत्तसंस्थांनी उत्तर प्रदेश, गुजरात मधील स्मशाणात जळत असलेल्या असंख्य चितांची छायाचित्रे प्रसिद्ध केलीत, अगदी आंतराष्ट्रीय स्तरावर ही छ्याचित्रे प्रदर्शित झाली. मात्र याच वृत्तसंस्थानी मात्र महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील हीच स्थिती मात्र दाखवण्याचे प्रकर्षाने टाळले, जे महाराष्ट्राचे बाबतीत तेच देशातील इतर राज्यांच्या बाबतीत. मात्र एक मात्र खरे आहे की तेव्हा हिशोबात न धरलेले हे बाधित मृत्यू आता मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे.
आता मृत्यूसंख्या हळूहळू वाढवत असलेल्या राज्यांनी हे वाढीव मृत्यू लपवलेले नसून त्या वेळी संधीध्न असलेले मृत्यू होते, ज्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण करत आता त्या मृत्यूंना चिनी कोरोनाच्या संसर्गामुळे झाल्याचे पक्के केले असे समर्थन केल्या जात आहे. हे कसे ते समजून घ्या ! सध्या भारतात झालेले मृत्यू हे चिनी कोविड संसर्गाने झाले आहेत हे निश्चित करण्यासाठी आय सी एम आर (इंडियन काँसिल ऑफ मेडिकल रिसर्च) ची मार्गदर्शक तत्वे आहेत. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरूनच झालेला मृत्यू हा कोविड मुळे आहे की नाही हे ठरविल्या जाते. मात्र हे मृत्यू कशाने झाला हे ठरवतांना अजून काही समस्या येतात, जसे आधीच मृत्यू झालेल्यांची चाचणी अहवाल उशिरा येणे, चिनी कोविड संसर्गासोबतच रक्तचाप, मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकारांनी बाधित लोकांचा झालेला मृत्यू हा नक्की कोविडमुळे झाला की आधीच ज्या रोगांनी बाधित होते त्याने झाला हे कळण्यासाठी केलेल्या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल उशिरा येणे आणि महत्वाचे म्हणजे कोविड संसर्ग दूर झाल्या नंतर तयार झालेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे झालेल्या मृत्यू नक्की कशात नक्की कशात घ्यायचे हे न कळल्यामुळे कोविड मृत्यूत न धरलेले आकडे.
या सगळ्या मृत्यूंबाबत आवश्यक वैद्यकीय चाचण्या करायला उशीर होतो, मनुष्यबळाची कमी हा सगळ्यात मोठा अडसर या मागे आहे. त्या मुळे चाचणीला वेळ आणि सहाजिकच अहवाल यायला लागणारा वेळ गृहीत धरून हे आकडे वाढणार यात कोणतीही शंका नाही आणि या करता देशातील कोणतेही राज्य अपवाद नाही. मात्र ही संख्या नक्की किती असेल? हा प्रश्न विचाराणेच वेडगळपणा ठरेल असे आकडे महाराष्ट्रात वाढत आहेत.
महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या वृत्तपत्राच्या संपादकाला मुलाखत देतांना राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे राज्यातील चिनी कोरोनामुळे झालेल्या रुग्णांची मृत्यूसंख्या आणि रुग्णसंख्या लपविली नाही असे सांगतात. तर दुसरीकडे राज्य सरकार आपल्या मृत्यूसंख्येत मोठ्या प्रमाणावर आकडे जोडते हे कसे? इतकेच नाही तर आता रुग्ण संख्येत पण मोठ्या प्रमाणात आकडे वाढविल्या जात आहे, हा विरोधाभास नाही काय?
बरे हे या राज्यात पहिल्यांदा होत आहे का? तर नक्कीच नाही, या आधीही चिनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत वेगवेगळ्या पद्धतीने कोरोना संसर्गाने झालेले मृत्यू लपवण्याचा सरकारचा खटाटोप बाहेर आला होताच. अगदी चिनी कोविडमुळे रुग्णालयात झालेल्या मृत्यू नंतर पण मृत्यू प्रमाणपत्रात तशी नोंद न करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. अगदी तत्कालीन काळात संसर्गाचा "हॉट स्पॉट" ठरलेल्या मुंबईतील धरावी येथील शाहू नगर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या चिनी कोरोना मुळे झालेला मृत्यू पण मृत्यू प्रमानपत्रात हृदयगती बंद पडल्याने असा नोंदवण्यात आला होता. शेवटी दलातील सहकाऱ्यांनी उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने थेट गृहमंत्र्यांना जाब विचारल्यावर मृत्यू प्रमानपत्रात योग्य ते बदल करण्यात आले होते. आता राज्यातील चिनी कोरोना विरुद्ध लढाईतील शिलेदार अश्या शब्दात ज्यांचा गौरव केला जातो त्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बाबतीत शासन असे वागत असेल तर राज्यातील सामान्य नागरिकांची कशी बोळवण केल्या जात असेल याचा विचार केलेला बरा.
बाकी कोणत्या राज्याने कोणते आकडे किती वाढवले हे यावर बोलण्यापेक्षा आपल्या राज्यात का इतके कोरोना बळी संख्येत आले नाही याचा विचार नक्की करावा. देशातील इतर राज्यांपेक्षा आधुनिक राज्य, सुखसोईंनी युक्त राज्य असे आपल्या राज्याचे कौतुक करत असतांना अश्या पद्धतीने ११,६०० च्या वरती चिनी कोरोना मृत्यू आणि जवळपास ८० हजारच्या वरती रुग्णसंख्या वाढणे हे राज्याच्या लौकीकास बाधा आणणारे आहे हे नक्की. या सगळ्या प्रकाराकडे राज्य सरकार आणि प्रशासन सकारात्मक दृष्टीने बघत आवश्यक पावले उचलेल अशी अशाच आपण करू शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा