देशात कोरोनाची दुसरी लाटेने भयानक स्वरूप दाखवत असतांना, सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे भाजपा विरोधी पक्ष एकही संधी सोडत नाहीत. सध्या राजधानी दिल्लीत नवीन संसद भवन आणि परिसराला अत्याधुनिक, प्रशस्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतला आहे. त्याचे काम पण सुरू झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करतांना ही अत्याधुनिक आणि प्रशस्त वास्तू देशाला अर्पण करण्याची तयारी सुरू आहे. या सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून विरोधी पक्ष आता हातातील बांगड्या फोडून घेत आहे.
या अगोदर पण पंतप्रधानां करता घेतलेल्या विमानांवरून असेच आक्रादन या लोकांनी सुरू केले होते. मात्र पंतप्रधानांकरता घेतलेली विमाने आणि आता सुरू झालेला सेंट्रल विस्टा प्रकल्प या दोन्हीचे नियोजन खरे तर तत्कालीन मनमोहनसिंग सरकारच्याच काळात केल्या गेले होते, मात्र नेहमी प्रमाणे पैसे प्रकल्पात ओतण्यापेक्षा आपल्या घशात ओतायची सवय असल्यामुळे हे प्रकल्प रखडले होते, तेच आता पूर्ण होत आहे. बाकी राम मंदिर हे सरकारी पैशातून उभे केल्या जातच नाहीये म्हणून इथे त्याचा वाद हा फक्त हिंदू द्वेषातूनच उभ्या केला जात आहे. आता प्रश्न राहिला दवाखाने उभारण्याचा !
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) घोषित आणि सुरू केले आहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ज्यांना या एम्सचे निर्माते मानल्या जाते त्यांच्या कार्यकाळात फक्त एक एम्सचे निर्माण केल्या गेले ते पण १९५६ साली ! मात्र या दिल्लीतील एम्स नंतर मात्र भारताला सगळ्या दृष्टीने विकसित करणाऱ्या इंदिरा गांधी आणि देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचा दावा करणारे राजीव गांधी यांनी मात्र एकही एम्स उभारले नाही.
त्या नंतर मात्र भारतात वेगवेगळ्या ठिकाणी एम्स उभे करण्यासाठी भाजपा सरकारला सत्तेत यावे लागले. २००३ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांनी एकदम सहा एम्सची स्थापना भारतातील वेगवेगळ्या राज्यात केली. एम्स भोपाळ - मध्य प्रदेश, एम्स भुवनेश्वर - ओरिसा, एम्स जोधपूर - राजस्थान, एम्स पटना - बिहार, एम्स रायपूर - छत्तीसगड, एम्स ऋषिकेश - उत्तराखंड.
हे खरे की वाजपेयी सरकारने घोषणा केली आणि हे रुग्णालये उभारण्यासाठी पैशाची तजवीज केली तरी या रुग्णालयाचे काम तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात २०१२ साली सुरू झाले. मात्र या नंतर पुन्हा या सगळ्या आघाडीवर शांतताच होती.
या नंतर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात. एकदम चार एम्स उभारण्याची घोषणा केली. २०१४ साली गोरखपूर - उत्तरप्रदेश, नागपूर - महाराष्ट्र, मंगलगिरी - आंध्र प्रदेश, कल्याणी - पश्चिम बंगाल इतके. त्या नंतर २०१५ साली सहा एम्स उभारण्याची घोषणा केली, ती आहेत गृहत्ती - आसाम, जागा निश्चित न होता - बिहार, भटिंडा - पंजाब, सांबा - जम्मू काश्मीर, पुलवामा - जम्मू काश्मीर, मदुराई - तमिळनाडू, बिलासपूर - हिमाचल प्रदेश.
या नंतर २०१७ ला दोन, देवघर - झारखंड आणि जागा निश्चित न होता - गुजरात असे तर २०१८ साली बिविनगर - तेलंगणा. म्हणजे २०१४ पासून नरेंद्र मोदी सरकारने एकूण १३ एम्स उभारायचा संकल्प केला.
अर्थात वेगवेगळ्या वेळी केलेल्या या घोषणा एकदम पूर्ण होण्या सारख्या नाहीच आणि एम्स सारख्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पण एका दमात बांधकाम होऊन उभारल्या जाऊ शकत नाही. मात्र योग्य गतीने काम पूर्णत्वास नेता नक्कीच येते. पुन्हा या करता जमिन आणि बऱ्याच गोष्टीची पूर्तता करण्यात वेळ जातो.
या सगळ्या एम्सच्या घोषणांची सध्याची स्थिती काय? या करता कोणीतरी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. त्यावर सरकारने त्यांना जी माहिती उपलब्ध करून दिली त्या वरून आता विरोधक म्हणत आहेत की या फक्त घोषणा होत्या जनतेला प्रत्यक्षात हातात काहीही लागले नाही. आता विरोधक दाखवत असलेला रकाना खाली देत आहे. यात सरकारने कोणतीही लपवाछपवी न करता माहिती दिली आहे. या वरून विरोधक वरील खोटा प्रचार करत आहे.
मात्र खरे काय आहे?
तर मी प्रत्यक्षच देत आहे. खालील फोटो बघा.
१) एम्स नागपूर - महाराष्ट्र : इमारत उभी झाली आहे, बाह्य रुग्ण विभाग सुरू झाला आहे, इतकेच नाही तर कोविड काळात येथे कोविड सेंटर पण उभे राहिले आहे. नागपूर करांना योग्य सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. बाकी कामाचे वेळापत्रक कोविडमुळे बिघडले असले तरी, सुरू आहे.
२) एम्स गोरखपूर - उत्तर प्रदेश : इमारत उभी राहिली आहे. बाह्य रुग्ण विभाग सुरू झाला आहे.
३) एम्स मंगलगिरी - आंध्र प्रदेश: इमारत उभी राहिली आहे, बाह्य विभाग सुरू झाला आहे.
४) एम्स कल्याणी - पश्चिम बंगाल: इमारत उभी राहिली आहे, बाह्य विभाग सुरू झाला आहे.
५) एम्स भटिंडा - पंजाब: इमारत उभी राहिली आहे, बाह्य विभाग सुरू झाला आहे.
६) एम्स बिविनगर - तेलंगणा: इमारत उभी राहिली आहे, बाह्य रुग्ण विभाग लवकरच सुरू होणार किंवा झाला असेल.
७) एम्स बिलासपूर - हिमाचल प्रदेश: बांधकाम प्रगती पथावर, जवळपास अंतिम टप्प्यात
८) एम्स मदुराई - तामिळनाडू: बांधकामास सुरवात, सेवा द्यायला २०२२ पर्यंत वाट पहावी लागेल.
९) एम्स गुवाहाटी - आसाम: सरकारने या वर्षी जुलै मध्ये हे एम्स आपली सेवा सुरू करेल असे सांगत आहे, कदाचित इमारतीचे बांधकाम झाले असेल किंवा कोणत्या तरी वैकल्पित व्यवस्था केली असेल.
१०) एम्स देवघर - झारखंड: वैकल्पित जागेवरून काम सुरू, इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
अर्थात या सगळ्याच एम्सने आपल्या सेवा रुग्णांना द्यायला सुरुवात केली आहे. कोरोना काळात या एम्सने आपापल्या कार्यक्षेत्रातील रुग्णांना दिलासा दिला आहे. नागपूर विषयी जास्त लिहले कारण नागपूर एम्सचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. बाकीचे एम्सचे इंटनेटवर मिळालेल्या बातम्यांचा आधार आहे. फक्त इतकेच लक्षात घ्या, की हे सरकार फक्त घोषणा करत नाही तर त्या पूर्णत्वास पण नेते.....एम्स काही सुरू झालेत काही लवकरच सेवेत येतील हे नक्की !












टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा