धर्मनिरपेक्ष शब्दाचा आसरा घेत मुस्लिम तृष्टीकरण करणे हा काँग्रेसच्या राजकारणाचा भाग होता आणि आजही आहे. इकडे निवडणुका आल्या की शर्टावर जानवे चढवत काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी देशात मंदिर पर्यटन करत आपण किती हिंदू आहोत ते दाखवतात आणि दुसरीकडे ज्या राज्यात काँग्रेस सरकार आहे तेथे मात्र मुस्लिम तृष्टीकरण करतात.
आता पंजाबचे उदाहरण घ्या. अकाली दलाने भाजपाची साथ सोडली आणि केंद्राच्या नवीन शेतकरी कायद्या विरोधात आघाडी उघडली. काँग्रेस जरी या आंदोलनात सहभागी असला तरी या आंदोलनाचा राजकीय फायदा हा अकाली दलाला पंजाब मध्ये मिळणार आहे. त्यातच पंजाब काँग्रेसमध्ये पण सगळे काही व्यवस्थित नाही. पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदरसिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद तर स्वतः कडे राखले, मात्र या सगळ्यात स्वपक्षात पण स्वतःचे विरोधक उभे केले. आता यातून मार्ग कसा काढायचा?
तर मतांचे द्रुहीकरण करून..! काय केले पंजाबच्या काँग्रेस सरकारने? मुख्यमंत्री अरमिंदरसिंग यांनी शुक्रवार १४ मे २०२१ या दिवशी पंजाब मध्ये एका नवीन जिल्ह्याची घोषणा केली. निमित्य होते या दिवशी साजरा होणारा ईद उल फितरत हा सण ! आता नवीन जिल्हा घोषित करण्याचा आणि त्या दिवशी ईद असण्याचा काय संबंध ? तर हा संबंध असा की पंजाब मधील मलेरकोटला या भागाला जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. या करता या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची ही मागणी असल्याचे सांगितल्या गेले. हा भाग पहिले संगनूर जिल्यात येणारा हा भाग आता पंजाब राज्यातील नवीन तेविसवा जिल्हा झाला आहे. मात्र सांगितल्या गेले नाही ते हे की हा जिल्हा पंजाब प्रांतामधील एकमेव मुस्लिम बाहुल्य असलेला जिल्हा ठरला आहे. या जिल्ह्यात हिंदू लोकसंख्या आहे २०% शीख लोकसंख्या आहे ९% आणि बाकी लोकसंख्या मुस्लिम आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
आताच मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच तामिळनाडू मधील मुस्लिम बहुल गावात हिंदूंना आपले सण आणि धार्मिक मिरवणुका काढायला बंदी घाला, कारण या मुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, अश्या प्रकारची मागणी करणारी याचिका खारीज केली. ही याचिका खारीज करतांना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की ज्या भागात मुस्लिम जनसंख्या वाढते, त्या भागात इतर धर्माबाबत असहिष्णुतापण वाढीला लागते. आता या पार्श्वभूमीवर आपण ही जिल्हा निर्मिती बघायला हवी.
आता या जिल्ह्याची घोषणा करतांना पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदरसिंग यांनी या नवीन जिल्ह्याकरता भरभरून दिले. जिल्हा घोषित करतांना या जिल्ह्याला काय काय मिळाले ? या भागाचा स्वतंत्र इतिहास असल्यामुळे या भागाला जिल्हा घोषित केले गेले आहे. या नवीन जिल्ह्यात एक महिला महाविद्यालय, एक नवीन बस स्थानक, महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी वेगळी ५०० कोटींची तरतूद आणि महत्वाचे म्हणजे शेर महंमद खान यांच्या नावाने एक नवीन जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय.
अफगाण मधून आलेल्या शेख सरुद्दीन ए जहा यांनी मलेरकोटला या मुस्लिमबहुल शहराची स्थापना १४५४ साली केली आणि नंतर त्यांच्या वंशजांनी शेरवानी नावाने राज्य चालवले. सन १६०० मध्ये मलेरकोटला राज्य स्थापन करण्यात आले. १९४७ च्या धार्मिक हिंसेत हा भाग तुलनेने शांत राहिला होता.
मात्र आजची एकूण धार्मिक परिस्थिती बघता आणि पंजाब मधील शेतकरी आंदोलनाचा फायदा फुटीरतावादी ज्या पद्धतीने घेत आहेत त्या कडे बघता काँग्रेसला आताच या मुस्लिम बहुल जिल्ह्याच्या निर्मितीची खरेच गरज होती का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हे नक्की.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा