"हिंदू राष्ट्रवादा" ची भीती !



काय गंमत आहे ना, भारतात जे डाव्या विचारांच्या इतिहासावर पोसल्या गेलेले तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवी दलित हक्क आणि आदिवासी गटाची बाजू मांडतांना सतत "मूळ निवासी" असा शब्दप्रयोग करतात. यांचा अभ्यास असा सांगतो की भरताबाहेरून आलेल्या आर्यांनी येथील मूळ निवासी जनतेवर राज्य केले. या तथाकथित अभ्यासाला प्रामाण्य मानत मग अनेक येथील तथाकथित सवर्ण जातींना देशाबाहेर "युरेशियात" पाठवण्याची भाषा करतात. गंमत म्हणजे आपल्या धार्मिक आणि राजकीय फायद्यासाठी काही मुस्लिम संघटना पण या फोल अभ्यासाची बाजू घेत आपण या बाबतीत किती जागृत आहोत याचे ढोल पिटतात. 


मात्र आता फिलिस्तीनी मुस्लिम देश आणि ज्यू इस्रायल या दोघांच्या भांडणात मात्र हेच तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवी आणि इस्लामी फिलिस्तीनी मुस्लिमांची बाजू घेत आहे हे मात्र जास्त मनोरंजक आहे. बाबांनो इस्लाम जगात यायच्या जवळपास ६०० वर्षे अगोदर पासून त्या भूप्रदेशावर ज्यू धर्मीय राहात होते, इतकेच नाही तर पैगंबर मोहम्मद यांच्या मृत्यू नंतर ६४० ईसविसना पर्यंत तिथे इस्लाम पोहचला पण नव्हता. मग ज्यू धर्मीय त्या भागाचे "मूळ निवासी" नाहीत का? मग फिलिस्तीनी मुस्लिम यांनी याच हिशोबाने ती जागा सोडून दुसरीकडे राहायला जाणे श्रेयस्कर नाही का? 



बरे हे सोडून द्या, भारतात बंगलादेशी मुस्लिम, म्यानमार मधले रोहींग्या मुस्लिम सारख्या बाहेरच्या देशातील मुस्लिमांना शरण द्यावी अशी भारतातील प्रत्येक मुस्लिमांची आणि या तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवींची इच्छा असते. भारत सरकारने आणलेल्या CAA कायद्या मधील बदलाला विरोध फक्त याच करता होता की पाकिस्थान, अफगाण आणि बांगलादेश मधील हिंदूंना लगेच भारताचे नागरिकत्व मिळेल, मात्र मुस्लिमांना त्या करता बरीच मेहनत करावी लागेल. आसाम राज्यात होणाऱ्या NRC ला विरोध पण त्याच करता भारतातील मुस्लिम करत होते की त्या मुळे बंगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना त्रास होईल. जर भारतात अश्या मुस्लिमांना शरण देणे ही मानवता आहे. तर मग फिलिस्तीनमध्ये शरण घेणाऱ्या ज्यू धर्मियांना शरण देणे मानवता नाहीये का? त्या वरून इतके मोठे युद्ध करण्याची खरीच गरज आहे का? 


भारतात हे तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवी सतत वैविध्यपूर्ण संस्कृतीचे गोडवे गातात, देशातील तथाकथित गंगा-जमुनीं तहजीबच्या इतिहासाचे खरे खोटे दाखले देतात. मग आता फिलिस्तीनी मुस्लिमांना पण त्याच पद्धतीने ज्यू धर्मीयांसोबत गुण्यागोविंदाने राहण्याचा धडा का शिकवत नाही? 



सरळ आहे या प्रश्नांची उत्तरे भारतात "सेव्ह गाझा" चे टी शर्ट घालणारे देणार, ना हे उदारमतवादी आणि आज राज्यातील कोणत्यातरी बुद्रुक गावात बसून हातात आलेल्या स्मार्ट फोनचा वापर करत "वुई सपोर्ट फिलिस्तीन" चा हॅशटॅग चालवणारा मुस्लिम या प्रश्नांची उत्तरे देणार. खरेतर जगभरात अनुभव हाच आहे की याच तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवींच्या खांद्यावर बसून इस्लामी मुलतत्ववाद मोठा झाला, वाढला आणि जगभरात पसरला. मग तो देश फ्रांस, डेन्मार्क, जर्मनी असो की भारत "इस्लाम खतरे मे" ची बांग ऐकली की पहिले पाणी याच तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवींच्या डोळ्यात उभे राहते. मग फ्रांसच्या "लसीते" तत्वांपासून भारतातील "हिंदुत्वा" पर्यंत प्रत्येक शिकवणीत त्यांना प्रतिगामीपणा दिसून येतो. मग धार्मिक आधारावर झालेली भारताची फाळणी आणि काश्मीर मधील हिंदू आत्याचार पण त्यांना योग्यच वाटतो. मग इस्रायल बद्दल तसा विचार का केल्या जात नाही? 


याचे कारण आहे इस्रायलच्या मनात असलेल्या "ज्यू राष्ट्रवादात" कारण सध्यातरी संपूर्ण इस्लामी जगत भोवताली असतांना पण ज्यू लोकांचा हा देश टिकून आहे तो या "ज्यू राष्ट्रवादा" मुळे. इसवीसन ६२४ से ६२८ मुस्लिमांनी ज्यू धर्मियांना जिंकायचा अतोनात प्रयत्न केला. आजूबाजूचे प्रदेश इस्लामी झेंड्याखाली आल्यावर पण ज्यू धर्मीय आपला धर्म सोडायला तयार नव्हते. मग मार्ग अवलंबला गेला हिंसाचाराचा. या काळात लाखो ज्यू पुरुषांचे डोके धडावेगळे करण्यात आले, तर ज्यू धर्मीय महिला आणि बालकांना बजारात उभे केल्या गेले, विकल्या गेले. या अत्याचाराला कंटाळून अनेक ज्यू धर्मीय पळाले, जगभरात विखुरले. मात्र काही चिवट ज्यू धर्मीय मात्र अजून त्याच धर्तीवर मुस्लिम शासकांच्या अत्याचाराला तोंड देत जगले. केव्हा पर्यंत ? थेट दुसरे महायुद्ध संपे पर्यंत. 


खरेतर ज्यू धर्मीयांवर धार्मिक अत्याचार मुस्लिमांनीच केले असे नाही तर ख्रिश्चन देशात पण त्यांच्यावर धार्मिक अत्याचार होतच होते. या सगळ्या अत्याचाराला तोंड देत ज्यू धर्मीय आपले जीवन समोर नेत होते, आपल्या देशाची, संस्कृतीची, धर्माची आणि भाषेची जोपासना करत होते. 


मात्र दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केलेल्या अत्याचारानंतर मात्र ज्यू धर्मियांना प्रश्न पडला, "आपला देश नक्की कोणता?" या वर उत्तर त्यांच्याच धर्मग्रंथात मिळाले," दान आणि बिरशेवा दरम्यान, हमाथच्या प्रवेशद्वारापासून मिस्त्र नदीपर्यंत, जिच्या शेजारच्या सीनाय पर्वतावर, जिथे हजरत मूसाने दहा उपदेश दिले, जेरुसलेम ही इस्राएलची राजधानी आहे, म्हणजेच इस्राएलची भूमी! " या उपदेशाच्या आधाराने जगभरातील ज्यू धर्मीय एकत्र आले, आपले राष्ट्र उभे करण्यासाठी, आपल्या जमिनीवर अनेक शतके अत्याचार सहन करत असलेल्या आपल्या ज्यू धर्मीय बांधवांना सोबत घेत, जन्म झाला एका नवीन देशाचा इस्रायलचा, जन्म झाला नवीन राष्ट्रवादाचा "ज्यू राष्ट्रवादाचा" !


नेमके हेच जगभरातील मुस्लिमांच्या डोळ्यात खुपते, आजूबाजूला पक्के वैरी असलेले मुस्लिम देश एकत्र येऊनसुद्धा या "ज्यू राष्ट्रवादाचे" काहीही वाकडे करू शकले नाहीत. इतक्या वर्षात मुस्लिम भूमीवर राहून, त्यांचे अत्याचार सहन करून सुद्धा या लोकांना "ज्यू धर्माचा" त्याग करण्याची इच्छा झाली नाहीच, तर आपला देश पुन्हा उभा करण्याची प्रेरणा मिळाली आणि नाकावर टिचून उभा केला, जगला आणि वाढला. खरे दुखणे हे आहे. इस्रायल उभा राहिला मात्र तो देश कधीच डाव्या विचारांच्या मांडीवर जाऊन बसला नाही हा राग तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवींचा !


या एकाएकी समोर आलेल्या "ज्यू राष्ट्रवादाचा" अनुभव असा अनुभव घेऊनच कदाचित हे तथाकथित उदारमतवादी बुद्धिजीवी आणि मुस्लिम कट्टरतावादी भारतात वाढणाऱ्या "हिंदू राष्ट्रवादाला" इतका विरोध करतात. यांना सध्या एक "ज्यू राष्ट्रवाद" सांभाळता येत नाहीये, जो या मुस्लिम राष्ट्रांना जशास तसे उत्तर डोळ्यात डोळे घालून देत आहे, तेव्हा जगात अजून एक तसाच "हिंदू राष्ट्रवाद" जागा झाला तर ?

टिप्पण्या

  1. हिंदू जनजागृती,हिंदु राष्ट्रवाद जागा होणे हि केवळ भारतासाठी च नाही तर ती संपुर्ण विश्वासाठी आवष्यक आहे. मुस्लिम राष्ट्रवादा विरुद्ध जगातील बहुतांशी देश भारताच्या बाजुने, हिंदु राष्ट्र वादाच्या बाजुने उभे राहातील यात शंका वाटत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. हिंदु राष्ट्रवाद आधीपासूनच आहे पन, तो पुन्हा सुप्तवस्थेत गेलेला आहे..
    आता जर आपण हिंदुस्थान जागलो नाही तर आपण कायमचे मृतवस्थेत जाणार आहोत, हे निश्चित!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा