सध्या इस्रायल मध्ये पुन्हा फिलिस्तिनी मुस्लिम आणि इस्रायल संघर्ष उफाळून आला आहे. कारण आहे जेरुशेलम शहर ! आणि या संघर्षाचा केंद्र बिंदू आहे अल अक्सा मशीद ! काय प्रकरण आहे हे ?
याला संदर्भ आहे १९६७ चा. १९४८ साली फिलिस्तिनी युद्धा नंतर जेरुशेलम शहराला दोन भागात विभाजित केल्या गेले. पूर्व जेरुशेलम आणि पश्चिम जेरुशेलम. यातील पूर्व जेरुशेलम हा भाग मुस्लिम आणि इसाई बहुल होता जो जॉर्डन या देशाच्या अधिपत्याखाली आला आणि पश्चिमी जेरुशेलम इस्रायलायच्या. १९५० साली इस्रायलने पश्चिमी येरुशेलमला आपली राजधानी घोषित केली आणि त्या दृष्टीने शहराच्या पश्चिमी भागाचा विकास केला. सोबतच आपल्या संसदेत एक कायदा बनवत पश्चिमी येरुशेलम मध्ये स्थायिक असलेल्या अरबी फिलिस्तिनी मुस्लिमांना बळजबरीने पूर्वी जेरुशेलम मध्ये निर्वासित केले. हीच भूमिका जॉर्डनने पूर्व जेरुशेलम मध्ये ज्यू धर्मीय जनतेबद्दल घेतली.
या सगळ्या प्रकारावरून आणि जेरुशेलम सारख्या मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या शहरावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याच्या निमित्याने दोन्ही भागातून धुसफूस सुरूच होती. त्याचा विस्फोट ५ जून १९६७ साली झाला. या दिवशी जोर्डन, इजिप्त आणि सीरिया या तीन देशनसोबत इस्रायलचे युद्ध सुरू झाले. हे युद्ध जेमतेम सहा दिवस चालले. या सहा दिवसात इस्रायलने पूर्व येरुशेलम शहर आणि त्याला लागून असलेल्या परिसरावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. आपण ज्याला "वेस्ट बँक" म्हणून ओळखतो तो प्रदेश हाच. या सोबतच इजिप्तने गाझा पट्टी आणि सीनाई द्विपकल्प, तर सिरियाने गोलान टेकड्या या युद्धात गमावल्या. थोडक्यात या युद्धात जॉर्डन, सीरिया आणि इजिप्तचा सपशेल पराभव झाला. १० जून १९६७ साली हे युद्ध थांबले आणि संपूर्ण येरुशेलमचे एकत्रीकरण इस्रायल कडून करण्यात आले. मात्र आंतराष्ट्रीय समुदयाकडून या एकत्रिकरणाला कधीच मान्यता मिळाली नाही. तसेही वेस्ट बँक वर नियंत्रण ठेवणे हे इस्रायल करता पण कठीण गोष्ट ठरली. तरी १९८० साली इस्रायलने यरुशेलमच्या पूर्व आणि पश्चिम भागाचे एकत्रीकरण करण्याचे जाहीर केले, मात्र आंतराष्ट्रीय समुदायाने या निर्णयाला पाठींबा दिला नाही. सोबतच या शहराचा पूर्व आणि पश्चिम भागातील लोकसंख्या धार्मिक आधारावर तशीच राहिली.
मात्र हा सगळा इतिहास आता का ? कारण वर्तमान संघर्ष याच इतिहासाच्या पानावरुन सुरू झाला म्हणून. झाले असे की येरुशेलम वरती इस्रायलने मिळवलेल्या याच विजयाची आठवण म्हणून इस्रायल मधील राष्ट्रवादी ज्यू संघटनांनी एक आंदोलन करण्याचे ठरवले. या आंदोलनाला साहजिकच फिलिस्तिनी मुस्लिमांनी विरोध याचा विरोध केला. या मुस्लिमांनी पवित्र अल अक्सा मशीद परिसरात आपले शक्ती प्रदर्शन सुरू केले. साहजिक हिंसाचार उसळला आणि इस्रायली सुरक्षा रक्षकांनी मशीद परिसरात अश्रूधुर आणि गोळीबार करावा लागला. तर सध्या भारतातील बुद्रुक गावातील मुस्लिमा पासून मोठ्या शहरातील मुस्लिम मौलवीपर्यंत समाज माध्यमांवरून सध्या इस्रायल विरोधात जी आघाडी उघडलेली दिसत आहे त्याचे कारण हे सगळे प्रकरण आहे.
मात्र आज सगळे मुस्लिम या इस्रायली दादागिरी विरोधात पुन्हा एकत्र आले आहेत. इतिहासाचा विचार केला तर येरुशेलम शहर हे पैगंबर यांच्या संपूर्ण जीवनात खुणावत राहिले. ते त्याच्या दूरदर्शी विचारांचे प्रतीक राहिले. मुस्लिमांनी आज ज्याला आपण इराक आणि सीरिया म्हणून ओळखतो त्या भागावर नियंत्रण मिळवल्यावर ६४० ईसवीसनात जेरुशेलमवर मुस्लिमांनी कब्जा केला आणि नियंत्रणात आणले. मक्का, मदिना नंतर येरुशेलम मधील अल अक्सा मशीद महत्वाची ठरली ती या नंतर. आता या सगळ्या घटनाक्रमात तुम्हाला मुस्लिम मानसशास्त्र समजून घेण्याची गरज आहे.
मुस्लिमांचा नेहमीच आरोप राहिला आहे की इस्रायलने मुस्लिम प्रदेशावर आक्रमण करत आमची जमीन व्यापली. त्या करता जगभरातील मुस्लिम समाज नेहमीच आपला आवाज मोठा करत असतो. इतकेच नाही तर हाच आरोप भारतातील काश्मीर, चीन मधील उघुर आणि म्यानमार मधील रोहींग्या मुस्लिमाबद्दल पण केल्या जातो. आंतराष्ट्रीय समूहात या करता स्पष्ट शब्दात आवाज उठविल्या जातो. मात्र ऐतिहासिक सत्य काय? या कडे मात्र हेतुपुरस्पर कानाडोळा केला जातो.
बरे या सगळ्या मुस्लिम जनसंख्येवर होणाऱ्या कथित अत्याचारांवर गळे काढणाऱ्या मुस्लिम जनतेला एकदाही इराण, तुर्की परिसरात असलेल्या कुर्द समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवावा असे वाटले नाही, जी गत कुर्द समाजाची तीच यजीदि समूहाची, तीच गत पाकिस्थान मधील बलुच आणि अहमदिया समूहाची ! बाकी नुकताच आर्मेनिया मधील झालेला संघर्ष आपण कसा विसरणार?
एकूण प्रत्येक वेळेस आपण केलेली ऐतिहासिक कृत्य विसरून आणि मुस्लिमांशीवाय बाकी समूहाला दुय्यम दर्जा देत त्यांच्या वर होणाऱ्या अत्याचाराला दृष्टीआड करत आम्हीच कसे पीडित आहोत हे जगाला ओरडून सांगण्यात मुस्लिमांना धन्यता वाटते. कारण सरळ आहे की यात सध्या त्यांना फायदा दिसत आहे.
इकडे भारतात एका निवडणुकी नंतर एका राज्यात हिंदूंवर अत्याचार झाल्यावर, इतर राज्यातील हिंदू फक्त आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी चिडीचूप बसले असतांना, हिंदूंनाच दोष देत असतांना. इस्रायलच्या निमित्याने एकत्र येणारा जगभरातील मुस्लिम हा या हिंदूंच्या डोळ्यात खरेतर झणझणीत अंजन आहे.
मात्र त्या अंजनाने वेळीच काम केले असते तर ? आजचा दिवस बघावा लागला नसता हे पण सत्य आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा