महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुस्लिम समाजात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का कमी आहे असे सांगितले आणि नेहमी प्रमाणे काही लोकांना हे वक्तव्य चांगलेच लागले आहे.
गंमत अशी की तथाकथित पुरोगामी, सेक्युलर पक्ष असल्याचा दावा असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्याने हे वक्तव्य दिल्यामुळे राज्यातील तमाम पुरोगामी आपली मान जमिनीत घालून बसले आणि तथाकथित मुस्लिम अभ्यासकांच्या बुडाला आग लागली आहे. आज ते राष्ट्रवादी पक्षाला "कास्टवादी" असे म्हणत हीनवत आहे. मुख्य म्हणजे या अभ्यासकाला अजून एक काळजी लागली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांचे लसीकरण होत आहे की नाही.
तर या मुस्लिम अभ्यासकांनी त्याची काळजी करू नये. पहिली गोष्ट तर ही की देशाच्या कोणत्याही सरकारने काढलेल्या अश्या आरोग्यविषयक मोहिमांना संघाने कधीही विरोध केल्याचा इतिहास नाही, शक्यतोवर आपल्या कडून त्या मोहिमा यशस्वी कधी होईल या करता हातभारच लावला आहे.
जगभरात - देशात जेव्हा पोलिओ विरोधात लसीकरण मोहीम राबवल्या गेली तेव्हा त्यावर आक्षेप घेणारे, शंका घेणारे कोण होते? त्या मुळे देशातील पोलियो विरोधी "दो बुंद जिंदगी की" कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला, याला जवाबदार कोण होते?
जेव्हा भारतात कोरोना प्रादुर्भाव वाढत होता आणि केंद्र-राज्य सरकार कदाचित देशात संपूर्ण "लॉकडाऊन" लावावे लागेल असे वक्तव्य करत होते, देशात कलम १४४ लागू होत होते तेव्हा जगातील सगळ्यात मोठी सामाजिक संघटना असलेल्या संघाने सगळ्यात पहिले आपले सगळे जाहीर कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करत आपल्या स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातच राहण्याचा आदेश दिले होते. त्या मुळे देशात लॉकडाऊन लागल्यावर, "सरकारने एकाएकी "लॉक डाऊन" लावल्यामुळे आम्हला कार्यक्रम रद्द करण्याचा, आमच्या माणसांना घरी पाठवण्याचा वेळच नाही मिळाला." सारखे रडगाणे गावे लागले नाही.
अगदी या कोविड काळात जेव्हा देशातील विविध भागात विशेष समुदायाकडून आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत होते तेव्हा संघ कार्यकर्ते फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कोरोना विरोधात भारतातील तमाम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून करोना विरोधात लढत होते ही वस्तुस्थिती नाही का?
जेव्हा केंद्र सरकारने देशात कोविड लसीकरण करण्याची घोषणा केली तेव्हा त्या लसी विरोधात कोणत्या धार्मिक समूहाने आणि राजकीय विचारसरणीने त्या कार्यक्रमा विरोधी वक्तव्य केले? कोरोना लसी विरोधात कोणत्या समाजात अफवा पसरवल्या गेल्या? या सगळ्याचा एकत्रित परिणाम राज्यातील लसीकरणावर झाला नाही काय? मालेगाव सारख्या मुस्लिम बहुल शहरातील कोरोना लसी मोठ्या प्रमाणावर वाया गेल्या ही बातमीच बरेच काही सांगून जात नाही काय? कोरोनाच्या पहिल्या लाटेत पण याच शहरातून मुस्लिम धर्मियांनी सरकार सोबत पुकारलेल्या असहकाराच्या अनेक बातम्या वृत्तपत्रात आलेल्या होत्या हे सत्य नाही काय?
बाकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांनी सरकारने बनवलेल्या नियमानुसार लसीकरण मोहिमेत हातभार लावला. स्वतः लसीकरण करून घेतलेच सोबत इतरांना त्या करता प्रोत्साहित केले. याच भावनेने मुस्लिम समाजतील किती आदर्णीय महानुभावानांनी असे केले? या सगळ्यात फक्त ओवेसींनेच आपले लसीकरण करून घेतल्याचे छायाचित्र प्रदर्शित केले, मात्र इतर आपण आपल्या धर्माचे आणि धर्मियांचे ठेकेदारी घेतलेल्या किती मुल्ला मोलवींनी असे छायाचित्र प्रसिद्ध केले ? दुर्दैवाने भारतीय मुस्लिम समजात मोठ्या प्रमाणात धार्मिक पगडा आहे, समाजातील धार्मिक मुल्ला मौलवींचा साहजिकच मोठा प्रभाव मुस्लिम जनमानसावर आहे, यांच्यातील अनेक रोज कुराणातील आयाती समाज माध्यमांवर टाकत त्या बाबतीत खरे खोटे दावे हिरिरीने मांडत असतात, धार्मिक प्रचार हिरिरीने करत असतात, कोरोना काळात पण धार्मिक प्रचार करायला "अंधारातून प्रकाशाकडे" आणि "भेट मशिदीची" सारखे कार्यक्रम हिरिरीने चालवणाऱ्या या महाभागांनी एकदा तरी लसीकरणा बाबत सकारत्मक प्रतिसाद देत त्या पद्धतीने आपल्या धर्मियांना लसीकरण करण्याचे आवाहन केले काय?
प्रत्येक वेळेस छायाचित्र टाकणे म्हणजे चमकोगिरीच असते असे नसून, त्या छायाचित्र बघून इतरांना पण तशी कृती करण्याची उर्मी येते हे त्याचे महत्व असते. तेव्हा राजेश टोपे यांच्या वक्तव्याला धार्मिक टीका म्हणून न घेता, त्याचा सकारात्मक विचार करून या तथाकथित धार्मिक अभ्यासकांनी आणि नेत्यांनी योग्य पावले उचलत आपला कोरोना विरोधकातील लसीकरणात आपला टक्का वाढवावा.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा