जलो मत, बराबरी करो....!



खरे तर साधी सरळ पोस्ट होती ती, एका वृद्ध माणसाने आपल्या विवेकबुद्धीचा कौल घेत घेतलेल्या निर्णयाची ! पण त्या वृद्ध माणसाने घेतलेला निर्णय कमालीचा मानसिक ताकद असलेला माणूस पण घेऊ शकत नाही असा, म्हणून या समाज मध्यमावरील पोस्ट व्हायरल झाली आणि एका नवीन वाद उभा राहिला. आता वाद का? काय घडले होते?




नागपूरच्या वर्धा मार्गावर (शासकीय नाव पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग) असणाऱ्या सावित्री विहार येथील रहवासी असणारे नारायण दाभाडकर या ८५ वर्षीय काका, कोरोनाच्या विळख्यात अडकले. त्यांचा घरीच उपचार सुरू होता, मात्र त्याचे वय आणि सतत कमी होणारे प्राणवायूचे प्रमाण बघता त्यांच्या साठी दवाखान्यात बेड शोधायचे प्रयत्न सुरू होता. नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने कहर सुरू झाल्यापासून शहरातील सगळ्या रुग्णालयात औषधे, प्राणवायू सोबत आवश्यक बेडची पण कमकरता जाणवत आहे. एकेका रुग्णासाठी बेड शोधणे कठीण काम !



दाभाडकर काकांसाठी त्यांचे जावई बेड शोधत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. नागपूर महानगर पालिकेच्या कॉर्पोरेशन कॉलनी मध्ये येणाऱ्या, गांधी नगर चौकातील इंदिरा गांधी रुग्णालयात एक बेड उपलब्ध असल्याची माहिती कळली. त्याच बरोबर काकांना त्या रुग्णालयात नेण्यात आले. काकांना श्वास लागला होता पण ते पूर्ण शुद्धीवर होते. स्वतः एम्ब्युलन्स मधून उतरून ते दवाखान्यात चालत गेले. एडमिशनची प्रोसेस जावयानी केली आणि काकांना बेड मिळाला. एव्हाना काकांच्या नजरेस एक दाम्पत्य पडले, ज्यात चाळीशीत असलेल्या नवऱ्यासाठी त्याची बायको जीवाचे रान करत होती, रडत होती पण त्यांच्या साठी बेड काही उपलब्ध होत नव्हता. ते दृश्य बघून काकांनी आपल्याला मिळालेला बेड त्या बाईच्या नवऱ्याला देण्यास सांगितले. तिथे उपस्थित डॉक्टर आणि काकांच्या जावायांनी काकांचे मन वळवण्याचा भरपूर प्रयत्न केला, त्यांच्या जीवाला असलेला धोका सांगितला. त्यावर काकांनी उत्तर दिले, "मी ८५ चा आहे, माझे जे काही आयुष्य होते ते झाले आहे, ह्या तरुणाचे वाचणे जास्त महत्वाचे आहे, मला बेड नको तुम्ही ह्यांना द्या."



काय प्रेरणा असेल असा त्याग करण्यामागे? कोणती शिकवण असेल? कोणते संस्कार असतील? शेवटी काकांच्या आग्रहापुढे कोणाचे काही चालले नाही. घरच्यांनी महत्प्रयासाने मिळवलेला बेड त्या बाईच्या नवऱ्याला दिल्या गेला आणि काका पुन्हा घराकडे रवाना झाले. अपेक्षितपणे शांतपणे मृत्यूला सामोरे गेले. नेमके हेच होते त्या पोस्ट मध्ये. मात्र तरी या पोस्ट वरून वाद झाला? जनता प्रशासनाच्या विरोधात चिडली की आपण प्रत्येकाला साधा उपचार देऊ शकत नाही म्हणून वाद झाला का? तर नाही !



वाद झाला तो हे काका संघाचे स्वयंसेवक असल्याचा उल्लेख होता म्हणून ! वाद झाला काका एका भाजपा कार्यकर्तीचे वडील आहेत कळले म्हणून ! वाद झाला ही पोस्ट एका स्थानीय भाजपा नेत्याने लिहली म्हणून !





संपूर्ण पुरोगामी नंतर यावर आपले विचार मांडत ही कथा कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याच्या पाठी लागले. पुण्याच्या शिवराम ठावरे यांनी तर लगेच नागपुरातील इंदिरा गांधी रुग्णालयात फोन केला आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बोलून ही बातमी खोटी असल्याचे शिक्कामोर्तब पण केले, लोकसत्ताने लगेच या वरून एक बातमी बनवून आपल्या समाज माध्यमाच्या खात्यावर टाकली पण ! सोबतच अत्यंत नीच शब्दात या स्वर्गीय काकांच्या समर्पण भावनेची, संघाची आणि भाजपची खिल्ली उडवल्या गेली.



मात्र हे सगळे करतांना जे कधी नागपुरात आले नाही, ज्यांना कधी नागपूर बघितले नाही, ज्यांना नागपुरात किती दवाखाने आहेत, त्यांची नावे काय आहेत हे माहीत नाही असले येडे स्व. नारायण दाभाडकर काका यांच्या बातमीची चिकित्सा करत होते.

या येड्यांना हे माहीत नाहीये की, नागपुरात एक रुग्णालय आहे ज्याला नागपूरकर ओळखतात ओळखतात मेयो हॉस्पिटल म्हणून , मात्र त्याचे शासकीय नाव आहे "इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय" ! हे आहे नागपूर रेल्वे स्टेशनच्या पूर्व व्दाराच्या जवळ !

आता या शहरात नागपूर महानगर पालिकेची काही रुग्णालये आहेत. त्यातील एक रुग्णालय पश्चिम नागपुरातील कॉर्पोरेशन कॉलनीमध्ये येणारे जे गांधी नगर चौक म्हणजेच LAD चौकात आहे, नाव आहे "इंदिरा गांधी रुग्णालय" !

आता बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की नागपूर महानगर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात आणि हे चोगे फोन करत आहेत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ! आता काँग्रेसच्या काळात या दोन्ही रुग्णालयाचे नाव इंदिरा गांधी ठेवले यात चूक कोणाची? तर या येड्यांनी निदान फोन करायच्या आधी स्वतः तरी योग्य माहिती घ्यायची.

तरी या सगळ्या भांडणातील खरी गोम अशी की स्व. नारायण दाभाडकर काका हे संघ संबधीत असल्यामुळे सत्य पचवणे अनेकांना जड जात आहे. बाकी नागपुरातील लोकमतने बातमी केली. त्या बातमीत महानगर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय हरदास यांनी काकांच्या या मूलखावेगळ्या औदर्याची तारीफ करत घटनेची पुष्टी केली आहे. काँग्रेसी नेते दर्डा यांचे लोकमत हे वृत्तपत्र आहे. (होय तेच दर्डा, ज्यांनी परमवीरसिंग यांच्या बदली झाल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुलाखत ABP चे प्रसन्न जोशी यांच्या सोबत मिळून घेतली होती, ज्यात त्यांच्या कडून वदवून घेतले होते की परमविरसिंग यांना शिक्षाच दिल्याचे वदवून घेतले आणि नंतर लेटर बॉंब पडला) तर या वृत्तपत्राने संपूर्ण सत्य जाणून घेतच बातमी छापली आहे. मात्र नागपुरात निवासी संपादकासह पत्रकार आणि कार्यालय असलेल्या लोकसत्ताला मात्र खोडसाळपणा करणेच अंगात असलेल्या चाय बिस्कुट पत्रकारिका करण्याऱ्या लोकसत्ताला असे करणे नक्कीच जमले नाही.

तेव्हा येड्यांनो संघ विचारांची कावीळ झालेल्या मित्रांनो स्वतःवर इलाज करून घ्या, तुम्ही संपूर्णपणे मनोरुग्ण झाला आहात. लक्षात ठेवा "जलो मत, बरोबरी करो" !

टिप्पण्या