एकीकडे राज्यात देशात रेमडेसिविरचा काळाबाजार करत, नकली रेमडेसिविरच्या बाटल्या विकत या कठीण परिस्थितीत स्वतःच्या तुमडया भरणारी लोक बघून जीव कासावीस होत असतो. त्यात राजकारणी राजकारण करत उणीदुणी काढत आहे ते वेगळे, मात्र या सगळ्यात भरडली जाते ती जनता.
मात्र या सगळ्या गदारोळात काही बातम्या अश्या येतात ज्या जगात माणुसकी शिल्लक असल्याची जाणीव करून देतात.
पूर्वी हिंदी चित्रपटात एक संवाद असायचा की, "चोरो के भी अपने उसुल होते है।", चित्रपटात चोर दाखवलेल्या नायकचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न असायचा.
मात्र भारतातील हरियाणा राज्यातील चोर मात्र खरच "उसुलोवाले" निघाले! झाले असे की हरियाणातील एका दवाखान्यात चोरांनी चोरी करत काही खोके चोरून नेले. खोक्यात असलेला माल काळ्या बाजारात विकायचा आणि आपल्या पोटाची आग विझवायची असा नेहमीचा विचार.
चोरांनी घरी नेऊन ते खोके उघडले आणि त्यांना त्यात हीच रेमडेसिविरच्या कुप्या असल्याचे लक्षात आले. या सोबत त्यांना या औषधांच्या कमतरतेमुळे होणारे जनतेचे हाल जे वृत्तपत्रात, वृत्तवाहिन्यांवर दाखवत आहेत ते पण आठवले. या बरोबर आपल्या हातून चूक होत आहे हे पण त्यांना जाणवले.
शेवटी त्यांनी हातात असलेल्या रेमडेसिविरच्या जवळपास ७०० बाटल्या असलेले ते खोके या चोरांनी उचलले आणि सरळ पोलीस स्टेशन समोर नेऊन ठेवले. सोबत एक चिठ्ठी ठेवली,"सॉरी, कोरोना की दवा है, ये मालूम नही था।"
खरच "उसुलोवाले" चोर आहेत ना!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा