राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवर पश्चिम बंगाल मध्ये सभा घ्यायला वाढत्या कोरोना संसर्गाचे कारण देत नकार दिला त्याच बरोबर लगेच त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करणारे संदेश प्रसारीत व्हायला लागले. इतकेच नाही तर त्या कौतुकाच्या संदेशाची दखल काही मराठी वृत्तपत्रांनी अत्यंत त्वरेने घेतली.
मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार हेमंत ढोमे आणि दिगदर्शक समीर विध्वंस यात आघाडीवर होते. हेमंत ढोमे म्हणतात देशाला सध्या बेड, ऑक्सिजन आणि औषधांची गरज आहे हे राहुल गांधी यांच्या लक्षात आले, मात्र आपण त्यांच्यावर फक्त विनोद करू शकतो. तर समीर विध्वंस यांना राहुल गांधी जवाबदरीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे असे वाटते. पण खरेच तसे आहे?
खरे तर देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद सुरू केला तो नेमका तीन राज्यात ! त्यात महाराष्ट्र अग्रेसर होताच, मात्र त्या सोबत केरळ आणि तामिळनाडू ही राज्य पण महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा देत उभी होती. साधारण फेब्रुवारी २०२१ पासून या राज्यात कोविड प्रदूर्भावाची दुसरी लाट सुरू झाली. अनेक अभ्यासकांनी तेव्हाच ही दुसरी लाट थोपवायला जड जाईल अशी भाकिते सुरू केली होती. मार्च महिन्यातच त्याचा प्रत्यय या तीन राज्यांना तर आलाच, मात्र छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सुद्धा यायला सुरुवात झाली.
याच काळात आसाम आणि पश्चिम बंगाल सोबतच तामिळनाडू, पोंडेचेरी आणि केरळ मध्ये निवडणुका घोषित होत प्रचाराला सुरवात झाली होती. केरळ मध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सध्याच्या सत्ताधारी डाव्या पक्षांच्या आघाडी विरोधात लढा देत आहे. गेले महिनाभर राहुल गांधी वाढता कोविड प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत आपल्या पक्षाचा आणि आघाडीच्या मित्रपक्षाचा प्रचार करत आहे, केरळ, तामिळनाडू आणि पोंडेचेरी येथे रॅल्या, सभा घेत आहेत. तेव्हा राहुल गांधी यांच्या संवेदना कुठे गेल्या होत्या? हा प्रश्न मात्र कोणाला पडत नाही हे आश्चर्यच आहे.
काँग्रेसच्या एकूण प्रचाराच्या धोरणात राहुल गांधी यांच्या जास्तीजास्त सभा या दक्षिण भारतातच ठेवण्यात आल्या होत्या. तर आसाम प्रियांका गांधी बघत होत्या. मात्र पश्चिम बंगाल मध्ये हे भाऊ बहीण अजून फिरकले नव्हते कारण काय? तर कारण हेच होते की पश्चिम बंगालच्या राजकीय अवकाशात सगळी जागा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आणि ममता विरोधात आक्रमक प्रचार करणाऱ्या आणि पश्चिम बंगाल मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या म्हत्वाकांक्षेने पछाडलेल्या भाजपाने व्यापली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस आणि तिच्या सोबत आघाडीत असलेल्या डाव्या पक्षांना विशेषतः सी पी एमला जागाच उरली नाहीये. ना जनता विचारत आहे, ना वृत्तजगत यांची दखल घेत आहे. याचा अनुभव राहुल गांधी यांनी नुकतीच पश्चिम बंगाल मध्ये घेतलेल्या एकमेव सभेत राहुल गांधी यांना आला आणि त्यांची संवेदना एकाएकी जागृत झाली. नाहीतर केरळ मध्ये अगदी मास्क न घालता राहुल गांधी कोरोना प्रादुर्भाव वाढत असत्तांना प्रचार सभा घेत होतेच, विशेषतः मुलींच्या सभेत स्वसंरक्षणाचे प्रत्यक्षितही करून दाखवत होतेच की !
खर तर कोरोना काळात आलेल्या बिहार निवडणुकीच्या पर्शवभूमीवर राहुल गांधी यांची ही संवेदना दिसायला हवी होती. त्यावेळी भारतीय संविधानाने दिलेल्या कलम १५३ नुसार ती निवडणूक ६ महिन्यासाठी पुढे ढकलता आली असती. तसे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. याचा वापर सर्वप्रथम तामिळनाडू राज्यात स्व. राहुल गांधी यांची हत्या झाल्यानंतर चार महिने निवडणूक पुढे ढकलून झालाच आहे. मात्र निवडणूक आयोगाने तेव्हा तसे केले असते तर भारताची लोकशाही केंद्रात सत्तेत असलेल्या हुकूमशाही वृत्तीच्या भाजपाच्या इशाऱ्यावर आयोग नाचत आहे असा आरोप करत देशभरात धुरळा उडवला असता. मग याच कलाकारांनी भारतातील लोकशाहिवर आपल्या मार्मिक टिपण्या पण केल्या असत्या.
इतकेच नाही तर तत्कालीन काळात आयोगाने सगळ्याच राजकीय पक्षांना बिहार मध्ये प्रत्यक्ष प्रचार न करता आधुनिक पद्धतीने, व्हर्च्युअल प्रचार करावा अशी विनंती केली होती. मात्र काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी ही विनंती अव्हेरली, पुन्हा भाजपच्या मजबूत आय टी सेल मुळे आयोगाच्या या विनंतीचा फायदा भाजपला होईल असा आरोप पण केला होता. तेव्हा राहुल गांधी यांच्या संवेदना नक्की कुठे गेल्या होत्या?
तेव्हा या सगळ्या चाय बिस्कुट पत्रकारांनी आणि भारलेल्या कलाकारांनी इतकेच लक्षात घ्यावे की, राहुल बाबावर विनोद करावा लागतो तो त्याच्या अश्या विरोधाभासी वागण्यामुळे ! राहुल गांधी यांचे सभा न घेण्याचा निर्णय तद्दन "सौ चुहे खा के बिल्ली हज को चली" सारखे आहे रे भावांनो !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा