१८० किलोमीटर ७ तास - कोरोना वॉरियर



प्रज्ञा घरडे ! नावाने आपल्या मनात काय भावना येतात? काय कर्तृत्व असेल या नावामागे? मात्र आपल्याला हेच नाव या पद्धतीने सांगितले तर डॉ. प्रज्ञा घरडे! वाढत्या कोविड संसर्गात वैद्यकीय व्यवसाय करणारे आपली तहान भूक विसरून दिवसरात्र रुग्ण सेवा करत आहेत. तेव्हा या संपूर्ण नावामागील कर्तृत्व आपण वैद्यकीय कर्तृत्व आपण लक्षात घेऊच, मात्र या डॉ. प्रज्ञा घरडे यांनी आपल्या वैद्यकीय सेवेसाठी अजून एक धाडस केले त्याची नोंद आपल्याला घ्यावीच लागेल. विशेषतः महाराष्ट्राने आणि नागपूर शहराने !


डॉ. प्रज्ञा घरडे नागपुरातील एका खाजगी दवाखान्यात कोविड वार्ड मध्ये ६ तास सकाळी तर रात्र पाळीत दुसऱ्या दवाखान्यात पुन्हा ६ तास सेवा देत आहे. म्हणजे पूर्ण मिळून ती १२ तास PPE किट घालून वैद्यकिय सेवा देत आहे. मात्र इतकेच यांचे कर्तृत्व नाही. 


एप्रिल मध्ये जेव्हा राज्यात - नागपुरात कोविड संसर्ग वाढायला लागला तेव्हा डॉ प्रज्ञा घरडे आपल्या जन्मगावी मध्यप्रदेशातील बालाघाट येथे सुट्टीवर गेल्या होत्या. मात्र नागपुरातील बिघडत चाललेल्या कोविड परिस्थितीच्या बातम्यांनी त्यांना अस्वस्थ केले. तेव्हा सुट्टी अर्थवट सोडून त्यांनी नागपुरात पुन्हा आपल्या कामावर रुजू व्हायचे ठरवले. 


मात्र या करता मोठी समस्या उभी राहिली वाहतुकीची ! नागपूर आणि मध्य प्रदेशची सीमा सील केल्या गेली, त्या मुळे या मार्गावर सुरू असलेल्या शासकीय आणि खाजगी प्रवासी वाहतूक संपूर्णपणे थांबवण्यात आलेली. याच कारणाने डॉ प्रज्ञा घरडे यांना नागपुरात पुन्हा आपल्या सेवेत कसे रुजू व्हायचे हा प्रश्न उभा राहिला. या वर मार्ग काढत, त्यांनी आपल्या स्कुटीने बालाघाट ते नागपूर हा जवळपास १८० किलोमीटरचा प्रवास करायचे ठरवले. त्याच्या घरचे या कल्पनेला अनुकूल नव्हते, कारण ओस पडलेले रस्ते, जंगलातून जाणारा रस्ता, मध्य भारतातील प्रचंड ऊन आणि ही एकटी महिला असे अनेक समस्या घरून उभ्या करण्यात आल्या. मात्र डॉ प्रज्ञा घरडे यांचा निर्धार बघता शेवटी घरच्यांनी मान्यता दिली. 


शेवटी बालाघाट ते नागपूर १८० किलोमीटरचा प्रवास ७ तासात पूर्ण करत डॉ. प्रज्ञा घरडे वैद्यकीय सेवा द्यायला नागपुरात हजर झाल्या. लॉक डाऊन मुळे बंद असलेली दुकाने, खान्यापिण्याचे झालेले हाल, कडक ऊन आणि गर्मी हे सगळे सहन करत डॉ प्रज्ञा यांनी हा प्रवास पूर्ण केला. 


आपल्या कामप्रति निष्ठा दाखवणाऱ्या डॉ प्रज्ञा घरडे यांचे आपण कौतुक नक्कीच केले पाहिजे.

टिप्पण्या