आम्हाला हे पण नको आणि ते पण!




हिंदू एकजूट होण्याच्या मार्गात दोन प्रकारचे हिंदुत्ववादी नेमकेपणाने पायातील दगड ठरतात. एक जे मुस्लिमांची मानसिकता दाखवण्याच्या नादात उल्हासत काहींच्या काही वक्तव्ये करतात आणि दुसरे जे हिंदू संस्कृती



च्या नावाने मुस्लिम धर्मियांना मिळणारे धार्मिक शिक्षण आणि त्यांची त्या मुळे तयार होणारी मानसिकता या कडे दुर्लक्ष करत, हिंदू मुस्लिम एकतेचे विचित्र स्वप्न बघतात.


उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्यातील डसना येथे मंदिरात पाणी प्यायला आला म्हणून मारहाण केल्याची देशभरात आवळी उठवल्या गेली. देशभरातील तमाम लिब्रांडु, तथाकथित सर्वधर्मसमभाववाले हिंदुत्वद्वेषी पत्रकारांची तिकडे नजर नसती वळली तर नवल वाटले असते. रिवाजा प्रमाणे डसना येथील मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्या रूपाने देशाला नवीन कट्टर हिंदुत्ववादी खलनायक मिळाला होता आणि त्या खलनायकाचा चेहरा संपूर्ण देशासमोर उघड करायच्या मनसुब्याने सगळे लिब्रांडु पत्रकार डसना कडे धावायला लागले. 


प्रिंट, वायर या तद्दन हिंदूव्देष्टी पत्रकारांनी त्यांना उघडे पडायच्या निमित्याने मुलाखत घेतली. मात्र झाले उलटेच ! मुस्लिम मुलाला मारण्याची चलफित समाज माध्यमांवर फिरायला लागल्यावर एक वादळ तयार झाले होते. मंदिरात पाणी प्यायला आला म्हणून एका विधर्मी मुलास मारहाण झालेली हिंदूंच्या गळी पण उतरत नव्हती. तहानलेल्याची तहाण भागवणे ही हिंदू धर्माची शिकवणच जे पाळल्या जात नाही तेथे कुठले हिंदुत्व? या विचाराने व्यथित झालेले हिंदू, आत्मग्लानीत या घटनेवर दोन दिवस शांतच होते. 


मग आली ही मुलाखत ! ज्यात महंत महाराजांनी उत्तर प्रदेशात गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या पण याच लिब्रांडु पत्रकारांपाई राष्ट्रीय पटलावरून लोप पावलेल्या समस्येला समोर आणले. काय होती समस्या? समस्या होती हिंदू पलानयाची आणि अल्पसंख्यांक हिंदूंना होणाऱ्या धार्मिक त्रासाची ! उत्तर प्रदेशातील कैराना, मेरठ, गजियाबाद सारख्या जिल्ह्यातील काही गावात मुस्लिम लोकसंख्या ९५℅ झाली आहे. आता या गावातील हिंदू परिवाराला त्या मुळे धार्मिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या त्रासाला कंटाळून अनेक हिंदू तेथून पलायन करीत आहे. डसना हे पण या त्रासात होरपळणारे एक गाव ! या गावातील देवीचे प्राचीन मंदिरात येनाऱ्या महिला भविकासोबत छेडखणी करणे, मंदिरातील देवी देवतांच्या मूर्तीची विटंबना करणे हा या मुस्लिम मुलांचा आवडता खेळ. त्यांना हटकले, रागावले तर अंगावर येणारा गावातील मुस्लिम समाज. या सगळ्या प्रताडनेला महंत महाराजांनी त्या मुलाखतीत बाहेर आणले. पुन्हा तो मुलगा फक्त पाणी पिण्यासाठी मंदिरात आला हे कसे खोटे आहे हे पुराव्यानिशी या मुलाखतीत स्पष्ट केले. मंदिराच्या दरवाज्या बाहेर दोनशे मीटरवर रस्त्याच्या पलीकडे लावलेला हातपंप, बाजूला असलेल्या नगर पालिकेच्या इमारतीत असलेली पिण्याच्या पाण्याची सोय सोडून हा मुलगा मंदिर परिसरात, ते पण जिथे पाणी आहे तो भाग सोडून इतरत्र कसा हिंडत होता आणि त्याने देवाची विटंबना कशी केली हे सांगितले. 


या मुलाखतीमुळे एका रात्रीत महंत नरसिंहानंद सरस्वती यांना देशभरात प्रसिद्धी तर मिळालीच पण त्यांच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांना बऱ्याचअंशी समर्थन पण प्राप्त झाले. त्यांना फसवायकरता आलेले लिंब्रांडू पत्रकार स्वतःच जाळ्यात अडकले. मात्र ही प्रसिद्धी आणि समर्थन महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्या पचनी पडले नाही. त्याच मुळे त्यांनी अलिगढ येथे पत्रकारांना संबोधित करतांना भारताचे महान शास्त्रज्ञ, ज्यांनी देशाला अणुशक्ती आणि अंतराळ शक्ती बनवायला आपले जीवन अर्पण केले, देशाचे माजी राष्ट्रपती स्व. अब्दुल कलाम यांना पण फक्त त्यांचा धर्म मुस्लिम आहे म्हणून जिहादी वगैरे दूषणे लावली. हे सर्वथा मूर्खपणाचे आणि रेम्या डोक्याचे विचार आहेत. 


अश्याच रेम्या विचारांच्या निर्मितीमुळे आधीच गर्तेत असलेली हिंदुत्ववादी विचारधारा अजून गर्तेत जाईल. असल्या वक्तव्याचा फायदा तर या महंत महाराजांना होणार तर नाहीच, उलट जे समर्थन सर्वसामान्य हिंदू जनतेकडून मिळत होते ते पण मिळणार नाही. याचा परिणाम उत्तर प्रदेशातील अल्पसंख्य हिंदू झालेल्या गावातील हिंदूंच्या समस्या देश पटलावर यायचा मार्ग बंद होत, त्यांच्या समस्येत वाढच होईल हे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी लक्षात घ्यायला हवे होते. 



असे रेम्या डोक्याचे वक्तव्य करणारे जितके हिंदुत्ववादी विचारांचे नुकसान करते तितकेच नुकसान हिंदू मुस्लिम एकतेच्या स्वप्नात मश्गुल असणारे हिंदुत्ववादी पण करतात. मग त्या करता इस्लाम धर्मातील शिकवण, कुराण मधील आयाती, इतिहासातील अनुभव सगळे बाजूला सारून लगेच प्रभू श्रीरामाला दिलेली दुय्यम पदवी पण आनंदाने मान्य करतात आणि इतर हिंदूंच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. इंडोअशिया मधील इस्लामी मानसिकता, शिकवण आणि भारतातील  इस्लामी मानसिकता, शिकवण पुरेशी भिन्न आहे याचा विसर या वेळी पडतो. हा देश जगातील कदाचित एकमेव देश आहे जिथे इस्लामने तलवारीच्या जोरावर नाही तर लोकांची मने जिंकून धर्माचा प्रसार केला. त्या मुळे तेथील इस्लामी मानसिकता वेगळी आहे. मात्र आता तिथेपण फिलिपिन्स, मलेशिया आणि खुद्द भारतातून तथाकथित इस्लामी अभ्यासक जाऊन कट्टरता वाढवत आहेत. या उलट भारतात इस्लाम आला तो तलवारीच्या जोरावर, पसरला तो हिंदूंवर राज्य करत, सोबतच भारतात जगभरातील इस्लामला तथाकथित पणे दिशा देणाऱ्या अभ्यासाची दोन प्रमुख केंद्रे आहेत. या सगळ्या पर्शवभूमीवर भारतात इंडोअशियन देशासरखा गत सांस्कृतिक वारस्याचा अभिमान बाळगणारा इस्लाम येणे कठीणच ! पण याचा विचार न करता, इस्लामच्या भारतीय मानसिकतेचा अभ्यास न करता इस्लामला भारतीय हिंदू संस्कृतीच्या चौकटीत बसवण्याचा फाजीलपणा करत हे पण आपले समर्थन कमी करत राहतात. 


तेव्हा असा दोन्ही प्रकारच्या रेम्या डोक्याच्या हिंदुत्ववाद्यांनी वेळीच जागे होत लवकरात लवकर स्वतःचा वैचारिक विकास करून घ्यावा. नाहीतर आज अथक प्रयत्नांनी उत्कर्षाला पोहचलेली, सत्तेत आलेली हिंदुत्ववादी विचारधारा पुन्हा पहिले सारखी कोमात जायला वेळ लागणार नाही.

टिप्पण्या