उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैराना लक्षात आहे का तुमच्या ? साधारण २०१६ मध्ये भाजपा खासदार हुकूमसिंग यांनी कैराना भागातील हिंदू भीतीपोटी येथून पलायन करत आहे असा आरोप केला होता आणि राष्ट्रीय स्थरावर हा मुद्दा गरम झाला होता.
हुकूमसिंग यांनी आरोप केला होता की शामली जिल्ह्यातील कैराना येथे मुस्लिम लोकसंख्या अनेक वर्षांपासून वाढती राहिली आहे. या भागात गेल्या काही वर्षात हिंदू अल्पसंख्यांक झालेत. त्याचा परिणाम म्हणून हिंदूंना धार्मिक आणि सामाजिक प्रताडणा सहन करावी लागत होती. आता तर ही भीती आणि दहशत इतकी वाढली आहे की हिंदू कैराना सोडून इतर हिंदू बहुल भागात आश्रय घेत आहेत. आपली लाखोंची अचल संपत्ती कैराना येथे रिकामी ठेवत, हिंदूंना परदेशातील हिंदू बहुल भागात झोपडीत आश्रय घ्यावा लागत आहे.
तत्कालीन सत्ताधारी समाजवादी पक्षाने हा आरोप फेटाळून लावला होता, त्याला साथ द्यायला काँग्रेस सारखे सेक्युलर पक्ष सोबत आले होते. प्रिंट, क्विंट, वायर, एन डी टी व्ही, बीबीसी ही सगळी माध्यमे हुकूमसिंग यांनी मांडलेली माहिती कशी खोटी आहे, याचे दाखले द्यायला लागले होते. या सगळ्यांनी तथाकथित "ग्राउंड रिपोर्ट्स" च्या नावाखाली वेगवेगळे सिद्धांत हिंदू कैराना सोडून का जात आहे या करता मांडले. त्यातील एक सिद्धांत प्रत्येक माध्यमांनी आवडीने मांडला, तो म्हणजे आर्थिक समस्या ! कैराना येथे हिंदूंना कामधंद्यातून पैसे मिळत नसल्याने आपल्या उज्वल भविष्यासाठी हिंदू कैराना सोडून जात आहे, या मागे कोणताही धार्मिक अत्याचार किंवा सामाजिक अत्याचार कारणीभूत नाही.
अगदी या सगळ्या सेक्युलर पक्षांनी, माध्यमांनी हा सिद्धांत उचलून धरला होता. मात्र तेव्हा काय किंवा आता काय कोणीही असा प्रश्न उपस्थित केला नाही की, मग कैरणातील आर्थिक प्रश्न फक्त हिंदूं समोरच का उभा आहे, मुस्लिमांसमोर का नाही? पण या समस्येचा प्रचार असा केल्या गेला की कैराना येथे धार्मिक समस्या नसून आर्थिक समस्या आहे आणि भाजपाला या समस्येला वेगळे रूप देत यातून आपली राजकीय पोळी भाजायची आहे. पुढे ही बातमी इतर बतम्यांसारखी विरून गेली. या समस्येला जगापुढे आणणारे भाजपाचे खासदार हुकूमसिंग यांचा मृत्यू झाला.
मग उत्तर प्रदेशातील कैरानाच्या या जागे करता मध्यावधी निवडणूक घेतल्या गेली. ३१ मे २०१८ रोजी या निवडणुकीचा निकाल आला. ही जागा जिंकली राष्ट्रीय लोक दल या पक्षा कडून उभ्या असलेल्या बेगम तबस्सून हसन यांनी आणि आपण ही निवडणूक जिंकत खासदार झालो या आनंदात त्यांनी मतदातांचे आभार मानत एक पोस्ट समाज माध्यमांवर टाकली "यह अल्लाह की जित और राम की हार है" ! अर्थात २०१९ मध्ये कैराना निवडणुकीत पुन्हा भाजपा जिंकली. अजूनही तेथे अधून मधून हा हिंदू पलायनचा वाद समोर येत आहे. पळून गेलेले हिंदू वापस येत नाहीये. त्यांची घर रिकामी आहेत किंवा विकण्याच्या तयारीत आहे. पण हा प्रश्न फक्त कैराना या एका ठिकाणाचा नाही, संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशात कमी अधिक प्रमाणात हीच समस्या असल्याचे बोलले जाते. मेरठ, शामली, गाझियाबाद हा भाग याच पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग.
आता डसना या गाझियाबाद जिल्ह्यातील घटना. पाणी पिण्यासाठी मंदिरात आला म्हणून मुस्लिम अल्पवयीन मुलाला झालेली मारहाण आणि त्या पाई होणारा विवादकडे बघतांना या भागातील वर सांगितलेल्या इतिहासाला विसरू नका. मुख्यतः हे लक्षात घ्या की हा सगळा भाग मुस्लिम बाहुल्याचा आहे. या मंदिराच्या प्रवेशव्दारावर जे भक्कम लोखंडी जाळीचे आहे त्या वर ठळक अक्षरात "मुस्लिमांना यायला मज्जाव आहे" असा फलक लावला आहे. या मंदिर परिसराच्या पुजारी किंवा महंत याचे बोलणे लक्षात घेतले तर हा फलक गेल्या १०-१५ वर्षा पासून लागलेला आहे. याचे कारण मंदिराच्या आसपास राहणारे मुस्लिम पोर मंदिर परिसरात येत दर्शनाला येणाऱ्या महिला आणि मुलींना छेडतात, मंदिर परिसरात चोरी करतात आणि महत्वाचे म्हणजे मंदिर परिसरातील देवांच्या मूर्तींची अप्रतिष्ठा करतात. या मुळे पहिले मंदिराच्या प्रवेशव्दाराला भक्कम जाळी लावण्यात आली, नंतर हा फलक लावण्यात आला.
आता पोराला लागलेली तहान भागवण्यासाठी गेलेला होता हे गृहीत धरले तरी, मंदिर प्रवेशव्दाराच्या बाहेर सार्वजनिक सरकारी हापशी लावलेली आहे, बरे प्रवेशद्वार ओलांडून आत आल्याबरोबर प्रवेशद्वाराच्या बाजूला पाण्याची व्यवस्था आहे. जवळपास अशी व्यवस्था सगळ्या मंदिरात असते, पाय धुवून मग मंदिरात जाणे या करता. मात्र पाण्याच्या या दोन्ही व्यवस्था सोडून हा पोरगा मंदिरात नक्की कोणत्या तहानेने व्याकुळ होऊन पोहचला होता हे काही लक्षात आले नाही.
नक्कीच पाणी प्यायला मंदिरात आला म्हणून मारहाण करणे चुकीचे आहे त्याचा निषेध व्यक्त करायला हवा, मात्र त्या पोराची तथाकथित तहान फक्त पाण्याचीच होती का? हा प्रश्न पण महत्वाचा आहे. बाकी भारतातील माध्यमांना हिंदूंवर गरळ ओकायला एक नवीन प्रकरण हातात लागले आहे.
मात्र तुम्ही तरी जागे रहा, या भागाचा मागील इतिहास, त्या भागातील धार्मिक संघर्ष, त्या भागातील सामाजिक स्थिती लक्षात घ्या आणि मग निष्कर्ष काढा. आपण काश्मीर विसरलो, कैराना दिसले नाही, आता या प्रकरणाची कारणे पण समजून घेणार नाही तर मग हातात काही राहणार नाही...... बाकी आपण भारताचा "इमाम ए हिंद" कोण यावर वादविवाद करत राहू.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा