"इमाम ए हिंद" किती उपयोगी?

 


कन्हैय्यालाल सप्रू नावाचे काश्मिरी पंडित जे पंजाब मधील सियालकोट येथे स्थायिक झाले. त्याचे पुत्र रतनलाल सप्रू यांनी इस्लाम कबूल केला आणि बनले अहमदीया पंथातील नूर मोहम्मद त्याचाच ९ नोव्हेंबर १८७७ ला जन्मलेला पुत्र म्हणजे मुहम्मद इकबाल मसुदी !


कोण आहेत हे माहीत आहे? हे तेच आहे ज्यांनी प्रभू श्रीरामाला "इमाम-ए-हिंद" म्हणत त्यांचा "गौरव" केला. याच अलम्मा म्हणजे विद्वान मुहम्मद इकबाल मसुदी यांनी आपल्या एका कवितेत प्रभू श्रीराम यांचे वर्णन करतांना केलेले हे वर्णन !

लबरेज़ है शराब-ए-हक़ीक़त से जाम-ए-हिन्द
सब फ़लसफ़ी हैं खि़त्त-ए-मग़रिब के राम-ए-हिन्द

ये हिन्दियों के फि़क्र-ए-फ़लक रस का है असर
रिफ़त में आसमाँ से भी ऊँचा है बाम-ए‍-हिन्द

इस देस में हुए हैं हज़ारों मलक सरिश्त
मशहूर जिन के दम से है दुनिया में नाम-ए-हिन्द है

राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज
अहल-ए-नज़र समझते हैं इस को इमाम-ए-हिन्द

एजाज़ इस चिराग़-ए-हिदायत का है यही
रोशन तर अज सहर है ज़माने में शाम-ए-हिन्द

तलवार का धनी था, शुजाअत में फ़र्द था
पाकिज़गी में, जोश-ए-मोहब्बत में फ़र्द था

ही कविता त्यांच्या १९०४ साली लिहलेल्या "बांग ए दारा" या पुस्तकातील, याच पुस्तकात असलेली "तराणा ए हिंद" म्हणजेच "सारे जहा से अच्छा हिंदूस्ता हमारा" ही कविता आपल्याला चांगल्याच परिचयाची आहे.

आता हे अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी हे वकील, तत्वज्ञ, कवी आणि मुस्लिम नेता होते. त्यांनी प्रभू श्री रामाला "इमाम ए हिंद" म्हणणे ही मोठी गोष्ट असली तरी त्यामागे पण बराच विचार होता आणि अर्थात तो विचार होता इस्लामचा ! आपल्या पेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही, आपला देव एकमेव त्या समोर कोणीही देव नाही हे तत्वज्ञान मांडणाऱ्या इस्लाम मधील एक विद्वान अभ्यासक प्रभू श्रीरामाला "इमाम ए हिंद" म्हणाला, तेव्हा तत्कालीन "गंगा जमुनीं तहजीब" च्या नादी लागलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू मुस्लिम ऐकता अत्यंत गरजेची आहे हे मनात धरून भारतीय मुस्लिमांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेल्या खिलापत सोबत जोडून भारतातील खिलापत चळवळीला पाठींबा देणाऱ्या, त्या खिलापत चळवळीमुळे केरळ मध्ये मोपल्यांच्या बंडात हिंदूंच्या प्राणहानीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तथाकथित सर्वधर्मसमानवाल्या आपल्या जन्माने हिंदू नेत्यांनी या कवितेला आणि त्यातील प्रभू श्रीरामाला मिळालेल्या नवीन पदवीला चांगलेच उचलून धरले. त्या काळात हे तत्वज्ञ, कवी असलेले अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी हे "गंगा जमुनीं तहजीब" चे महत्वाचे शिलेदार म्हणून समोर आले.

अर्थात ही गोष्ट मान्य करायला काहीच हरकत नाही की तत्कालीन काळात जिथे मुस्लिम कधीही दुसऱ्या धर्माला मान्यता द्यायला तयार नव्हते तेव्हा दुसऱ्या धर्मातील एका देवाला "इमाम ए हिंद" ही पदवी देत होते. या प्रकारे मुस्लिम हळू हळू इतर धर्मियांना आपल्या बरोबरीत बसवतील ही अपेक्षा ठेवत या पदवीचे कौतुक झाले. याला अजून एक कारण होते. याच काळात प्रसिद्ध "वंदेमातरम" या बंकीमचंद्र चॅटर्जी यांचे गीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे गीत झाले होते. इंग्रजांनी या गीतावर बंदी आणली होती आणि काँग्रेसने या गीताला जवळपास राष्ट्रगीताचा दर्जा दिला होता. मात्र १९२३ च्या काँग्रेस अधिवेशनात तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष महंमद अली यांनी "वंदे मातरम" ला आपल्या धार्मिक भावना दुखावल्या जातात हे कारण देत "वंदे मातरम" गीत गण्यास विरोध केला. "वंदे मातरम" इस्लाम विरोधी असून यात मूर्तिपूजेचे समर्थन आहे असा त्यांचा दावा होता. काँग्रेसने पण मग १९३७ च्या अधिवेशनात संपूर्ण "वंदे मातरम" म्हणण्या ऐवजी या गाण्याचे पहिले दोनच कडवे म्हणण्याचे ठरवले आणि वादावर पडदा टाकला.



अर्थात या सगळ्यांच्या मागे काँग्रेसने खिलापत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि त्या योगे भारतीय सामान्य मुस्लिमांना जागतिक "इस्लामी उम्मा" सोबत करून दिलेली ओळख कारणीभूत ठरली हे कोणीही नाकारू शकत नाही. त्याचेच परिणाम भारतात इस्लाम आधील मूलतत्ववादाकडे सरकला हे पण सत्य आहे. याचा परिणाम भारतातील तथाकथित "गंगा जमुनीं तहजीब" वर पडला नसता तर नवल! अर्थात आधीही बोललो आहे आणि आताही सांगतो की, मुळातच "गंगा-जमुनी तहजीब" म्हणजे "हिंदू - मुस्लीम" मिलन नसून हिंदू आणि मुस्लीम यांनी जास्त संघर्ष न करता एकमेकांसोबत वागतांना पाळायचे अलिखित समज्यस्य पद्धत आहे, यात अर्थातच "मुस्लीम शासक" म्हणून त्यांना दिलेला जास्त मान, त्यांच्या मताला दिलेली जास्त किंमत आणि त्याच्या भाषेत केलेला व्यवहार हा प्रथम अधोरेकीत होतो. यात समानता, सहिष्णुता वगैरे भानगड नसून जिथे हिंदू संघर्ष जास्त आहे तो न लढता कमी कसा करता येईल हा विचार तिकडून, तर न मिळणारा मान मरतब न लढता मिळतोय हा इकडून असा विचार होता आणि याच "गंगा जमूनी तहजीब" मधून प्रभू श्रीरामा करता उपाधी आली "इमाम ए हिंद" !

आजच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक हिंदू अभ्यासक विशेषतः संघाचे बुद्धिजीवी यातील "इमाम" शब्दाचा अर्थ आपल्या परीने अग्रेसर, राष्ट्रपुरुष असा देत आहे. मात्र इस्लामी उम्मा नुसार याचा खरा अर्थ "अल्लाहची पूजा करणारा", पुजारी किंवा अधिक या शब्दाच्या जवळचा अर्थ म्हणजे "अध्यात्मातील माननीय व्यक्तिमत्व" असा आहे. एका अर्थी अल्लाह किंवा प्रेषित यांनी निर्माण केलेल्या अध्यात्माचा योग्य आणि सन्मानीय अर्थ सांगतो म्हणून वंदनीय असा.

लक्षात घेण्याची गोष्ट अशी की इस्लाम मध्ये अल्लाह आणि प्रेषित यांच्या शिवाय कोणाला पण उच्च दर्जा दिल्या जात नाही. त्यातही इस्लाम व्यतिरिक्त धर्मातील कोणाला देवाचा दर्जा देणे हे महापाप. मग काफिर हिंदूंच्या देवाला ते आपल्या देवासारखे महत्व कसे देणार? आणि म्हणूनच पूर्ण विचार करत या तथाकथित गंगा जमुनीं तहजीबची भालमण करणाऱ्या अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी यांनी प्रभू श्री राम यांना "इमाम ए हिंद" ही उपाधी दिली आणि हिंदूंनी त्यांच्या या उदारतेचे कौतुक केले आणि अजूनही करत आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही उदारता आणि तथाकथित "गंगा जमुनीं तहजीब" दाखवणारे हे अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी यांचे विचार लवकरच बदलले. का? कारण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे बदलते स्वरूप, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे वाढते वर्चस्व आणि सर्वधर्मांना समान मानणारे, वेळप्रसंगी हिंदूंवर होणाऱ्या धार्मिक अत्याचारांकडे कानाडोळा करत मुस्लिम जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणारे जन्माने हिंदू असलेल्या महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे भारतीय राजकारणात वाढणारे वर्चस्वा सोबतच, भारत स्वतंत्र झाल्यावर या भागावर लोकशाही अवतीर्ण होईल आणि त्यात बहुसंख्येच्या जोरावर हिंदू वर्चस्व सरकार मध्ये राहील हे लक्षात आले ते याच अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी यांना. मग त्यांनी काय केले?

तर या अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी यांनी लिहले तराना ए मिल्ली ! १९०४ साली आपणच लिहलेल्या "तराणा ए हिंद" ला खोडून काढायला १९१० साली लिहली "तराना ए मिल्ली"

चीन ओ अरब हमारा, हिन्दोसताँ हमारा, मुस्लिम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा।

तौहीद की अमानत, सीनों में है हमारे आसाँ नहीं मिटाना, नाम ओ निशाँ हमारा ।

दुनिया के बुतकदों में, पहले वह घर ख़ुदा का, हम इस के पासबाँ हैं, वो पासबाँ हमारा ।

तेग़ों के साये में हम, पल कर जवाँ हुए हैं, ख़ंजर हिलाल का है, क़ौमी निशाँ हमारा।

मग़रिब की वादियों में, गूँजी अज़ाँ हमारी, थमता न था किसी से, सैल-ए-रवाँ हमारा।

बातिल से दबने वाले, ऐ आसमाँ नहीं हम, सौ बार कर चुका है, तू इम्तिहाँ हमारा।

ऐ गुलिस्ताँ-ए-अंदलुस! वो दिन हैं याद तुझ को था तेरी डालियों में, जब आशियाँ हमारा।

ऐ मौज-ए-दजला, तू भी पहचानती है हम को अब तक है तेरा दरिया, अफ़सानाख़्वाँ हमारा।

ऐ अर्ज़-ए-पाक तेरी, हुर्मत पे कट मरे हम है, ख़ूँ तरी रगों में, अब तक रवाँ हमारा।

सालार-ए-कारवाँ है, मीर-ए-हिजाज़ अपना इस नाम से है बाक़ी, आराम-ए-जाँ हमारा।

इक़बाल का तराना, बाँग-ए-दरा है गोया होता है जादा पैमा, फिर कारवाँ हमारा।

आता याचा अर्थ काय? तर अरब, चीन (तत्कालीन अर्थांने मध्य एशिया) आणि हिंदुस्थान पण आमचा आहे, हे सगळे जग आमचे आहे. अल्लाह मुस्लिमांच्या श्वासात आणि हृदयात वास करतो, त्याला (अल्लाहला) आणि मुस्लिमांना नष्ट करणे इतके सोपे नाहीये. या नंतरच्या ओळी जास्त महत्वाच्या आहेत. कारण त्यात आपल्या मूर्तिपूजेचा त्यांना किती तिटकारा होता हे लक्षात येते. ते लिहतात की जसे काबा (मुस्लिमांचे पवित्र शहर) आम्ही मूर्तिपूजा रहित केला तसेच जगाला बनवू, पुढे लिहतात की कोणत्याही धर्माच्या पवित्र मंदिरापेक्षा काबा अधिक श्रेष्ठ आहे. अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी लिहतात की आम्ही (म्हणजे इस्लाम मान्य करणारे) नेहमीच तलवारीच्या सावलीत मोठे झालो आणि तोच अर्धचंद्र खंजीर आमची निशाणी आहे. या कवितेत तर त्यांनी आधी भालमण केलेल्या हिंदी राष्ट्रवादाला पण नाकारले आहे.

पुढे २९ डिसेंबर १९३० साली अलाहाबाद येथे झालेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात अध्यक्ष म्हणून भाषण करतांना त्यांनी पाकिस्थानची परिकल्पना सांगितली. सोबतच या विभाजनाला मान्यता दिली नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण भारताला भोगावे लागतील अशी धमकी पण दिल्या गेली. जो पर्यंत मुस्लिमांना वेगळा देश आणि वेगळा कायदा मिळत नाही तो पर्यंत देशात शांती, सुख समाधान राहणार नाही. जो पर्यंत देशाची धोरणे, कायदे हे इस्लामी शरिया नुसार राहणार नाही तो पर्यंत मुस्लिम शांत बसणार नाही. याच भाषणात त्यांनी इस्लामी उम्माची भालमण करत धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद या दोन्ही विचारांना नाकारले होते. पुढे १९३२ साली पण मुस्लिम लीगच्या अजून एका अधिवेशनात अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी यांनी आपले पहिल्या भाषणातील सगळे मुद्दे अधिक जहालपणे मांडले.

अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी किती कट्टर मुस्लिम होते याचे उदाहरण म्हणजे, ते स्वतः धर्मातरीत झालेले मुस्लिम होते. ते मुस्लिमांमधील अहमदीया पंथाचे अनुयायी होते, त्यांच्या जीवनाच्या अधिकांश प्रवासात त्यांची ओळख अहमदीया मुस्लिम अशीच होती. मात्र नंतर त्यांनी हा पंथ इस्लामी नाहीये म्हणत या पंथाला सोडून दिले. तुम्हाला आश्चर्य नको वाटायला की पाकिस्थान मध्ये अहमदीया मुस्लिमांना कायदेशीर रित्या मुस्लिम नाहीत म्हणून घोषित केले आहे. सोबत हे पण पक्के लक्षात ठेवा की अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी यांना आज कोणीही उठून, कितीही धर्मनिरपेक्ष म्हणून समोर आणायचा प्रयत्न करत असले तरी त्यांचे विचार तसे नव्हते. ते धर्मनिरपेक्ष कधीच नव्हते !

आता विचार करा की ज्याने स्वतः आपल्याच विचारांच्या विरोधात जाऊन इस्लामी विचारधारेचा हात धरला त्याने आपल्या देवाचा केलेला तथाकथित गौरव आपण किती काळ मान्य करायचा? पाकिस्थान निर्मिती व्हायच्या आधी २१ एप्रिल १९३७ साली जरी अलम्मा मुहम्मद इकबाल मसुदी यांचा मृत्यू झाला असला तरी पाकिस्थानमध्ये त्यांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळाला आहे, त्यांना पाकिस्थान मध्ये "मुफक्कीर ए पाकिस्थान" म्हणजे पाकिस्थानचा अध्यात्मिक पिता हा दर्जा आहे.

खरे तर कलेला कोणत्याही देशाच्या सीमेचे, धर्माचे बंधन नसते हा हिंदू दर्शन मधील एक विचार आहे. आजही आपण त्याच मुळे भारतात पण कवी इकबाल यांच्या काही कविता आनंदाने म्हणतो. म्हणून मात्र त्यांनीच नाकारलेले विचार घेऊन पुन्हा आपल्याच देवाचे अवमूल्यन आपल्याच हाताने का करावे? प्रभू श्री राम हे आपल्यासाठी देव आहेत, ईश्वर आहेत ते अल्लाहच्या समकक्ष आहेत, तेव्हा आपणच त्यांना "इमाम ए हिंद" का म्हणावे? अर्थात या म्हणण्याचा काही फायदा झाला असे इतिहासात दिसत नाही, १९०४ साली जे झाले नाही ते आता २०२१ साली होईल असे वाटणे मूर्खपणाचे आहे हे नक्की.

याच हिंदू मुस्लिम ऐक्याच्या निसरत्या पायवाटेवर अनेक नेते चालले पण त्यांना यश आले नाही, उलट त्याचा हिंदूंना त्रासच झाला. तेव्हा पुन्हा त्याच जुन्या पायवाटेने चालण्यात काय हशील? तेव्हा आता नवीन मार्ग शोधा, हिंदू मुस्लिम ऐक्य नाही झाले तरी चालेल, निदान मुस्लिमांना त्याच्या धर्माअंतर्गत सुधारणा करायला सांगा, त्यांच्यातील कट्टरतावाद कमी करायचा प्रयत्न करा, "मुस्लिम उम्मा" च्या एकते पेक्षा "राष्ट्रवाद" मोठा हे त्यांना शिकवा, हे सगळे साध्य झाले तर हिंदू मुस्लिम ऐक्या करता तुम्हाला पुन्हा "इमाम ए हिंद" सारख्या एकतर्फी विचारांचे साहाय्य नक्कीच घ्यावे लागणार नाही.

लक्षात ठेवा...

बारीशोन्से दोस्ती अच्छी नही फराज,

कच्चा तेरा मकान है, कुछ तो खयाल कर।

- अहमद फराज

टिप्पण्या