"हमे चाहीये आझादी" चे नारे लावणारा कन्हैय्या कुमार याची तथाकथित "आझादी" जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या आवाराच्या बाहेर पडल्यावर आणि आपल्या विचारधारेच्या पक्षात गेल्यावर धोक्यात आली आहे.
भारतात व्यक्तिगत अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कारकर्ता, कोणतेही नियम-कायदे हे या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येत असल्यामुळे ते मोडायचे या मताचा असलेला, तारुण्याचा रोल मॉडेल असे ज्याचे सरकारच्या नियम आणि कायदे मोडण्याला आपल्या आंदोलनात सर्वोच स्थान दिले, इतकेच नाही तर या कायदे मोडण्याच्या आणि तथाकथित "आझादी" मिळवण्याच्या नादात "देशद्रोहाची" सीमारेषा पार करण्याचे पाप त्याच्या हातून घडले होते.
मात्र इतके सारे होऊन पण भारतातील तमाम विरोधी पक्ष त्याला डोक्यावर घेऊन नाचत होते, जणू काही मोठा क्रांतिकारकच भारतभूमीत जन्माला आला होता. कन्हैय्या कुमार जरी डाव्या विचारसरणीचा असला तरी देशातील तमाम सरकार विरोधी पक्षाने विचारधारेला बाजूला सरत त्याच्या सभा भारतातील जवळपास प्रत्येक व्यासपीठावर आयोजित केली होती.
मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कन्हैय्या कुमार CPM पक्षा तर्फे बिहार मधील डाव्यांचा गड असलेल्या बेगूसराय क्षेत्रातून उभा राहिला आणि CPM च्या पक्षीय वातावरणात, शिस्तीत, कायद्यात त्याला राहावे लागत आहे.
गंमत म्हणजे जेव्हा तो JNU मध्ये त्याच्या नियम मोडण्याला, वेळोवेळी तेथील अध्यापकांना घेराव घालण्याला प्रस्थापितां विरोधातील एल्गार वगैरे सारख्या मोठ्या शब्दांनी गौरवणाऱ्या, त्याच्या बंडखोर वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या आणि त्याच्या "आझादी" च्या नाऱ्याला देश विरोधी न मानता "देशा पासून नाही, तर देशांतर्गत स्वातंत्र्य हवे" म्हणून भलामण करणाऱ्या या डाव्या पक्षाने मात्र कन्हैय्या कुमारवर पक्षात शिस्त पाळत नाही म्हणून आता पक्षांतर्गत कारवाई केली आहे.
आता द हिंदू या वृत्तपत्राचे वृत्त खरे मानले तर बेगूसराय येथील जिल्हा परिषद कार्यालय आणि पाटणा येथील पाटबंधारे कार्यालयात गोंधळ घालून पक्षाची प्रतिमा मालिन करण्याचा आरोप करत त्याच्यावर ही कारवाई केली आहे. मात्र त्याच्या अश्या वागण्याला खतपाणी आज पर्यंत डाव्या पक्षांनीच घातले हे मात्र विसरल्या जात आहे.
असो, या कारवाई नंतर तथाकथित युवा नेता कन्हैया कुमार मात्र शांत आहे. आता त्याला वाटेल तसे वागण्याचे स्वातंत्र्य नको आहे का? आता पुन्हा कन्हैय्या कुमार "आझादी" च्या घोषणा करत आम्हाला CPM पक्षापासून नाही, तर पक्षा अंतर्गत स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणार नाही काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा