मला आणि माझ्या बायकोला कोविड १९ ने आपलेसे केले. या रोगाशी मुकाबला करतांनाच आम्हाला काय काय सहन करावे लागले हे माझ्या पत्नीच्या दृष्टिकोनातून....हा अनुभव माझ्या पत्नीने लिहला आहे.
अगदी खर ! कोरोना किंवा covid-१९ ऐकलं की छातीत धस्स व्हायच ! पण काही दिवसांपूर्वी आमचाही या जगविख्यात रोगाशी सामना झाला आणि "माझे कुटुंब माझी जवाबदारी" म्हणजे नक्की काय? हे पण आमच्या लक्षात आले.
कोरोनाचा आमच्या घरात प्रवेश कोणाच्या हस्ते झाला हा एक वादाचा विषय ! असो....... १७ डिसेंबर ला आमच्या साहेबांना (नवरोबांना) वास आणि चव येनाशी झाली. त्याच्या हॉटेल व्यवसाया मुळे हे लवकर लक्षात आले. सहाजिकच लगेच दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघांनी covid टेस्ट करून घ्यायची ठरवली.. टेस्ट करेपर्यंत आणि त्याचा रिपोर्ट येई पर्यंत आम्ही त्यांना एका खोलीत बंद केले... (फक्त त्यालाच कारण आम्हाला कोणाला मी, मुलगा आणि आई ला खूप काही लक्षणं नव्हती.) रिपोर्ट्स १९ ला मिळणार होते तो पर्यंत आम्ही अप्पांना (आमचा मुलगा त्यांना "अप्पा" म्हणतो) अक्षरशः वाळीत टाकले (isolate).. दारातूनच जेवण..स्वतःची भांडी स्वतःच धुणे वगैरे ! टेस्ट सरकारी सेंटर मध्ये केल्यामुळे रिपोर्ट्स घ्यायला आम्हालाच जावे लागले.
रिपोर्ट्स अनपेक्षित पणे दोघांचेही positive आले (म्हणजे मला माझा रिपोर्ट निगेटिव्ह येल अशी अपेक्षा). तेथे मार्गदर्शन केल्या प्रमाणे चाचणी केंद्रातूनच नागपूर महानगर पालिकेच्या कोविड कंट्रोल रूमला फोन करत आमच्या सकारात्मक चाचणी आल्याची माहिती दिली. कंट्रोल रूम वाल्यांनी आमचा पत्ता आणि वयक्तिक माहिती नोंदवत, आमच्या भागाच्या महापालिका झोन ऑफिसला ही माहिती देण्याचा सल्ला देत तेथून तुम्हाला औषधे आणि वैद्यकीय सहकार्य मिळेल असे आश्वासन देण्यात आले.
नागपूर कोविड कंट्रोल रूमने केलेल्या मार्गदर्शना नुसार झोन ऑफिस मध्ये फोन केला गेला. पुन्हा आमचे नाव, वय, पत्ता, फोन नंबर सगळ्या नोंदी केल्या गेल्या आणि आश्वस्त केल्या गेले की तुमच्या कडे महानगर पालिके कडून एक वैद्यकीय टीम येईल आणि तुम्हाला आवश्यक औषधे देतील. शासकीय कामाच्या या प्रकारच्या स्वरूपाची आम्ही कल्पना केली नव्हती, त्या मुळे अश्या प्रकारे सरकारी प्रतिसाद बघून भारावून गेलो.
आता वाट पाहण्या पलीकडे आमच्या कडे काही पर्याय नव्हता. घरी सांगितल्यावर मला पण वाळीत टाकण्यात आले (अर्थात isolete करण्यात आले). बरं त्यादिवशी आम्ही " डॉक्टर्स च्य टीम" ची वाट पाहिली पण त्या दिवशी काही ते आले नाही.. दुसरा दिवस उगवला परत आम्ही त्या कॉल सेंटर ला फोन लावला तर आज पाठवू असे सांगण्यात आले. सोबतच आम्हा दोघांची चाचणी सकारात्मक आल्या मुळे पोरगा आणि आईची पण चाचणी करणे आवश्यक होते, मात्र घरात आम्ही दोघं positive त्यामुळे मुलाला आणि आईला चाचणी करता कोणी न्यायचं हा प्रश्न समोर होता.
अश्या स्थितीत तिसरा दिवस उजाडला. आम्ही प्राथमिक जुजबी माहितीवर जेवढी माहीत होती ती औषध सुरू केली. मात्र जो पर्यंत डॉक्टर सांगत नाही तो पर्यंत काही खरे नव्हते. पण इकडे, "सरकारी काम आणि दहा महिने थांब" हा अनुभव यायला लागला. खरे तर पहिल्याच दिवशी आम्ही खाजगी डॉक्टरांकडे औषध उपचार करू असा विचार महापालिकेत बोलून दाखवला होता. मात्र महापालिकेच्या संबंधित माणसाने आपल्याला येथून योग्य औषध उपचार आपल्या पर्यंत येतील या बद्दल आश्वस्थ केले होते आणि म्हणून आम्ही महानगर पालिकेच्या वैद्यकीय चमुची आतुरतेने वाट बघत होतो.
मात्र गंध आणि चव गेली असलेल्या नवरोबांचा अशक्तपणा झपाट्याने वाढत होता. शेवटी आम्ही खाजगी डॉक्टरकडे जायचा निर्णय घेतला. त्या नुसार काही डॉक्टरांकडे फोन केल्या गेले. मात्र हे डॉक्टरपण आमच्या कडे कमाईचे साधन या पद्धतीने बघतात आहे काय? अशी शंका येईल या पद्धतीने १०-१२ प्रकारच्या चाचण्या आणि लगेच भरती व्हा सारखे सल्ले मिळायला लागले. तर "माझे कुटुंब, माझी जवाबदारी" च्या घोषणा देणाऱ्या शब्दशः कुटुंबाची जवाबदारी तुमचीच याची प्रचिती द्यायला सुरुवात केली होती.
खरे तर "माझे कुटुंब, माझी जवाबदारी" या योजनेखाली सरकार घरोघरी प्राथमिक आरोग्य तपासणीच्या फेऱ्या करणार होती. पण इकडे घरा कडे तेव्हा प्राथमिक तपासणी करता पण कोणी पोहचले नाहीच, पण कोविड ग्रस्त झाल्यावर प्राथमिक औषधे द्यायला किंवा कोणती औषधे घ्यायची हे सांगायला पण कोणी तयार नव्हते. सरकारी कॉल सेंटर वाल्यांच्या तिसऱ्या दिवशी फोन आल्यावर पुन्हा नाव-गाव-पत्ता-फोन नंबर विचारणा, तुम्हाला काही तब्येतीचा त्रास होत आहे का? ताप आहे का? श्वास घ्यायला त्रास होत आहे का? वगैरे विचारणा केल्या गेली, वर काळजी करू नका हा काही घाबरण्या सारखा रोग नाही, नारळ पाणी घ्या, व्यायाम करा, घरात थोड फिरा, काढा - वाफारा घ्या असे सांगण्यात आले सोबत प्राथमिक ओषधे घेऊन आमची टीम येईल ही मखलाशी पण करण्यात आली. मात्र तिसऱ्या दिवशी पण औषधे पोहचली नाहीच.
शेवटी चवथ्या दिवशी आम्ही नवरोबंच्या मित्र डॉक्टर ( Arvind Talaha ) ला फोन केला.. तो पर्यंत आई ने माझ्या गोव्याच्या मौशी ला संगित्या मुळे तिच्या आयुर्वेदिक डॉक्टर मुलीने (Sukhada Moghe) म्हणजे माझ्या मावस बहीण ने आयुर्वेदिक उपाय (diat plan) आणि काही औषध सांगितली... ती आम्ही सुरू केली.
डॉ. अरविंदने आमच्या तब्येतीची सूत्रे हातात घेत, प्रथम माझी आणि नवऱ्याची ब्लड टेस्ट, तसेच मुलाची आणि आईची कोविड टेस्ट करायचा निर्णय घेतला. त्वरित एक पॅथॉलॉजी लॅबवाल्याला सँपल घ्यायला घरी पाठवले पण ! ते पण एकदम वाजवी दरात..!
आता हे रिपोर्ट्स ये ई पर्यंत अजून एक दिवस गेला. इतकं सगळं होई पर्यंत सरकारी सो कॉल्ड "डॉक्टर्स ची टीम " काही आमच्या पर्यन्त पोचली नाही... शेवटी सगळ्यांचे रिपोर्ट्स आले आणि ते ही positive.. आता मधल बंद केलेलं दर (मी आणि नवरोबा वेगळ्या दोन खोल्यात होतो) उघडण्यात आले.. नंतर आईच्या वयानुसार तीच heart scan झालं ( त्यालाही तिला आमच्या ह्यांनीच नेलं)... सगळे रिपोर्ट्स ठीक आले काळजीचे काही नाही... आता आमचा रूटीन सेट झाल.. जेवणात डॉ. विशाखा नी सांगितल्या प्रमाणे भाताची पेज आणि मुगाच आळण ह्या व्यतिरिक्त काही घेत नव्हतो... आयुर्वेद नुसार फक्त हे आणि तिने सांगितलेली दोन औषधं काही पथ्य तेव्हडे पाळले कि झाल... बरं पण आता आम्ही आमचा आहार सात्विक आयुर्वेद प्रमाणे केला. आणि औषधं म्हणाल तर allopathy ची आवश्यक औषधं आणि Ayurvedic दोन अशी सुरू केली (अर्थात योग्य वेळेची gap ठेऊन)... सुदैवाने कोणालाच जास्ती symptoms नसल्याने घरातली काम सगळ्यांनी वाटून घेतली... आता आम्हाला home quarantine राहून १२ दिवस होतील पण सरकारी डॉ. टीम काही आली नाही... हा रोज एक स्वसंचालित फोन कॉल येतो ( तो पण पुणे महानगर पालिकेचा, त्यात तब्येत जास्त असेल तर आम्हाला फोन करा म्हणून सांगतांना नंबर पण पुण्याचा देतात.... नागपूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना निदान तिथे तरी नागपूरचा नंबर द्यावा हे सुचले नाहीये अद्याप ...असो ) नक्की येतो...... " तुम्हाला आज ताप आहे का ? हो असेल तर १ दाबा, नाही असेल तर २ दाबा, सर्दी आहे का ? , दिवसात ४ वेळा जुलाब लागते का ? वगैरे प्रश्न आणि बटणे दाबायचा पर्याय ! आम्ही सगळे पर्याय २ निवडल्यामुळे शेवटी ती बाई म्हणते आज तुम्हाला कोणतेही लक्षणं नाही घरीच रहा उद्या तुमची तब्येत तपासायला आम्ही परत फोन करू.... तर एवढं सगळं सांगायचं तात्पर्य असं की आम्ही सरकारी यंत्रणेवर विश्वास सुरवातीला तरी दाखवला पण ह्यात काही अर्थ नाही... आमची ताब्यात ठीक राहण्यात डॉ. विशाखा व डॉ. अरविंद ह्यांच्या मार्गदर्शनामुळे च त्यांचे विशेष आभार... औषधं आणि घरातील गरजेच्या गोष्टी पोचविण्याचे काम आमच्या मित्र मंडळाने पार पाडल (त्यांना विशेष धन्यवाद).. आता १४-१७ दिवसांनी पुन्हा टेस्ट करून निगेटिव्ह होऊन ह्यातून सुटण्याची वाट पाहतोय......
Amita Vaidya
अमिता वैद्य

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा