२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक व्हिडिओ तुफान गाजला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका दौऱ्यावर गेल्यावर त्यांच्या स्वागतासाठी जमा झालेल्या जनतेने त्याचे स्वागत "जय श्री राम" च्या घोषणा देऊन केल्याने चिडलेल्या ममता बॅनर्जी गाडीच्या खाली उतरून जमावावर ओरडत आहेत. नंतर तर बंदी आणलेल्या टिकटॉक अँपवर या सगळ्याची भयानक खिल्लीपण उडवल्या गेली. हळूहळू हा धुरळा खाली बसला. मात्र आता पुन्हा कोलकत्ता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात जमावाने "जय श्री राम" च्या घोषणा दिल्यामुळे अपमान झाल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाषण केले नाही आणि तेव्हा बसलेला धुरळा पुन्हा उठला आहे.
लक्षात घ्या की जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेश नंतर पश्चिम बंगालच असे राज्य आहे ज्या राज्यात मुस्लिम जनसंख्या अधिक आहे. मुख्यतः मिदनापूर, मालदा, छत्तीस परगणा हे भाग तर मुस्लिम बहुल असे आहेत. तुम्हाला आठवत असेल तर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यापासून या भागात हिंदूंवर होणाऱ्या धार्मिक अत्याचाराच्या बातम्यात वाढ झाली होती. पण पश्चिम बंगाल सरकार असे काही होत असल्याचे सतत नाकारत होती. या वरून पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात चांगलेच बिनसले होते. तो पर्यंत राष्ट्रीय वृत्तवाहिन्या पण या घटनेकडे लक्ष देत नव्हत्या किंवा हा सगळा प्रकार म्हणजे ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालला बदनाम करायचा भाजपाच्या राजकारणाचा भाग आहे असे म्हणत होती. जेव्हा समाज माध्यमांवर मालदा आणि मिदनापूर येथे होणाऱ्या मंदिरावरील हल्ले आणि हिंदूंना मारहाण करण्याचे व्हिडीओ फिरायला लागेल तेव्हा बोटावर मोजता येतील अश्या एकदोन वृत्तपत्र वाहिन्या तिथे पोहचल्या. त्या नंतर मात्र पश्चिम बंगाल मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या होणाऱ्या खून आणि मुस्कटदाबी याला वाचा फुटली. तेथील वास्तव देशा समोर आले, प्रशासनाला पक्की भूमिका घेत या दंगली आणि अत्याचार थांबवावे लागले.
ममता बॅनर्जी यांची पदवी आहे इस्लामिक इतिहासातील, त्यांचा इस्लाम वरील अभ्यास मोठा आहे आणि प्रेम पण ! त्या मुळे मुस्लिम मन नक्की कसा विचार करते याची परिपूर्ण जाणीव त्यांना आहे आणि त्या दृष्टीने त्या वागत असतात. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जिथे देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत मुस्लिम मतदार कमी आहेत, सोबत मुंबई सारख्या देशातील सगळ्यात प्रगत आणि अनेक धर्माचे, जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात अश्या शहरात एका मुस्लिम खासदाराला त्याने फक्त "गणपती बाप्पा मोरया" म्हंटले म्हणून माफी मागावी लागते तिथे मुस्लिम बहुल पश्चिम बंगाल मध्ये काय होऊ शकते याची जाणीव आपल्याला होईल आणि ममता बॅनर्जी यांचा "जय श्री राम" या घोषणे वरील राग पण कळेल.
"काट्याने काटा काटा काढणे" ही म्हण आपल्याला माहीत आहे. पश्चिम बंगाल मध्ये पण अनेक वर्षांपासून सत्तेत अडकलेला साम्यवादी काटा या ममता बॅनर्जी यांनी तसाच काटा बनून काढला. २०११ साली साम्यवादी सरकार उखडवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनलेल्या ममता बॅनर्जी यांनी सत्ता बदल केला असला तरी व्यवस्था मात्र बदलली नाही. पश्चिम बंगाल मध्ये प्रशासना पेक्षा आपल्या परिसरातील पक्षाचे कार्यालय जास्त शक्तिशाली राहिले आणि पक्ष कार्यकर्त्यांना एक कमाईचे साधन पण ! तुमच्या कडे पाणी येत नाहीये, गटार भरले आहे, रस्ता बनवायचा आहे इथं पासूनची सगळी कामे जी प्रशासनाकडून अपेक्षित असतात, ज्याची तक्रार स्थानीय प्रशासनाकडे जनतेनी करायची असते ती तक्रार पश्चिम बंगाल येथे पक्षीय कार्यालयात करावी लागते ही ती व्यवस्था ! डाव्यांनी उभी केलेली ही व्यवस्था ममता बॅनर्जी यांनी जशीच्या तशी उचलली, बदल झाला तो पक्षाच्या कार्यालयांमध्ये ! पहिले ते कार्यालय आणि कार्यकर्ते साम्यवादी होते तर आता तृणमूल काँग्रेसवाले ! बाकी पक्षीय ध्येय आणि धोरणात काहीच फरक पडला नव्हता. तसाही तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात म्हणजे "एक खांबी तांबुच" !
राजकीय विचारात पण काहीच फरक पडला नाही. साम्यवादी पक्षांना पण हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचार आवडत नाही आणि ममता बॅनर्जी यांना पण ! त्यातच राज्यात लवकरच निवडणुका होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिरा निर्माण सुरू झाल्यामुळे राज्यातील मुस्लिम आधीच नाराज आहेत. त्याच्या इतिहासानुसार तर हिंदुस्थानचे राज्यकर्ते हेच होते आणि "हिंदुस्थान किसिके बाप का थोडे है". या मानसिकतेचा ममता बॅनर्जी यांना चांगलीच माहिती असल्यामुळे, तसेच या निवडणुकीच्या तोंडावर हैद्राबाद येथील MIM पक्षाचे असुवद्दीन ओवेसी राज्यातील निवडणुकीत आपले भाग्य आजमवणार आहे. आधीच साम्यवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या पासून आपली मुस्लिम व्होटबँक वाचवायची कसरत करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या समोर ओवेसीच्या रूपाने अजून एक दावेदार उभा झाला आहे. त्याच भाजपाच्या हिंदुत्ववादी राजकारणाकडे आकर्षित होणारा बंगाली भद्र समाज हा ममता बॅनर्जी यांची खूप मोठी राजकीय डोकेदुखी ठरणार आहे.
या सगळ्याचे प्रतिबिंब ममता बॅनर्जी यांच्या वागण्यात दिसत आहे. भाजपा निवडणूक जिंकणार का ? या पेक्षा मोठा प्रश्न ममता बनर्जींसमोर हा आहे की आपल्या किती जागा कमी होणार आणि त्याची कारणे काय राहणार? या करता त्या कोणत्याही पद्धतीने धोका पत्करायला त्या तयार नाहीये. खरे तर जमावाने दिलेल्या "जय श्री राम" च्या घोषणेनंतर आपल्या भाषणात "जय श्री राम" बोलून ममता बॅनर्जी यांनी सभा नक्कीच जिंकली असती, मात्र सध्या त्या ज्या मुस्लिम व्हॉटबँकेवर डोळा ठेऊन आहे ती एका झटक्यात विभागल्या गेली असती, त्या मुळे त्यांना अपमान झाल्याची आणि भाषण न करण्याची आक्रस्थाळी भूमिका घेणे आवश्यक होते आणि ती त्यांनी बिनदिक्कत घेतली इतकेच. या सगळ्याचा भाजपला फायदा काहीच नाही, मात्र ममता बॅनर्जी यांनी आपले होणारे नुकसान थोपवले हा त्यांच्या वागण्याचा अर्थ !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा