तथाकथित विवेकवादी, इहबुद्धिवादी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाने देऊ केलेला जीवनव्रती पुरस्कार नाकारल्याची बातमी आली आणि खळबळ उडाली.
हा पुरस्कार नाकारला त्याचे दुःख नाही, मात्र हा पुरस्कार ज्या कारणासाठी डॉ. यशवंत मनोहर यांनी नाकारला ते जास्त विखारी आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यांच्या विवेकवादी आणि इहबुद्धिवादी भूमिकेला कार्यक्रमात ठेवलेली सरस्वतीची प्रतिमा त्यांना खुपली. त्यांच्या मते स्त्रीया आणि क्षुद्रअतिक्षुद्राना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या तथाकथित शोषणसत्ताक व्यवस्थेची देवी सरस्वती हे प्रतीक आहे आणि या प्रतिकासमोर आपण हा पुरस्कार स्वीकारणार नाही.
पण सध्याच्या काळात बहुसंख्यकांच्या प्रतीकांचा अपमान करायची पद्धत पडली आहे त्यातील ही एक पद्धत आहे. त्यात स्वतः ची प्रसिद्धी हा महत्वाचा भाग येतो. ही दुटप्पी चाल या करता खेळली जाते. मराठी सारस्वत मंडळींच्या विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात सरस्वतीदेवीची प्रतिमा असतेच हे यशवंत मनोहर यांना पक्के ठाऊक होते. संपूर्ण जीवन विदर्भ साहित्य संघाच्या अंगणात गेल्यावर त्यांना साहित्य संघाच्या प्रथा आणि परंपरा माहीत नसतील असे होऊ शकत नाही. तरी हा जीवनव्रती पुरस्कार स्वीकारत असल्याचे डॉ यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाला लेखी कळवले. इतकेच नाही तर हा पुरस्कार प्रित्यर्थ शेवाळकर यांच्याकडे झालेल्या सत्काराला पण उपस्थित राहिले, तिथे सत्काराला उत्तर म्हणून भाषण पण केले. आता आयत्यावेळी यशवंत मनोहर यांनी ही पुरस्कार नाकारण्याची भूमिका घेतली.
याचा अर्थ आधी डॉ यशवंत मनोहर यांनी आधी जो पुरस्कार स्वीकारण्याचे कबूल केले ते आंधळेपणा होता का? मग तेव्हा यांचा विवेकवाद आणि इहबुद्धी कुठे गेली होती? की आता आपल्या कट्टरतेपाई हे आंधळे झाले आहेत हे तुम्ही बघायचे.
अर्थात एका अर्थी बरोबरच आहे देवी सरस्वती ही बुद्धीची देवता आहे, कुबुद्धीची नाही. त्यामुळे यशवंत मनोहर देवी सरस्वती समोर झुकणार कसे?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा