संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाकिस्थानी इस्लामी



नुकतेच पाकिस्थानमध्ये हिंदू मंदिरात तोडफोडीच्या बातम्या आल्या, अर्थात अश्या बातम्या पाकिस्थान, अफगाण किंवा बांगलादेश मधून येणे आपल्याला नवीन नाही. कधी काळी आपल्याच देशाचा भाग असलेल्या पण आता मुस्लिम बहुल असलेल्या देशातून अल्पसंख्यांक हिंदू - शीख धर्मीय लोकांना धार्मिक त्रास देणे, त्यांच्या पोरी पळवणे, त्यांची धार्मिक स्थळे पाडणे - बाटवणे नवीन नाहीये. पण या सोबत या अन्य धर्मियांना इस्लाम स्वीकारण्याची सक्ती करणे हे पण मोठ्या प्रमाणात या देशात होते. 


खास करून पाकिस्थान या बाबतीत खूपच बदनाम झाला आहे. पाकीस्थानी क्रिकेट टीम पण अश्या धर्मांतरणाच्या कारस्थानात अडकलेला आहे. ख्रिश्चन पाकीस्थानी क्रिकेटर युसूफ योहाना हा मोहम्मद युसूफ नाव धारण करून मुस्लिम बनला. तर पाकिस्थान कडून खेळणाऱ्या दिनेश कानेरीया आणि त्या पण अगोदर अनिल दलपत हे दोनच हिंदू खेळाडू खेळू शकले. भारतात CAA विरोधात आंदोलन सुरू होते तेव्हा स्वतः दिनेश कानेरीयाने पाकिस्थानमध्ये आपल्यावर धार्मिक भेदभाव कसा होतो याचे कथन केले होते. मात्र या सगळ्यांच्या किती तरी अगोदर पाकिस्थानचे वर्तमान पंतप्रधान इम्रान खान हे पाकीस्थानी क्रिकेट टीमचे कर्णधार असतांना असाच आरोप अनिल दलपत यांनी पण केला होता. या बाबतीत अनिल दलपत याने तर थेट इम्रान खान कडेच बोट दाखवले होते. 



पाकिस्थानच्या काही क्रिकेट खेळाडूंवर अश्या धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आरोप पण लागले आहेत. हे आरोप फक्त पाकीस्थानी खेळाडूंवरच लागले असे नाही तर दक्षिण आफ्रिके कडून खेंळणाऱ्या हाशिम आमला, इम्रान तहीर आणि मोहम्मद मोसाजी यांच्यावर पण लागले होते जेव्हा या देशाच्या क्रिकेट टीम मधील वायने पारनेल याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. 


इकडे भारतात अनेक भाजपा शासित राज्यांनी "लव्ह जिहाद" नावाने हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांचा धर्म बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदे केले, त्या विरोधात तथाकथित सर्वधर्मसमभाव आणि मानवतावादी ठेकेदार उर बडवत असतांनाच संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे UN समोर पण असल्याच धर्मांतरणाच्या प्रयत्नांचे प्रकरण आले आहे. त्यात पुन्हा पाकिस्थानची आंतरराष्ट्रीय नाचक्की होत आहे. 


आपल्याला माहीतच आहे की संयुक्त राष्ट्रसंघ गृहयुद्ध आणि इतर देशातील कलह थांबवण्यासाठी आपल्या सदस्य देशांच्या सैन्याला "शांती सेना" म्हणून जगातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असते. तिथे या सैन्याकडून शांती प्रस्थापित करणे अपेक्षित असते. 


तर याच संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्थान सेनेच्या काही तुकडया शांती सेना म्हणून आफ्रिकेतील कांगो देशात पाठवल्या. या मध्य आफ्रिकी देशात इस्लाम अल्पसंख्य आहे. त्या मुळे या सैन्य तुकडीला मदत करणारा स्थानीय कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्मीय आहे. पाकीस्थानी सैन्य तुकडीचा कर्नल सादिक मुश्ताक याने या कर्मचाऱ्यांवर इस्लाम मध्ये परिवर्तित होण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. 



कांगो मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अद्याप या वर नक्की काय कारवाई होईल हे गुलदस्त्यात असले तरी, कोंगो सरकारने मात्र याची गंभीर दखल घेतली आहे. सरकार कडून आरोप असा आहे की संयुक्त राष्ट्रसंघ जेव्हा पासून म्हणजे १९९९ पासून कांगो मध्ये दाखल झाला आहे तेव्हा पासूनच या कामात असलेल्या पाकीस्थानी सेनेचे इस्लामी चाळे इथे सुरु आहे. पूर्व कांगो भागात पाकीस्थानी सेना मोठ्या प्रमाणावर इस्लामचा प्रचार करत धर्मांतराचा प्रयत्न करत आहे. इतकेच नाही तर  किवू आणि इतुरी भागात पाकीस्थानी सेना गरज नसतांना पण मोठ्या प्रमाणावर मशिदीचे बांधकाम करत असल्याचा आरोप केला आहे. 


आता या वर संयुक्त राष्ट्रसंघ नक्की काय कारवाई करते हे बघणे मोठे मनोरंजक असेल, की इथे पण धर्म बदलणे हा मूलभूत अधिकार आहे असे संयुक्त राष्ट्रसंघ सांगतो ते बघावे लागेल.

टिप्पण्या