पश्चिम बंगाल मधील राजकीय आजारकता !

पश्चिम बंगाल मधील निवडणुका जश्या जश्या जवळ येत आहे तसे तसे बंगाल मधील वातावरण रक्तरंजित होत आहे. भाजप शासित राज्यात थोडे पण काही खुट्ट झाले की चवताळून उठणारे पत्रकार आणि लोकशाही समर्थक राजनेते मात्र ममता बानोच्या राज्यात चाललेल्या राजकीय आजारकतेवर तोंड उघडायला तयार नाहीत. 


उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणात नसलेला जातीय कोन तयार करणाऱ्या या राजनेत्यांना पश्चिम बंगाल मधील धार्मिक हिंसाचार - अत्याचार मात्र दिसत नाही. महाराष्ट्राच्या कोरेगाव भीमा दंगली नंतर अटक झालेले शहरी नक्षलिंमध्ये ज्यांना समाजसेवक दिसतात, दिल्लीतील CAA विरोधी दंगळखोरांमध्ये ज्यांना विद्यार्थी दिसतात, त्यांना पश्चिम बंगाल मधील राजकीय अत्याचारात मारले गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मात्र माणूस दिसत नाही हेच खरे !


या पैकी कोणीही अजून पर्यंत तरी पश्चिम बंगाल मधील राजकीय हिसाचारा विरोधात ममता बानोला काही बोलल्याचे दिसत नाही. कोणीही या सगळ्या प्रकारामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे वक्तव्य केले नाही. 


आज भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा पश्चिम बंगाल मध्ये दौरा होता. भाजप अध्यक्षांचे स्वागत ममता बानोच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगड विटांचा मार देत केले. केंद्रात सत्तेत असलेल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला अश्या प्रकाराला सामोरे जावे लागत असेल तर त्या पक्षाच्या समर्थक असलेल्या सामान्य नागरिकांना आणि सामान्य पक्ष कार्यकर्त्यांना कोणत्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असेल याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. 

कलाचंद कर्माकर, मनीष शुक्ला, गणेश रॉय, सनकारी बगडी या आणि काही अनाम भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या तर केल्या गेल्याच आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून प्रकाश पाल, त्याची पत्नी ब्युटी पाल आणि त्याचा मुलगा अंगद पालची पण हत्या केल्या गेली होती. 

संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या इतक्या हत्या होत असतांना पण पश्चिम बंगाल आणि केरळ मध्ये लोकशाही अबाधित आहे हे एक आश्चर्यच आहे. या विरोधात लोकशाही प्रेमी, संविधान प्रेमी आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्य प्रेमी आवाज उठवतात का ? हे बघणे आवश्यक ठरेल !

टिप्पण्या