१ जून २००१ मध्ये नेपाळच्या रॉयल पॅलेस मधून जी बातमी बाहेर आली त्या मुळे जगात खळबळ तर उडालीच पण भारत आणि नेपाळ मधील राजनैतिक दरी रुंदवण्यासाठी या घटनेचा यशस्वी वापर केला गेला. ही घटना म्हणजे रॉयल नेपाळ पॅलेस मध्ये झालेले राजघराण्याचे हत्याकांड! या हत्याकांडा बाबत अनेक निष्कर्ष प्रचिलीत केल्या गेले आहे, पण तत्कालीन नेपाळ मधील राजकीय परिस्थिती बघता नक्की कोणता निष्कर्ष योग्य हे ठरवणे खूपच कठीण आहे.
नेपाळची राजधानी काठमंडु येथे असलेल्या नेपाळ राजघराण्याच्या नारायनहीती या राजमहालात स्वयंचलित बंदुकीतून फैरी झाडत नेपाळचे युवराज दिपेंद्र यांनी आपले वडील आणि नेपाळचे राजे वीरेंद्र आणि आई नेपाळची महाराणी ऐश्वर्या यांच्या सोबत राजघराण्यातील अजून नऊ जणांचा जीव घेतला आणि मग स्वतः पण आत्महत्या केली. या घटनेचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले. पण राजकुमार दिपेंद्र यांनी आत्महत्या केल्या मुळे हत्याकांडाचे खरे कारण कधीच समोर आले नाही. तरी काही निष्कर्ष खाली देत आहे.
निष्कर्ष १: राजकुमार दिपेंद्र यांचे एक भारतीय देवयानी राणा सोबत प्रेम संबंध होते आणि त्यांना तिच्या सोबत लग्न करायचे होते. मात्र नेपाळचे राजा आणि राणी यांची या लग्नाला संमती नव्हती. घटना घडायच्या अगोदर पण राजकुमार दिपेंद्र यांचे या विषयावरून आपल्या आईवडीलांसोबत बोलाचाली झाली होती. त्याच बरोबर या प्रकरणा पाई राजकीय निर्णयात आपल्या मताला डावलल्या जात आहे असेही राजकुमार दिपेंद्र यांना वाटायला लागले होते. या सगळ्याची परिणीती राजकुमार दिपेंद्र दारूच्या आहारी जाण्यात आणि त्या नशेत हे हत्याकांड करण्यात झाली.
निष्कर्ष ३: नेपाळचे एक पत्रकार कृष्णा अबिरुल यांनी या घटनेवर आधारीत कादंबरी लिहतांना, राजमहालातील एका सेविकेच्या हवाल्याने राजकुमार दिपेंद्र यांनी गोळीबार न करता त्यांच्या वेशात आलेल्या दोन बुरखाधारी लोकांनी हा गोळीबार केला असा निष्कर्ष काढला होता.
निष्कर्ष ४: या हत्याकांडाच्या नऊ वर्षा नंतर राजमहालाचे तत्कालीन "पॅलेस मिल्ट्री सेक्रेटरी" या महत्वाच्या पदावर काम करणारे जनरल विवेक शहा यांनी एक पुस्तक लिहले "माईले देखेको दरबार" ! या पुस्तकात या हत्याकांडा मागे भारताची गुप्तचर संस्था रॉ असल्याचा आरोप केला होता आणि नेपाळ मध्ये या आरोपाला खूप मोठा दुजोरा पण मिळाला होता.
निष्कर्ष ५: हत्याकांडाच्या रात्री राजे वीरेंद्र यांचे लहान भाऊ आणि नंतर नेपाळच्या राजसिंहासनावर बसलेले राजे ज्ञानेंद्र हे या शाही खान्याला उपस्थित नव्हते. म्हणून त्यांच्या वर पण संशयाची सुई आलेली. खास करून राजकुमार पारस जो हत्याकांडाचे वेळेस राजभवनात हजर होता, पण त्याला काहीही झाले नाही. ज्ञानेंद्र राजा बनल्यावर या प्रिन्स पारसला अटक केल्या गेली आणि शिक्षा पण, पण त्याचा नक्की या घटनेत काय हात होता हे गुपितच आहे. पण असे सांगतात की पारस आणि राजे ज्ञानेंद्र यांचे चांगले संबंध होते. राजघराण्यातील कोणाला अटक आणि शिक्षा व्हायचा हा नेपाळच्या इतिहासातील एकमेव प्रसंग.
इतके वेगवेगळे निष्कर्ष या घटनेमागे आहेत. पण तत्कालीन काळात राजे वीरेंद्र हे नेपाळमधील लोकशाहीला पोषक वातावरण तयार करण्यास आणि लोकशाही करता आपल्या अधिकारांवर पाणी सोडण्यास तयार होते. राजे वीरेंद्र आणि नेपाळ मधील लोकशाहीवादी नेते काही प्रमाणात भारता कडून प्रेरित होते आणि भारताशी चांगले संबंध ठेवावे या मताचे होते. मात्र स्वतः राजकुमार दिपेंद्र आणि राजे वीरेंद्र यांचे भाऊ ज्ञानेंद्र मात्र पूर्णपणे या विरोधात होते. राजकुमार दिपेंद्र यांचे प्रेमप्रकरण जरी नेपाळ नरेश आणि राणी यांच्या मधीक एक कारण असले तरी राजकुमार दिपेंद्र राज्य कारभारात आपल्या मताला डावलले जात असल्यामुळे नाराज होतेच, एका शस्त्र खरेदी संबंधात राजकुमार यांनी केलेल्या शिफारशी बाजूला सारत राजे वीरेंद्र यांनी आपले मत पुढे दामटले हे पण राजकुमार दिपेंद्र यांच्या मनाला लागले होते, त्यातच राजमहालातील अंतर्गत राजकारण पण त्यात सामील झाले असेल. पण सोबत हे पण लक्षात घ्या की याच काळात नेपाळ मध्ये चीनच्या आशीर्वादाने माओवादी साम्यवादी पक्ष पण कार्यरत झाला होता. तत्कालीन नेपाळ नरेषांसमोर आपले अधिकार कमी करत नेपाळमध्ये भारताच्या मदतीने लोकशाही बळकट करून आपले राजापद कायम ठेवायचे की आपले अधिकार न सोडता नेपाळ मधील लोकशाहीला बळकट नाही करायची आणि माओवादी साम्यवादी पक्षांना रान मोकळे करायचे हा राजकीय पेच होता, आणि नेपाळ नरेषांनी लोकशाहीला समर्थन दिले. मात्र या हत्याकांडा नंतर नेपाळ नरेश झालेले राजा ज्ञानेंद्र यांनी ना अधिकार सोडले, ना लोकशाही बळकट केली, उलट आपले अधिकार वाढवत लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारला बरखास्त केले, याचा परिणाम नेपाळ मध्ये माओवाद्यांना लोकशाही आणि नेपाळ नरेषांविरोधात जनमत तयार करायला वाव मिळाला आणि नेपाळ मध्ये गृहयुद्ध सुरू झाले. आज नेपाळ मध्ये नावाला लोकशाही असली तरी त्यावर चीनची आणि चिनी माओवाद्यांची पूर्ण पकड आहे आणि नेपाळ आता राजविना आहे.
नेपाळचे संविधान बदलण्यात आले आहे, त्या नुसार आता नेपाळ हिंदू राष्ट्र न राहता भारता सारखेच "सेक्युलर स्टेट" झाले आहे. भारतातील काही पत्रकार आणि डाव्या विचारांचे तथाकथित बुद्धिवादी नेहमी हा भ्रम पसरवतात की नेपाळने स्वतःला हिंदू राष्ट्र न ठेवता सेक्युलर स्टेट केले असल्यामुळे हिंदुत्ववादी भाजपा सरकार नेपाळच्या विद्यमान सरकार सोबत संबंध सुधारत नाही. मात्र वरील घटना आणि त्या घटनेबाबत नेपाळ मधून आलेल्या घटना आणि निष्कर्ष बघता भारताचे नेपालसोबत असलेले राजकीय संबंध नेहमीच दोलमय राहिले आहेत. त्यातच हे हत्याकांड भारत आणि नेपाळ मधील राजनैतिक दरी वाढवणारे ठरले हे नक्की.
विशेष म्हणजे पायउतार केलेले नेपाळ नरेश राजे ज्ञानेंद्र यांनी अजून नेपाळ सोडले नाही आहे. मुळातच अजूनही नेपाळ मध्ये राजाला देवाचा अंश मानणारे अनेक आहेत, त्या मुळे असेल कदाचित पण माओवादी नेपाळच्या राजाला देश सोडायला भाग पाडू शकले नाही. असो, पण काठमांडु शहरात राजांचे १-२ पंचतारांकित हॉटेल्स, सिगरेट कंपनी आणि काही चहा बगीचे आहेत असे सांगतात. मध्यंतरी भारत नेपाळ सीमे वरील महाराजगंज येथे ते आले असता नेपाळ आणि भारतातील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केल्याच्या बातम्या वृत्तपत्रात बघायला मिळतात.
सोबतच नेपाळ भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ नरेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथे मुख्यमंत्री निवस्थानात भेट घेतली होती. भेटीचे कारण जरी योगी आदित्यनाथ यांच्या गोरखनाथ मठा विषयी होते असे सांगितले असले तरी या भेटीमुळे नेपाळ मधील चिनी दूतावास आणि नेपाळी माओवादी यांचे कान उभे राहिले होते.
गोरखनाथ मठाची स्थापना करणारे हे नेपाळ राजघरण्याशी संबंधित गोरखा होते हे उल्लेखनीय त्याच मुळे गोरखनाथ पीठ आणि नेपाळ नरेश यांचे पिढीजात संबंध आहे. योगी आदित्यनाथ हे याच पिठाचे महंत आहेत हे इथे उल्लेखनीय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा